अपंगत्वापासून माऊंट एवरेस्ट पर्यंतचा प्रवास | Motivational story Of Arunima Sinha In Marathi

अरुणिमा सिन्हा यांचा चित्तथरारक जीवन प्रवास | Motivational Story Arunima Sinha In Marathi

motivational story arunima sinha in marathi

आपण प्रेरणादायी गोष्टी (Motivational story In Marathi) भरपूर वाचल्या असतील परंतु अरुणिमा सिन्हा यांची गोष्ट वाचली तर तुम्हाला विश्वास बसेल कि खरंच आपण मनात आणले तर काहीही करू शकतो. या प्रेरणादायी (Motivational Story In Marathi) गोष्टींमध्ये आहेत अरुणिमा सिन्हा ज्यांना कसे तरुण वयात अपंगत्व आले आणि कसे त्यांनी अशक्य वाटत असलेले धाडस केले.

नाव : अरुणिमा सिन्हा

जन्म : २० जुलै १९८८

जन्म ठिकाण : आंबेडकर नगर, उत्तर प्रदेश

अरुणिमा सिन्हा ह्या जगातील पहिल्या अपघातामध्ये अपंग झालेल्या महिला आहेत ज्यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केला आहे. अरुणिमा सिन्हा या राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल खेळाडू आहेत. त्यांना २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अरुणिमा सिन्हा यांच्यासोबत घडलेली एक चित्तथरारक घटना :

१२ एप्रिल २०११ रोजी २३ वर्षीय अरुणिमा नोकरीच्या मुलाखतीसाठी दिल्लीला निघाल्या होत्या. त्या लखनौ येथून पद्मावती एक्सप्रेस या रेल्वेच्या सध्या डब्यात बसल्या. त्याच रात्री रेल्वेच्या डब्यांमध्ये काही गुंड तरुण हातामध्ये धारधार श्स्र्त घेऊन डब्यातील लोकांनां धमकावून लुटू लागले.

थोड्याच वेळात ते अरुणिमा यांच्याकडे आले. परंतु त्या गुंडाना अरुणिमा यांनी आपल्याकडे असलेले पैसे व मौल्यवान गोष्टी देण्यास नकार दिला व विरोध करू लागल्या. कोणाचं विरोध करत नव्हते आणि हि एकटीच मुलगी विरोध करतेय हे पाहून त्या गुंडाना राग आला असावा म्हणून त्यांनी अरुणिमा यांचा गळा दाबला व ओढत ओढत त्यांना डब्याच्या बाहेर ढकलून दिले. चालत्या गाडीतून पडल्यामुळे त्यांचा पायाचेहाड तुटले आणि जिथे त्या पडल्या तो देखील एक रेल्वे रूळच होता.

त्याहून भयावह म्हणजे त्यांचा दुखापत झालेला पाय हा त्या रेल्वे रुळावरच होता. त्यांना तो पाय हलवता देखील येत नव्हता. तेवढ्यातच त्यांच्या त्या पायावरून एक रेल्वे गेली. काय परिस्थिती त्यांच्यावर उद्भवली असेल याचा विचार देखील करायला नको. त्या अवस्थेत त्या बेशुद्ध झाल्या. त्यांच्या त्या तुटलेल्या पायाला उंदीर कुडतडत होते, वरून अनेक रेल्वे येत जात होत्या, त्या रेल्वेतील मलमूत्र आणि दूषित पाणी त्यांच्या अंगावर पडत होते.

जवळपास रात्री पडलेल्या अरुणिमाना सकाळ झाली तरी कोणीच पहिले नव्हते किंबहुना मदत करत नव्हते. शेवटी एका सदगृहस्थानी त्याना पहिले व जवळच्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना भरती केले. त्याच्या पायाची झालेली दुरावस्था पाहून डॉक्टरांनी त्याचा पाय कापायचाच निर्णय घेतला. भूल देयची कोणतीही सुविधा नसल्यामुळे त्यांचा पाय हा भूल न देताच कापण्यात आला. नंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. अशा प्रकारे त्यांची व्हॉलीबॉल ची कारकीर्द संपुष्टात आली.

अरुणिमा यांनी जरी एक पाय गमावला तरी त्यांनी त्याची हिम्मत गमावली नव्हती. त्या विचार करू लागल्या कि आपण असे काय करू शकतो जे अपंग नसलेल्या व्यक्ती देखील करू शकत नाहीत. त्या वेळेस त्यांना एव्हरेस्ट सर करण्याचे ध्येय सुचले.

रुग्णालयातून त्या बचेंद्री पाल याना भेटण्यासाठी बिहार ला गेल्या. बचेंद्री पाल ह्या पहिल्या माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या भारतीय महिला आहेत. अरुणिमा यांची अवस्था पाहून त्यांनी प्रथम अरुणिमा यांना विरोध केला. परंतु अरुणिमा यांच्या जिद्दीला पाठिंबा देत नंतर त्यांनी प्रशिक्षण देण्याचे ठरविले.

आता प्रशिक्षण चालू झाले परंतु त्यामध्ये हि त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला, पायातून सतत रक्त येत होते तरीपण त्यांनी ते परीक्षण अ श्रेणी सह पास केले.

आता वेळ आली एव्हरेस्ट सर करण्याची. यामध्ये त्यांना टाटा स्टील कडून मदत मिळाली आणि त्या नेपाळकडे रवाना झाल्या. तिथे त्यांनी शेर्पाची मदत घेतली. परंतु जेव्हा शेर्पाला कळले कि आपण ज्या व्यक्तीला एव्हरेस्ट सर करण्यासाठी मदत करणार आहे तिला एक पाय नाही, तेव्हा त्याने त्यांबरोबर जाण्यास नकार दिला परंतु खूप विनवणी केल्यानंतर तो तयात देखील झाला.

कित्येक दिवस चालत चालत त्या शेवटी शिखराच्या काही अंतरच दूर होत्या. तिथे त्यांना अनेक प्रेते दिसली सांडलेले रक्त दिसले. तिथेच त्यांच्या समोर एक जर्मनी चा पर्वतारोही पाय घसरून मृत्युमुखी पडताना दिसला. शेवटी या सर्व अडचणींना पार करीत त्या शिखरावर पोहोचल्या.

विशेष म्हणजे २०११ ला त्यांनी त्यांचा पाय गमावला आणि २१ मे २०१३ ला सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी त्या या पृथीवरील सर्वात उंच अश्या माऊंट एवरेस्ट वर उभ्या होत्या.

पण संकटे इथेच थांबली नाहीत कारण त्यांच्या कडील प्राणवायूचा साठा हा परतीचा प्रवास करण्यासाठी फार कमी होता. त्यांना माहिती होते कि ते या साठ्यावर फार वेळ जगू शकत नाही म्हणून त्यांनी शेर्पाला त्यांचे फोटो काढण्यास सांगितले.

परंतु त्यांची जिद्द पाहून शेर्पा म्हणाला काहीही झाले तरी मी तुम्हाला सुखरूपच खाली सोडेन. असे म्हणत त्यांनी पार्टीचा प्रवास चालू केला त्यातच मोठे संकट हे संपत असलेल्या प्राणवायूचे होते. योगायोगाने एक ब्रिटिश पर्वतारोही जास्तीचा प्राणवायू घेऊन जात होता त्याला त्याचे फार ओझे होत होते म्हणून त्याने त्यातील एक प्राणवायू अरुणिमा याना दिला.

प्राणवायू तर मिळाला परंतु परतीचा प्रवास अजून बाकी होता. त्यांमध्येही त्यानां खूप संकटे आली त्याचा कृत्रिम पाय सारखा निसटत होता, तो त्यांच्या परतीच्या प्रवासात अडथळा ठरत होता. शेवटी त्यांनी तो कृत्रिम पाय काडून आपल्या हातात घेतला आणि प्रवास चालू ठेवला.

अश्या तर्हेने त्यांनी यशस्वीरीत्या माऊंट एवरेस्ट सर केला व सुखरूप परतल्या. २०१५ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

मंजिल मिल भी जाएगी भटकते हुए सही, पर गुमराह तो वो हैं जो घर से निकले ही नहीं।

खरंच आपण मनात आणले तर काहीही करू शकतो हे अरुणिमा यांनी सिद्ध करू दाखवले आहे.

अश्याच नवनवीन प्रेरणादायी गोष्टी (Motivational story In Marathi) वाचन्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाइक करा आणि आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या COMMENT करून आम्हाला कळवा.

Read More
Categories