Swami Vivekananda Quotes In Marathi - स्वामी विवेकानंदांचे उत्कृष्ट मराठी विचार

Swami Vivekananda Quotes In Marathi | स्वामी विवेकानंद यांचे विचार

swami vivekananda quotes in marathi

स्वामी विवेकानंद एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व. स्वामी विवेकानंद यांचे विचार आज हि तेवढेच सत्य व प्रेरणादायी आहेत जेवढे ते पूर्वी होते. या लेखामध्ये आपण स्वामी स्वामी विवेकानंद यांचे विचार पाहणार आहोत. आयुष्यात कधीही खचल्यासारखे वाटले कि स्वामी विवेकानंदांचे विचार आठवावे. आपल्याला नक्कीच त्यातून काही ना काहीतरी मार्ग मिळेल. स्वामी विवेकानंदांचे हे विचार अगदी कमी शब्दामध्ये आपल्याला खूप काही महत्वाच्या गोष्टी सांगून जातात.

उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत लक्ष्य प्राप्त करत नाही तोपर्यंत थांबु नका.
स्वतः चा विकास करत रहा. लक्षात ठेवा गती आणि वाढ ही तर जिवंतपणाची लक्षणे आहेत.
या विश्वातील सर्व शक्ती आपल्याकडे आहेत. परंतु आपण आपल्या डोळ्यावर हात ठेवतो आणि किती अंधार आहे म्हणुन रडत बसतो.
सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे करणं हे पाप कालांतराने मनुष्याला दुर्बळ बनविते.
कधीही कुणाची निंदा करु नका. जर तुम्हाला त्यांना मदतीचा हात पुढे करायचा असेल तर नक्कीच पुढे करा, नसेल हात जोडा. आपल्या भावनांनी त्यांना आशिर्वाद द्या व त्यांना त्यांच्या मार्गावरून जाऊ द्या.
दिवसातून एकदा तरी स्वत: शी बोला, अन्यथा आपण या जगातील एका उत्कृष्ट व्यक्तीला हरवून बसाल.
आयुष्यात जोखीम घ्या. जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व करू कराल आणि जर तुम्ही हरलात तरी तुम्ही मार्गदर्शन तर नक्कीच करू शकता.
नायक बना. नेहमी स्वतःला म्हणा, मला भीती वाटत नाही.
जग हि एक महान व्यायामशाळा आहे जिथे आपण स्वतःला मजबूत बनविण्यासाठी आलो आहोत.
जे कोणी आपल्याला मदत करतात त्यांना विसरू नका. जे कोणी आपल्यावर प्रेम करतात त्यांचा द्वेष करू नका आणि जे कोणी आपल्यावर विश्वास ठेवतात त्यांना फसवू नका.
कधीही कोणाची किंवा कशाचीही वाट पाहत बसू नका. आपण जे करू शकता ते करा, कोणाकडूनही आशा बाळगू नका.
कधीच स्वतःला कमी समजू नका.
अश्या गोष्टी ज्या तुम्हाला दुर्बल बनवीत आहेत अश्या गोष्टीं विष आहेत असे समजून त्यांचा त्याग करा.
एक विचार घ्या. त्या विचाराला आपले आयुष्य बनवा, त्याचा सतत विचार करा, त्याची स्वप्ने पहा, आपला मेंदू, स्नायू व शरीराच्या प्रत्येक भागाला त्या विचारामध्ये बुडून जाऊद्या. हाच यशस्वी होण्याचा मार्ग आहे.
स्वतःवर विश्वास ठेवा. काही वेळातच तुम्ही स्वतःला मोकळे अनुभवाल.
एका वेळी एकच गोष्ट करा आणि ते करत असताना आपले सर्व लक्ष त्या गोष्टीवरच केंद्रित करा.
बाह्य स्वभाव हे अंतर्गत स्वभावाचे एक रुप आहे.
मेंदू आणि ह्रदय या दोघात संघर्ष चालु असेल, तर नेहमी ह्रदयाचे ऐका.
कोणत्याही गोष्टीची मनात भीती बाळगू नका तरच तुम्ही अद्भुत काम करू शकाल आणि हा निर्भीडपणाच तुम्हाला परम आनंद देईल.
ज्याचा विचार तुम्ही करणार तेच तुम्ही बनणार. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही कमकुवत आहेत तर तुम्ही कमकुवतच बनलं आणि जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही बलवान आहेत तर तुम्ही बालवानच बनाल.
मनाची शक्ती हि सूर्याच्या किरणांसारखी असते जेव्हा ती एका केंद्रबिंदूवर केंद्रित होते तेव्हाच ती प्रखरतेने चमकते.
जर आपले व्यक्तिमत्त्व सुंदर नसेल तर सुंदर दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.
संपूर्ण जग जरी तुमच्या विरुद्ध हातात टाकीवर घेऊन उभे राहिले तरी ध्येययपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक असली पाहिजे.

आशा आपल्याला हे स्वामी विवेकानंदांचे विचार आवडलेच असतील. कोणता विचार आपल्याला जास्त प्रेरणा देऊन गेला आम्हाला कमेंट करून सांगा.

Read More
Categories