आचार्य चाणक्य यांचा संपूर्ण जीवनप्रवास ➤ Chanakya Information In Marathi

Acharya Chanakya information in Marathi | आचार्य चाणक्य यांचा जीवन परिचय

chanakya information in marathi

चाणक्य जे विष्णुगुप्त आणि कौटिल्य या नावाने प्रसिद्ध आहेत. ते एक महान राजनेता आणि अर्थशास्त्री होते. त्यांनी भारतीय राजनैतिक ग्रंथ 'द अर्थशास्त्र' लिहिला होता. राजनैतिक विज्ञान आणि अर्थशास्त्र या क्षेत्रात केलेल्या विकासामध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते आणि त्यामुळेच त्यांना या क्षेत्रामधील विद्वान मानले जाते. आचार्य चाणक्य यांच्या विचाराचे आचरण जर आपण आपल्या जीवनामध्ये केले तर आपले जीवन हे सुखी होऊ शकते. भारत वर्षांमध्ये चाणक्य यांना विद्वान आणि समाजसेवक मानले जाते. चाणक्य यांच्या नीतीने विशाल साम्राज्यही स्थापन केले गेले आहे. तर चला पाहुयात एक महान विद्वान चाणक्य यांची जीवन गाथा आणि त्यांच्या विचारांबद्दल.

आचार्य चाणक्य यांचा जन्म

महापंडित चाणक्य यांच्या जन्माबद्दल स्पष्ट उल्लेख नाही, परंतु त्यांचा जन्म बौद्धधर्माच्या आधारे ई. पू.350 मध्ये एका ब्राम्हण कुटुंबामध्ये झाला होता. त्यांना भारताचे 'मैक्यावली' असेही म्हटले जाते. आचार्य चाणक्य यांच्या जन्माबाबत वेगवेगळे मतभेद आहेत. तसेच काही विद्वान त्यांना कुटिल वंशाचे मानतात आणि कुटिल वंशामध्ये जन्म घेतल्यामुळे त्यांना कौटिल्य असेही म्हटले जाते, परंतु काही विद्वानांचे असेही म्हणणे आहे की त्यांच्या उग्र स्वभावामुळे त्यांना कौटिल्य असे म्हटले जात असे. जन्मस्थानावर 'मुद्राराक्षस' च्या अनुसारे त्यांच्या वडिलांना चमक असे म्हटले जात होते आणि त्यामुळेच वडिलांच्या नावावरून त्यांचे नाव चानक्य असे ठेवण्यात आले.

चाणक्य यांचा जन्म एका गरीब ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला होता व त्यांचे लहानपण हे खूप गरिबी मध्ये गेले होते आणि गरिबीमुळे चाणक्य यांना काही वेळा जेवणही मिळत नसे, ते उपाशीपोटीच झोपत असे.

चाणक्य लहानपणापासूनच जिद्दी आणि क्रोधी स्वभावाचे होते त्यांच्या उग्र स्वभावामुळे त्यांनी आनंद वंशाचा विनाश करण्याचे ठरवले.

त्यांच्याविषयी असे म्हटले जाते की महामंत्री आणि राजेशाही थाट असूनही त्यांनी कधीही मोहमाया केली नाही. त्यांच्या जीवनामध्ये अनेक चांगले वाईट प्रसंग आले होते त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि त्यांचे उच्च विचार यामुळे ते एक महान विद्वान झाले.

चाणक्य यांचे शिक्षण

चाणक्य यांचे शिक्षण एका प्रसिद्ध आनंद महाविद्यालयांमध्ये झाले ते लहानपणापासूनच होतकरू आणि अभ्यासामध्ये विशेष रुची असणारे होते. तेथील काही ग्रंथांच्या आधारे चाणक्य यांनी तक्षशिला मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले.

ब्राह्मण परिवारामध्ये जन्म झालेल्या चाणक्य यांना अर्थशास्त्र, राजनीति औषधे, युद्ध रणनीती आणि जोतिष या विषयांमधील संपूर्ण माहिती होती ते या विषयांमधील विद्वान होते. असेही म्हटले जाते की त्यांना ग्रीक आणि फारसी भाषा माहिती होत्या.

तसेच त्यांना वेद आणि साहित्यांचे हि ज्ञान होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते तक्षशिला मध्ये राजनीतिक विज्ञान आणि अर्थशास्त्रचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यानंतर ते सम्राट चंद्रगुप्त यांचे विश्वासू सोबती बनले.

चाणक्यांचे जीवन बदलवून टाकणाऱ्या महत्त्वपूर्ण घटना

चाणक्य हे अतिशय बुद्धिमान आणि हुशार व्यक्ती होते त्यासोबतच ते एक महान शिक्षकही होते. त्यांचे थोर विचार आणि नीति यामुळे ते खूप लोकप्रिय होते त्यांची ख्याती ही सातव्या आसमानावर होती. परंतु त्या काळात अशा दोन घटना घडल्या की त्यामुळे चाणक्यांचे जीवन पूर्ण बदलून गेले.

त्या मधील पहिली घटना अशी - भारतावर सिकंदराचे आक्रमण आणि छोट्या शहरांची हार.

आणि दुसरी घटना अशी की शासकाद्वारे कौटील्य यांचा केला गेलेला अपमान.

वरील घटना या त्यांच्या आयुष्यातील अशा घटना होत्या की त्यामुळे कौटिल्य यांनी देशाची एकग्रता आणि अखंडता यांचे रक्षण करण्याचा संकल्प केला. शिक्षक बनवून मुलांना न शिकवता देशाच्या शासकांना शिक्षा करणे आणि योग्य नीती शिकवणे असा निश्चय करूनच ते घरातून बाहेर पडले.

तेव्हा भारतावर सिकंदराने आक्रमण केले होते चाणक्य तक्षशिला मध्ये मुख्य होते. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा तक्षशिला आणि गांधार चे सम्राट अंभी यांनी सिकंदरा सोबत करार केला होता.

चाणक्य आणि भारताची संस्कृती वाचवण्यासाठी सर्व राजांना आग्रह केला परंतु सिकंदरा सोबत लढण्यासाठी कोणीही आले नाही. त्यानंतर काही राजांनी सिकंदरशी युद्ध केले परंतु ते हि लढाई मध्ये हरले गेले. त्यावेळी मग एकच शक्तिशाली राज्य होते आणि शेजारील राज्यांची या राज्यावर नजर होती.

राज्याची रक्षा करण्यासाठी चाणक्य, मग्ध च्या तात्कालीन सम्राट धनानंद यांची मदत मागण्यासाठी गेले. परंतु शक्तीचा गर्व असलेल्या धनानंद याने चाणक्य यांना मदत करण्याचे नाकारले आणि असा म्हणला की,

"तू एक पंडित आहेस, युद्ध करणे हे पंडिताचे काम नाही तू पंडित आहेस पंडितच राहा."

तेव्हा चाणक्यांनी नंद साम्राज्याचा विनाश करण्याची प्रतिज्ञा घेतली.

चाणक्य आणि चंद्रगुप्त

चाणक्य आणि चंद्रगुप्त यांचे घट्ट नाते होते. चाणक्य चंद्रगुप्त साम्राज्याचे महामंत्री होते आणि त्यांनी चंद्रगुप्त ला साम्राज्य स्थापित करण्यासाठी मदत केली होती.

खरेतर नंद साम्राज्याच्या शासनाद्वारे अपमान केल्यामुळे चाणक्य यांनी घेतलेली प्रतिज्ञा यशस्वी करण्यासाठी ते निघाले. त्यासाठी त्यांनी चंद्रगुप्त ला आपला शिष्य बनवले.

जेव्हा चाणक्य चंद्रगुप्त मौर्य यांना भेटले तेव्हा चंद्रगुप्त हे फक्त नऊ वर्षांचे होते त्यानंतर चाणक्य यांनी चंद्रगुप्त यांना पूर्ण प्रकारचे शिक्षण दिले.

मौर्य साम्राज्याची स्थापना

शक्तिशाली आणि गर्व असलेला नंद वंशाचा राजा धनानंद जो आपल्या शक्तीचा उपयोग वाईट कामांसाठी करत होता आणि त्याने महान पंडित चाणक्य यांचा अपमान केला होता आणि त्यानंतरच चाणक्याने चंद्रगुप्त सोबत आपल्या नितीचा वापर करून नंद वंशाचा शेवट केला.

आचार्य चाणक्य हे विलक्षण प्रतिभा असलेले आणि एक अतिशय बुद्धिमान आणि चतुर व्यक्ती होते. त्यांनी आपल्या बुद्धीने काही मनोरंजक युद्ध रणनितीही तयार केल्या होत्या आणि त्यानंतर मगच क्षेत्रातील पाटलीपुत्र मध्ये नंद वंशाचा शेवट केला आणि विजय मिळवला.

तेथे नंद साम्राज्याचा शेवटचा शासक हरला आणि नंद साम्राज्याचा शेवट झाल्यानंतर चंद्रगुप्त मौर्य सोबत त्यांनी एका नव्या साम्राज्याची स्थापना केली ते म्हणजे 'मौर्य साम्राज्य'.

चाणक्य यांचा मृत्यू

ई. पूर्व 275 मध्ये चाणक्य यांचा मृत्यू झाला. चाणक्य यांचा मृत्यू ही त्यांच्या जन्मा प्रमाणेच एक रहस्य आहे. परंतु या विषयांमध्ये काही स्पष्ट सांगितले जाऊ शकत नाही की त्यांचा मृत्यू हा नेमका कसा झाला.

एका पौराणिक कथेनुसार त्यांनी जंगलांमध्ये खाणेपिणे त्याग करून आपल्या शरीराचा त्याग केला होता.

Read More
Categories