Traffic Signal Information In Marathi: Signs with Maening | Rules - LifelineMarathi.com्टी

Traffic Signal Information In Marathi | ट्रॅफिक सिग्नलची माहिती

तुम्हाला जर कोणी असा प्रश्न विचारला की तुमच्यासाठी सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती आहे? तर याचे उत्तर काय असू शकते? कोणत्याही व्यक्तीसाठी त्याच्या जीवाची किंमत ही सर्वात अधिक असते. जीवन हे अनमोल आहे जे पैसे देऊन विकत घेता येऊ शकत नाही.

traffic signal information in marathi

त्यातच आपण अश्या कितीतरी बातम्या पाहतो ज्यामध्ये अपघातात लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागतात आणि असा एकही दिवस जात नाही कि ज्या दिवशी आपण अशा दुर्घटनांबद्दल वाचत किंवा पाहत नाही.

अशा परिस्थितीमध्ये सर्व वाहन चालकांनी जर थोड्या काळजीने आपला प्रवास केला तर स्वतःच्या प्राणांसोबत ते दुसर्यांचे हि प्राण वाचवू शकतात.

त्यासाठीच प्रत्येक देशाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काही महत्वाचे नियम बनवले आहेत आणि त्यांचे पालन करणे आपली जबाबदारी आहे. या नियमांचे आपण पालन न केल्यास आपल्याला दंड बसू शकतो.

आपल्या सर्वांना माहीत आहे की रस्त्यावर गाडी चालवताना खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु हे देखील खरे आहे की सावधगिरी बाळगण्यासाठी लोकांमध्ये थोडी भीती निर्माण करणे देखील आवश्यक आहे, नाहीतर लोक निष्काळजी बनतात. आपली एक चूक केवळ आपलेच नव्हे तर दुसऱ्यांचे आयुष्य ही धोक्यात टाकू शकते.

रस्त्यावरील अपघात हे अनेक कारणांमुळे घडतात जसे की वयोमर्यादा पूर्ण नसताना देखील वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे किंवा जाणून-बुजून विचित्रपणे वाहन चालवणे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रात्यक्षिक करणे आणि नियमांचे पालन न करणे, शिवाय असेदेखील बरेचसे लोक आहे ज्यांना वाहतुकीचे नियमच माहीत नसतात आणि ज्यांना सिग्नल समजत नाही. आज आपण याचीच संपूर्ण माहिती घेणार आहोत.

ट्रॅफिक चे नियम

१. वेग नियंत्रण (Speed Limit )

रस्त्यावर वाहन चालवण्यासाठी वाहनांची वेग मर्यादा निश्चित केली आहे ज्यामध्ये वाहन त्याच वेगाने चालवावे लागते, आणि काही ठिकाणी असे लिहिले ही आहे की ४० किलोमीटर प्रति तास म्हणजेच वाहनाची गती ४० च्या आसपास असावी, परंतु लोक पटकन पोहोचण्यासाठी या निश्चित वेगाच्या जास्तीत जास्त वेगाने वाहन चालवतात त्यामुळेच वाहन अनियंत्रित होते आणि व्यक्ती अपघाताला बळी पडतात. यामुळे स्वतःचे नुकसान तर होतेच परंतु दुसऱ्यांचे ही नुकसान होते.

अशा परिस्थितीमध्ये रस्त्यावर वाहन चालवण्यासाठी ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा पाळूनच आपण वाहन चालवले पाहिजे. जे लोक असे नियम मोडत आहेत किंवा ज्यांना या नियमांबद्दल माहिती नाही अशा लोकांना समजावून सांगितले पाहिजे.

२. एक मार्ग (One Way)

आज-काल रस्त्यावर येण्यासाठी आणि जाण्यासाठी दोन वेगवेगळे मार्ग असतात. ज्यामध्ये एक मार्ग वाहन येण्यासाठी आणि दुसरा मार्ग वाहन जाण्यासाठी असतो. म्हणून जे मार्ग ज्यासाठी निश्चित केले आहे त्याच मार्गाने गाडी चालवणे आवश्यक आहे. बहुतेक वेळा असे दिसते की लोक एक मार्ग असतानाही चुकीच्या मार्गाने गाडी चालवत विरुद्ध दिशेने जातात. त्यामुळे समोरून येणाऱ्या चालकाला अडथळा निर्माण होतो आणि तेथे अपघात होण्याची जास्त शक्यता असते.

३. सुरक्षित ओव्हरटेक (Overtake )

आपण आपल्या वाहनाची गती मर्यादा लक्षात घेऊनच ओव्हरटेक केले पाहिजे आणि या व्यतिरिक्त ओव्हरटेक करण्यासाठी योग्य जागा आणि योग्य वेळ निवडणे आवश्यक आहे. बहुदा ओव्हरटेक करणे टाळावे.

४. हॉर्नचा चुकीचा वापर

जर तुम्ही व्यस्त रस्त्यावर वाहन चालवत असाल आणि वारंवार हॉर्न वाजवत असाल तर आपण ते चुकीचे करीत आहात. गरज असतानाच हॉर्नचा वापर केला पाहिजे. काही लोक खूप जोरात आवाज करणारा होर्न आपल्या वाहनाला लावून घेतात आणि तो पुन्हा-पुन्हा वाजवून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. हॉर्न चा योग्य वापर करणे हे देखील वाहतूक नियमांपैकी एक आहे, जर याचे उल्लंघन करीत असल्याचे आढळले तर ध्वनिप्रदूषण केल्याच्या आरोपाखाली दंडही भरावा लागू शकतो.

५. चुकीचे पार्किंग

आता पार्किंग साठी भारतात वाहतुकीचे नियम करण्यात आले आहेत. जर आपण स्वतःचे वाहन पार्किंग नसलेल्या ठिकाणी पार्क केले व इतरांना त्यामुळे अडचण होत असेल किंवा वाहतूक कोंडी झालेली असेल तर हा देखील एक गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी दंडाची तरतूद करण्यात आली आहे आणि यानुसार आपले वाहन ही जप्त होऊ शकते, म्हणून पार्किंगसाठी बनवलेल्या जागेतच आपले वाहन पार्क केले पाहिजे.

६. हेल्मेट

लोकांच्या सुरक्षिततेबाबत सरकार खूप जागरूक आहे आणि म्हणूनच सरकारने हेल्मेट सक्ती केली आहे. रस्त्यावरील होणाऱ्या अपघातामधून लोकांचा जीव वाचावा म्हणून हेल्मेट घालने महत्त्वाचे आहे हे सरकारने सांगितले आहे. एवढेच नव्हे तर सुरुवातीच्या काळात केवळ वाहन चालवणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट घालने सक्तीचे होते परंतु आता मागे बसणाऱ्यानेही हेल्मेट घालने आवश्यक आहे अन्यथा दंड भरावा लागू शकतो. याशिवाय दुचाकीवर दोन पेक्षा अधिक लोकांना बसवले तरी देखील दंड भरावा लागू शकतो.

७. लायसन्स व वाहन कागदपत्रे

जर तुम्हाला रस्त्यावर वाहन चालवायचे असेल तर तुमच्याजवळ स्वतःचे लायसन असणे गरजेचे आहे, परंतु एवढेच नाही तर आपण जे वाहन चालवत आहात त्याची संपूर्ण कागदपत्रे तुमच्यासोबत असणे गरजेचे आहे. जसे की आर. सी., विमा आणि प्रदूषण स्लिप.

८. वाहन चालवण्याचे योग्य वय

भारतामध्ये वाहन चालवण्यासाठीचा परवाना मिळवण्यासाठी सर्वात पहिला व महत्वाचा नियम असा आहे की जर तुम्हाला रस्त्यावर वाहन चालवायचे असेल तर तुमचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. जर या पेक्षा कमी वय असलेला मुलगा किंवा मुलगी वाहन चालवताना पकडले गेले तर तो एक गुन्हा आहे. अलीकडेच या नियमांवर सरकार आणखी कठोर झाले आहे. अल्पवयीन वयात कोणाला वाहन चालवताना पकडले गेले तर केवळ त्याच्यावरच कारवाई केली जात नाही तर वाहन मालकावर ही कारवाई केली जाते असा नियमच आहे.

ट्रॅफिकमध्ये वापरली जाणारी चिन्हे:

Sign याचा अर्थ

सरळ प्रवेश नाही
एका दिशेने वाहने जाण्यास प्रतिबंध 
एका दिशेने वाहने जाण्यास प्रतिबंध 
दोन्ही दिशेने वाहने जाण्यास प्रतिबंध
सर्व प्रकारची वाहने जाण्यास प्रतिबंध
ट्रक प्रतिबंध
सायकल प्रतिबंध
हॉर्न  वाजवण्यास प्रतिबंध
बैलगाडी जाण्यास प्रतिबंध
टांगा जाण्यास प्रतिबंधित
हात गाडी नेण्यास सक्त मनाई आहे.
चालकांसाठी सक्त मनाई आहे.
उजव्या बाजूस वाळण्यास सक्त मनाई आहे.
डाव्या बाजूस वाळण्यास सक्त मनाई आहे.
यू-टर्न मारण्यास सक्त मनाई आहे.
ओव्हरटेक मारण्यास सक्त मनाई आहे.
नो पार्किंग
पार्किंग करू शकत नाही आणि थांबू शकत नाही.
वेग मर्यादा
रुंदी मर्यादा
उंची मर्यादा
लांबी मर्यादा
लोड मर्यादा
बंधनकारक  बस स्टॉप
अनिवार्य सायकल ट्रॅक
 हॉर्न देणे अनिवार्य आहे.
डावीकडे वळणे अनिवार्य आहे.
उजवीकडे वळणे अनिवार्य आहे.
 पुढे किंवा उजवीकडे जाणे अनिवार्य आहे.
पुढे किंवा डावीकडे जाणे अनिवार्य आहे.
पुढे जाणे अनिवार्य आहे.
थांबा
मार्ग द्या

Image Credit: All symbols are taken from transport.maharashtra.gov.in

ट्रॅफिक सिग्नल्स

रस्त्यावर सुरक्षित प्रवास करण्यासाठी ट्राफिक सिग्नल समजणे फार महत्वाचे आहे. हे खरे आहे की भारतातील खूप लोकांना सिग्नल विषय योग्यरीत्या माहिती नाही.

लाल सिग्नल: वाहतुकीच्या मुख्य तीन दिव्यांपैकी लाल दिवा म्हणजे थांबणे. जेव्हा तुम्ही एखाद्या चौकामध्ये असाल तेव्हा तुम्हाला तेथे लाल सिग्नलचा दिवा दिसला कि तुम्हाला तेथे थांबावे लागेल.

पिवळा सिग्नल: जेव्हा तुम्ही ट्राफिक लाइट्स काळजीपूर्वक पाहता तेव्हा तुम्हाला लाल दिव्या नंतर पिवळा दिवा दिसतो. याचा अर्थ चालण्यासाठी तयार राहा, परंतु फक्त चालण्यासाठी तयार राहायचे आहे चालायचे नाही, याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे.

हिरवा सिग्नल: हिरवा दिवा पुढे जाण्याचा संकेत देतो. पिवळ्या दिव्या नंतर हिरवा दिवा लागतो,त्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता.

कृपया हे लक्षात ठेवा

१. प्रथम रुग्णवाहिकेस मार्ग द्या.

२. वाहन चुकीच्या मार्गाने किंवा निषेध असलेल्या ठिकाणी पार्किंग करू नका.

३. वाहन चालवताना दुसऱ्या वाहनाच्या वेगाशी स्पर्धा करू नका.

४. ट्रॅफिक सिग्नल नुसार वाहन चालवा.

५. वाहन चालवताना हाताच्या सिग्नल चा ही वापर करा.

६.निश्चित आणि नियंत्रित वेगाने वाहन चालवा.

७. चौक, युटन आणि गर्दीच्या ठिकाणी वाहन हळू चालवा.

८. वाहन चालवताना सीट बेल्ट आणि हेल्मेटचा वापर करणे आवश्यक आहे, या सर्व गोष्टी केवळ आपल्या सुरक्षित प्रवासासाठी बनवल्या आहेत.

९. आपल्या वाहनावरून प्रवास करण्यापूर्वी आपले ड्रायव्हिंग लायसन्स आणि आवश्यक कागदपत्रे आपल्यासोबत आहेत का याची खात्री करून घ्या.

१०. वाहन चालवताना आपल्याकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या.

वाहतुकीचे हे सर्व नियम लक्षात ठेवून आपण प्रवास केला तर आपण आपला प्रवास सुरक्षित करू शकतो. आणि आपल्या अशा थोड्याशा काळजीने प्रवास केल्याने आपल्या सोबत इतरांचेही आयुष्य सुरक्षित बनवू शकतो. आणि तेव्हाच आपण आपल्या देशाला आणि स्वतःला अपघात मुक्त बनवू शकतो.

Read More
Categories