Motivational Story of Michael Jordan
![]() |
Motivational Story of Michael Jordan |
नाव - मायकेल जेफ्री जॉर्डन
जन्म
- 17 फेब्रुवारी 1963
रोजी
मी कधीच माझ्या आयुष्यात अयशस्वी होण्यास घाबरलो नाही.
जेव्हा आपण क्रिकेट चे नाव घेतो तेव्हा सर्वप्रथम सचिन तेंडुलकर हे नाव आपल्या समोर येतेच, तसेच जेव्हा बास्केटबॉल चे नाव घेतले जाते तेव्हा मायकेल जॉर्डन यांचेच नाव सर्वप्रथम घेतले जाते.
मायकेल
जॉर्डन हे एक
अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू आहेत. जॉर्डनने
शिकागो बुल्स आणि वॉशिंग्टन विझार्ड्ससाठी राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशन (एनबीए) मध्ये 15 सत्रे खेळली. जे आता निवृत्त
झाले आहेत, त्यांनी राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशनच्या माध्यमातून बरेच नाव कमावले.
बास्केटबॉलचा
सुपरस्टार मायकेल जॉर्डन हे कॉलेज, ऑलिम्पिक
आणि व्यावसायिक क्रीडा इतिहासातील सर्वात यशस्वी, लोकप्रिय आणि श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे.
मायकेल
यांचा जन्म एका अत्यंत गरीब घरात झाला होता. तो व त्याचे
कुटुंब एका छोट्या झोपडीत राहत होते. मायकेल
यांना नेहमीच काहीतरी मोठे करायचे होते जेणेकरुन
त्यांचा गरीबीचा
प्रश्न सुटू शकेल. जेव्हा
ते 13 वर्षांचे होते, तेव्हा त्याच्या वडिलांनी एक जुना वापरलेला
शर्ट दिला
आणि म्हणाले "सांग
याची किंमत किती आहेत बरं ?"
थोडा
वेळ विचार केल्यानंतर मायकेल म्हणाले "जवळपास एक डॉलर होईल".
मग त्यांचे वडील म्हणाले कि ह्या शर्ट
ला बाजारात घेऊन जा आणि याला
२ डॉलर्स ला विक. आता
मायकेल यांनी त्या शर्ट ला धुतले आणि
आयर्न नसल्यामूळे त्यांनी त्या शर्ट वर भरपूर ओझे
ठेवले. दुसऱ्या दिवशी तो शर्ट आधीपेक्षा
खूप चांगला दिसू लागला. यानंतर तो शर्ट घेऊन
ते जवळच्या रेल्वे स्थानकात गेले. कित्येक तासांच्या मेहनतीनंतर त्यांनी तो शर्ट २
डॉलर्स ला विकला आणि
आनंदाने घरी
परत आले आणि त्याच्या वडिलांना कमावलेले पैसे
दिले.
१५
दिवसांनंतर, त्याच्या वडिलांनी त्याच प्रकारे त्यांना आणखी एक शर्ट दिला
आणि म्हणले "जा आणि या
शर्टला २०
डॉलरला विक. मायकेल
थोड्या आश्चर्याने म्हणाले, "याचे २० डॉलर्स कोण
देईल" त्यावर वडील म्हणाले "एकदा प्रयत्न करून पहा".
मायकेल
यांना हे काम अश्यक्य
वाटत होते. त्यांनी थोडी शक्कल लढवली कपड्यावर मिकी माउसचे स्टिकर print करून घेतले आणि एका श्रीमंत विद्यार्थ्यांच्या शाळे जवळ उभे राहून विकण्यास सुरुवात केली. काही वेळाने एका लहान मुलाने त्याच्या वडिलांकडे हट्ट धरून तो शर्ट विकत
घेण्यास सांगितले आणि त्याच्या वडिलांनी तो शर्ट २०
डॉलर्स ला विकत घेतला
व त्या लहान मुलाच्या वडिलांनी ५
डॉलर्स अतिरिक्त दिले. अशा प्रकारे मायकेल यांनी ते जुने शर्ट
२५ डॉलर्समध्ये विकले आणि आनंदाने घरी आले आणि आपल्या वडिलांना सांगितले.
काही
दिवसांनंतर त्यांच्या वडिलांनी
आणखी एक शर्ट आणला
आणि यावेळी म्हणाले "याला घेऊन जा आणि २००
डॉलर्सला विक" यावेळी मायकेल काहीच बोलले नाही
आणि हा शर्ट
२०० डॉलर्सला कसा विकायचा याचाच विचार करू लागले. यावेळी
त्यांनी दोन
ते चार दिवस घेतले कारण त्याची किंमत एक डॉलर वरून २०० डॉलर्स पर्यंत कशी वाढवायची हे
त्यांना काळात नव्हते.
त्याच वेळी त्यांच्या शहरात एक प्रसिद्ध अभिनेत्री
येणार होती आणि त्यांना २०० डॉलर्सला शर्ट विकण्याचा मार्ग दिसत होता. ज्यावेळी ती अभिनेत्री त्यांच्या
शहरात आली त्याच वेळी पोलिसांना
चकवा देत ते त्या अभिनेत्रींपर्यंत
पोहोचले आणि अभिनेत्रीला त्या शर्ट वर ऑटोग्राफ मागितला.
या निरागस मुलाकडे पाहून
अभिनेत्रीने नकार दिला नाही आणि त्या अभिनेत्रीने त्या ड्रेसवर स्वत: चे ऑटोग्राफ दिले.
दुसर्या दिवशी मायकेल
बाजारात गेले आणि ऑटोग्राफ असलेला शर्ट २०० डॉलर्स ला विकण्यास सुरुवात
केली, त्याच क्षणी तेथे बरेच लोक ते घेण्यासाठी जमले.
गर्दी
इतकी वाढली की त्या कपड्यांची
खरेदी करण्यासाठी बोली
लागू लागली आणि शेवटी तो शर्ट एका
माणसाने २००० डॉलर देऊन विकत घेतला. त्यांना
पहिल्यांदा विश्वासच बसला नाही.
तो पैसा घेऊन ते घरी पोहोचले आणि
आपल्या वडिलांना पूर्ण गोष्ट सांगितली, ते ऐकताच त्याच्या
डोळ्यात अश्रू आले आणि ते म्हणाले की
"मुला, जीवनात तू काहीही करु
शकतोस".
हा
किस्सा त्यांनी एका मुलाखतीत सांगितला आणि म्हणाले
जर तुम्ही सकारात्मक विचार केला, तर तुम्हाला रस्ते आपोआप भेटत जातील.
मित्रांनो, नकारात्मक
विचारांसह आपण कधीही सकारात्मक जीवन जगू शकत नाही, म्हणून नेहमीच मोठा विचार करा आणि सकारात्मक विचार करा. आपल्याला मार्ग स्वतःच मिळत जाईल.
जर
तुम्हाला हि सत्यावर आधारित
गोष्ट आवडली असेल तर नक्कीच तुम्ही
तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. अश्याच नवीन नवीन गोष्टी आपल्या मातृभाषेतुन वाचण्यासाठी आपल्या फेसबुक पेज ला like करून आमचे मनोबल वाढवा.
आमचे फेसबुक Page Like करण्यासाठी इथे क्लिक करा ➡️ CLICK HERE
टिप्पणी पोस्ट करा