स्टीव जॉब्स - Motivational Story Of Steve Jobs In Marathi

स्टीव जॉब्स, Motivational Story Of Steve Jobs In Marathi

स्टीव जॉब्स हे नाव आपण ऐकलं की सर्वात प्रथम आपल्या मनामध्ये येते ते म्हणजे एक वेगळा विचार करणारी व्यक्ती. ज्या व्यक्तीमुळे कम्युनिकेशन क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडून आले. ज्या व्यक्तीकडे सुरुवातीला काहीच नव्हते परंतु आपल्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी पुढे भरपूर काही कमावले आपण आज त्यांचीच संपूर्ण गोष्ट पाहणार आहोत.

स्टीव जॉब्स यांचा जन्म कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्को मध्ये 24 फेब्रुवारी 1955 रोजी झाला. त्यांचे खरे नाव स्टीव पॉल जॉब्स होते जे त्यांना दत्तक घेतलेल्या माता-पिता कडून मिळालेले नाव होते. त्यांच्या बायोलॉजिकल आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती आणि त्यांना असे वाटत होते की त्यांच्या मुलाने त्याचे आयुष्य अशा बिकट परिस्थितीमध्ये जगले नाही पाहिजे त्यामुळे त्यांनी स्टीव्ह यांना अशा व्यक्तींना दत्तक देण्याचे ठरवले की जे यांची व्यवस्थित काळजी घेऊन त्यांना उच्य प्रतीचे शिक्षण देतील.

स्टीव जॉब्स यांना दत्तक घेतलेले त्यांचे वडील हे एक इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान चालवत होते. त्यामुळे स्टीव जॉब्स यांचा सर्व वेळ हा त्यांच्या वडिलांना इलेक्ट्रिकच्या दुकानांमध्ये थोडाफार हातभार लावण्यामध्ये जात होता. हीच ती वेळ होती नवीन काहीतरी शिकण्याची, वेगवेगळी गोष्टी बनविण्याची आणि हीच ती वेळ होती ती ज्या मुळे स्टीव जॉब्स यांचे पुढील आयुष्य बदलून गेले. त्यांना इलेक्ट्रिक मध्ये रुची निर्माण होऊ लागली होती. ते प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन गोष्टी बनवत होते.

स्टीव जॉब्स यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या वडिलांना काही कारणास्तव लॉस एंजलिस हे शहर सोडून दुसऱ्या शहरात म्हणजेच लॉस अल्टोस येथे स्थलांतर करावे लागले.

शहरात दाखल झाल्यानंतर त्यांना एका नवीन शाळेमध्ये म्हणजेच Home Stead Highschool मध्ये ॲडमिशन मिळाले. या हायस्कूलमध्ये त्यांची स्टीव वोझनीक यांच्याबरोबर मैत्री झाली. पुढे ते स्टीव जॉब्स यांच्याबरोबर एप्पल या कंपनीचे पार्टनर होते. स्टीव वोझनीक यांना देखील इलेक्ट्रॉनिक्समध्ये फार आवड होती म्हणूनच या दोघांची चांगली मैत्री जमली.

काही वर्षातच त्यांची हायस्कूलचे शिक्षण पूर्ण झाले. आता माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी रीड या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले परंतु या कॉलेजची फी खूप जास्त होती. ही जास्त असणारी फी त्यांचे आई - वडील पेलू शकत नव्हते आणि स्टीव्ह जॉब्स यांना देखील त्यांच्या आई-वडिलांचा पैसा असा वाया जाऊ द्यायचा नव्हता कारण त्यांना त्या शिक्षणामध्ये काहीच रस वाटत नव्हता. त्यामुळे ऍडमिशन घेतल्यानंतर सहा महिन्या मध्येच त्यांनी कॉलेज सोडून दिले . त्यानंतर ते फक्त कॅलिग्राफी म्हणजेच त्यांच्या आवडत्या हे विषयाचे शिक्षण घेऊ लागले.

या काळात जॉब यांच्याकडे फार पैसे नव्हते. त्यांना त्यांच्या होस्टेलचे भाडे देणे देखील शक्य नव्हते त्यामुळे त्यांनी त्यांचे होस्टेल सोडून दिले आणि मित्रांच्या होस्टेलमध्ये जमिनीवर काही दिवस काढले. एक वेळ तरी पोटभर जेवण जेवण्यासाठी ते प्रत्येक रविवारी सहा ते सात किलोमीटर लांब असलेल्या हरे कृष्ण मंदिरामध्ये जात होते.

असेच दिवस जात होते व त्यामध्येच त्यांना एका व्हिडिओ गेम बनवणाऱ्या कंपनीमध्ये म्हणजेच अटारी मध्ये एक नोकरी मिळाली. तिथे त्यांनी काही वर्ष काम केले.

जसे ते आठ किलोमीटर चालत येऊन हरेकृष्ण मंदिरामध्ये जेवण करण्यासाठी येत असल्यामुळे त्यांच्यावर अध्यात्मिकतेचा प्रभाव पडला. याचा केंद्रबिंदू सरतेशेवटी भारत होता. त्यामुळे आपल्या अध्यात्मिकतेसाठी त्यांनी भारतात जाणे उचित समजले व भारतामध्ये ते जवळपास आठ महीने राहिले.

त्यानंतर ते पुन्हा अमेरिकेला गेले तिथे पुन्हा त्यांनी आपल्या व्हिडिओ गेम बनवणाऱ्या कंपनीमध्ये नोकरी सुरू केली. तिथेच त्यांना आपल्या हायस्कूलमध्ये असणारा स्टीव वोझनीक मित्र भेटला. दोघांना इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आवड असल्यामुळे त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काहीतरी नवीन करण्याचा ध्यास केला. त्यानंतर त्यांनी कम्प्युटर्स बनविणे यामध्ये पाऊल ठेवले. याची सुरुवात त्यांनी त्यांच्या वडिलांच्या असणाऱ्या गॅरेज पासूनच केली. त्यावेळेस ते फक्त 21 वर्षाचे होते.

अशा प्रकारे त्यांनी आपल्या अथक प्रयत्नांनी त्यांचा पहिला कम्प्युटर बाजारामध्ये आणला. ज्याला लोकांनी खूप प्रसिद्धी दिली. नंतर एप्पल फोर्ड आणि लीचा टेक्नॉलॉजी हे कम्प्युटर्स जेव्हा बाजारामध्ये आले तेव्हा लोकांना ते पसंत पडले नाही. त्यामुळे कंपनीला भरपूर तोटा सहन करावा लागला. या तोट्याची जबाबदारी हीच जॉब यांच्यावर लादण्यात आली आणि कंपनीच्या मॅनेजमेंटने त्यांना कंपनीतून काढून टाकले.

परंतु हरतील ते स्टीव जॉब्स कुठले. त्यानंतर त्यांनी नेक्स्ट या कंपनीची स्थापना केली. ही कंपनी जॉब यांना भरपूर नफा मिळवून देऊ लागली आणि येणाऱ्या दोन तीन वर्षातच त्यांनी 10 मिलियन डॉलर्स इतकी रक्कम देऊन आणखी एक ग्राफिक्स कंपनी विकत घेतली जिला पुढे नाव Pixar असे देण्यात आले. ही कंपनीदेखील स्टीव्ह जॉब यांना भरपूर नफा मिळवून देत होती.

परंतु तिकडे एप्पल खूप तोट्यामध्ये चालली होती. तेव्हा एप्पल ने NEXT या कंपनीचा 477 मिलीयन डॉलर एवढी रक्कम देऊन खरेदी केले आणि अशा द्वारे जॉब यांना एप्पल कंपनीमध्ये पुन्हा सीईओ या पदावर स्थान देण्यात आले. यानंतर खरी सुरूवात झाली एका वेगळ्या प्रवासाची. पुढे त्यांनी असे वेगवेगळे प्रोडक बाजारामध्ये आणले. लोक ते प्रॉडक्ट कितीही महाग असले तरी खरेदी करत. अशाप्रकारे पुढे त्यांनी आयपॉड, आयट्यून अशा प्रकारचे वेगवेगळे प्रॉडक्ट ते बाजारामध्ये आणत राहिले. पुढे 2007 रोजी त्यांनी एप्पल फोन बाजारामध्ये आणला ज्यामुळे मोबाईलच्या क्षेत्रामध्ये पुढे क्रांती आली. आता एप्पल कंपनी ही वाढत चालली होती. या ॲपल कंपनीच्या वाढत जाण्यामागे फक्त एकच व्यक्ती होती ती म्हणजे स्टीव जॉब्स आणि त्यांची वेगळ्या प्रकारे विचार करण्याची क्षमता.

5 ऑक्टोंबर 2011 रोजी स्टीव्ह जॉब यांनी शेवटचा श्वास घेतला. आणि पुढच्या दिवशीच 5 ऑक्टोबर हा दिवस स्टीव जॉब्स डे म्हणून साजरा करण्याची घोषणा झाली.

स्टीव्ह जॉब यांचा मूळ मंत्र थिंक डिफरंट हा होता. त्यांचा असा विश्वास होता की जीवनामध्ये जर महान गोष्टी करायच्या असतील तर आपण कोणाचीही वाट न पाहता एकटे चालणे शिकले पाहिजे.

तर तुम्हाला हे विचारांचे क्रांतिकारी स्टीव्ह जॉब यांची गोष्ट कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करुन सांगा आणि आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Read More
Categories