लोकमान्य टिळक - Lokmanya Tilak Information In Marathi

Lokmanya Tilak Information In Marathi

Lokmanya Tilak Information In Marathi: लोकमान्य टिळक ही अशी व्यक्ती होती ज्यांनी देशाची गुलामगिरी सविस्तरपणे पाहिली होती. त्यांच्या जन्माच्या एका वर्षांनंतरच ब्रिटिशांच्या विरोधात भारत स्वातंत्र्य करण्यासाठी १८५७ मध्ये पहिली क्रांती झाली.लोकमान्य टिळक समस्यांच्या अनेक बाबींवर विचार करत असत आणि मग त्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी उपाय शोधून काढत. त्यांनी सर्व बाजूनी भारताच्या गुलामी बद्दल विचार केला त्यानंतर त्यांनी इंग्रजांविरुद्ध एक रणनीती बनवली आणि त्यांच्याच भाषेत उत्तर दिले.

टिळक एक महान देशभक्त, उत्तम लेखक, विचारवंत, समाज सुधारक आणि स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे जनक मानले जाते. ते भारतीय इतिहास, संस्कृत, हिंदू धर्म, गणित आणि खगोलशास्त्र या विषयांचे अभ्यासक होते. बाळ गंगाधर टिळक यांना 'लोकमान्य' म्हणूनही ओळखले जात असे. स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' त्यांच्या या घोषणेने लाखो भारतीयांना प्रेरित केले होते.

भारतीयांची स्थिती सुधारण्यासाठी आणि लोकांना जागृत करण्यासाठी टिळकांनी मासिके प्रकाशित केली, तर दुसरीकडे भारतीयांना शिक्षित करण्यासाठी त्यांनी स्वतः शैक्षणिक केंद्रांची स्थापना केली. लोकांना एकत्रित आणण्यासाठी लोकमान्य टिळकांनी 'गणेशोत्सव' आणि 'शिवजयंती' यांसारख्या सार्वजनिक उत्सवांची सुरुवात केली.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे जनक लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव या तालुक्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर रामचंद्र टिळक तसेच आईचे नाव पार्वतीबाई गंगाधर टिळक असे होते.त्यांचे वडील रत्नागिरीमध्ये सहाय्यक शिक्षक होते. त्यांचे वडिल त्यांच्या काळातील एक लोकप्रिय शिक्षक होते.

गंगाधर टिळक यांनी त्रिकोणामिती आणि व्याकरणावर अनेक पुस्तके लिहिली जी प्रकाशित झाली.त्यांची आई पार्वतीबाई या धार्मिक विचारांच्या होत्या. त्यांचे आजोबा हे एक महान विद्वान होते. लोकमान्य टिळकांच्या भावी आयुष्यात बालपणापासून कुटुंबातून मिळालेल्या संस्कारांची छाप स्पष्टपणे दिसते.

लोकमान्य टिळक यांच्या बालपणीचे नाव केशव होते आणि 'बाळ' हे त्यांचे टोपण नावच कायम राहिले. लहानपणी त्यांना कथा ऐकणे फार आवडत होते. म्हणून जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळत असे तेव्हा तेव्हा ते आजोबांकडे जाऊन गोष्टी ऐकत असे, आजोबा त्यांना राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, गुरू नानक अशा देशभक्त आणि क्रांतिकारकांची कहाणी सांगायचे. टिळक त्यांच्या कथा लक्ष देऊन ऐकत आणि त्यापासून प्रेरणा घेत. त्यांनी आजोबांकडून अगदी लहान वयातच भारतीय संस्कृती आणि सभ्यता शिकून घेतली.

लोकमान्य टिळक एक हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितावर विशेष प्रेम होते. लहानपणापासूनचे अन्यायाचे प्रखर विरोधक होते आणि संकोच न करता आपले विचार स्पष्टपणे मांडत असत. लोकमान्य टिळक हे आधुनिक शिक्षण प्राप्त करणाऱ्या पहिल्या पिढीतील भारतीय तरुणांपैकी एक होते. जेव्हा लोकमान्य टिळक दहा वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांची बदली रत्नागिरीहून पुण्याला झाली. या बदलीमुळे त्यांच्या आयुष्यातही बरेच बदल घडले.पुण्यातील एंग्लो- वर्नाकुलर स्कूलमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. आणि त्या काळातील नामांकित शिक्षकांकडून त्यांनी शिक्षण घेतले. पुण्याला आल्यानंतर त्यांच्या आईचे निधन झाले आणि जेव्हा लोकमान्य टिळक सोळा वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

टिळक मॅट्रिक मध्ये शिकत असताना त्यांचे लग्न दहा वर्षांची कन्या सत्यभामा यांच्याशी झाला. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.१८७७ मध्ये गणिताच्या विषयात प्रथम श्रेणीसह ते बीएची परीक्षा उत्तीर्ण झाले. पदवीनंतर लोकमान्य टिळकांनी पुण्यातील एका खाजगी शाळेत गणिताचे शिक्षण दिले आणि काही काळानंतर ते पत्रकार झाले. त्यांना पाश्चात्य शिक्षण व्यवस्थेचा तीव्र विरोध होता. त्यांच्या मते,यामुळे केवळ विद्यार्थ्यांचेच नाही तर संपूर्ण भारतीय संस्कृतीचा आणि वारसाचा अनादर होतो. त्यांचा असा विश्वास होता की केवळ चांगली शिक्षण व्यवस्था चांगल्या नागरिकांना जन्म देऊ शकते आणि प्रत्येक भारतीयांना ही त्यांची संस्कृती आणि आदर्श याची जाणीव करून दिली पाहिजे.

लोकमान्य टिळक यांचे सहकारी आगरकर आणि थोर समाजसुधारक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यासमवेत त्यांनी 'डेक्कन एज्युकेशन सोसायटीची' स्थापना केली, त्याचा उद्देश देशातील तरुणांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण देणे हा होता. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेनंतर लोकमान्य टिळकांनी 'केसरी' आणि ' मराठा' या दोन साप्ताहिक मासिकांचे प्रकाशन करण्यास सुरुवात केली. केसरी मराठी भाषेत प्रकाशित झाले तर मराठा हे इंग्रजी भाषेतील साप्ताहिक होते. लवकरच ही दोन्ही मासिके खूप लोकप्रिय झाली . त्यांच्यामार्फत लोकमान्य टिळकांनी भारतीयांचे संघर्ष आणि त्रास यांवर प्रकाश टाकला, त्यांनी प्रत्येक भारतीयांना आपल्या हक्कासाठी लढा देण्याचे आवाहन केले.

लोकमान्य टिळकांनी आपल्या लेखनात तीव्र आणि प्रभावशाली भाषेचा वापर केला जेणेकरून उत्कटतेने आणि देशभक्तीच्या भावनेने वाचक मंत्रमुग्ध होऊ शकेल.लोकमान्य टिळक यांनी १८९० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.आपल्या जीवन काळात ते पुणे नगरपरिषद आणि मुंबई विधीमंडळाचे सदस्य होते. एक आंदोलनकारी आणि शिक्षक होण्याबरोबरच लोकमान्य टिळक एक महान समाजसुधारक देखील होते. बालविवाह सारख्या वाईट गोष्टींना त्यांनी विरोध केला आणि त्यावर बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली. विधवा पुनर्विवाहाचे ते भक्कम समर्थक होते. गणेशोत्सव आणि शिवजयंती यांसारख्या सार्वजनिक उत्सवांची माहिती देऊन लोकांना एकत्र जोडण्याचे कामही त्यांनी केले.

सन १८९७ मध्ये ब्रिटिश सरकारने टिळकांवर तीव्र लेखाद्वारे जनतेला भडकवण्याचा, कायदा मोडत आणि शांतता व्यवस्था मोडल्याचा आरोप केला. त्यांना दीड वर्षाच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.शिक्षा संपल्यानंतर १८९८ मध्ये लोकमान्य टिळकांना सोडण्यात आले आणि त्यांनी स्वदेशी चळवळ सुरू केली. वर्तमानपत्र आणि भाषणाद्वारे महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात स्वदेशी चळवळीचा संदेश दिला. त्यांच्या घरासमोर 'स्वदेशी मार्केट' चे आयोजन करण्यात आले होते. याच दरम्यान काँग्रेस चे दोन गटात विभाजन झाले.

१९०६ मध्ये ब्रिटिश सरकारने बंडखोरीच्या आरोपाखाली लोकमान्य टिळकांना अटक केली. लोकमान्य टिळकांना सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि मंडाले तुरुंगात त्यांना नेण्यात आले. तुरुंगात त्यांनी आपला बराचसा वेळ वाचन लेखनात घालवला. लोकमान्य टिळकांनी आपले प्रसिद्ध पुस्तक 'गीतारहस्य' हे याच काळात लिहिले. शिक्षा भोगल्यानंतर टिळकांना तुरुंगातून सोडण्यात आले त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या दोन गटांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरु केला पण त्यांना यश आले नाही.१९१६ मध्ये लोकमान्य टिळकांनी 'होम रूल लीग' ची स्थापना केली.

१ ऑगस्ट १९२० रोजी भारताचे महान सुपुत्र स्वर्गात विलीन झाले.भारताचा तेजस्वी सूर्य मावळला गेला.

या लेखामध्ये आम्ही लोकमान्य टिळक यांची माहिती दिलेली आहे. या माहितीमध्ये लोकमान्य टिळकांचे कार्य मराठीमध्ये, लोकमान्य टिळक यांचे सामाजिक कार्य, लोकमान्य टिळकांचे शैक्षणिक कार्य अशी माहिती दिलेली आहे.

माहिती आवडल्यास नक्की आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा. आपली प्रतिक्रिया आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.

Read More
Categories