एपीजे अब्दुल कलाम- जनतेचे राष्ट्रपती

Apj Abdul Kalam Information In Marathi
Apj Abdul Kalam Information In Marathi
एपीजे अब्दुल कलाम यांचे संपूर्ण नाव अबुल पाकिर जैनुलअब्दीन अब्दुल कलाम मसऊदी हे आहे. त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. एपीजे अब्दुल कलाम हे एक इंजिनियर, वैज्ञानिक, लेखक आणि प्रोफेसर होते तसेच ते भारताचे 11 वे राष्ट्रपती देखील होते.सुरुवातीचा काळ

15 ऑक्टोबर 1931 मध्ये रामेश्वरम मधील धनुष्कोडी या गावांमध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म एका मुस्लीम परिवारात झाला. त्यांचे वडील तर जास्त शिकले नव्हते आणि ना ते जास्त श्रीमंत होते.

मच्छीमारांना नाव भाडेतत्त्वावर देणे हा त्यांच्या वडिलांचा व्यवसाय होता. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर त्यांच्या वडिलांचा खूप मोठा प्रभाव पडला.  त्यांचे वडील तर जास्त शिकलेले नव्हते परंतु त्यांनी दिलेले संस्कार हे पुढे अब्दुल कलाम यांच्या खूप कामी आले.


जेव्हा अब्दुल कलाम पाचवीत होते तेव्हा त्यांची विज्ञानाचे शिक्षक त्यांना पक्षी हवेत कसे उडतात याबद्दल शिकवत होते परंतु त्या मुलांना काहीच कळत नव्हते म्हणून ते विज्ञानाचे शिक्षक सर्व मुलांना घेऊन जवळच्याच समुद्रकिनारी गेले. 


तिथे त्यांनी हवेत उडणाऱ्या पक्षांबद्दल मुलांना प्रात्यक्षिक दाखवून शिकवले त्याच वेळी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या मनामध्ये ते हवेत संचार करण्याची इच्छा झाली आणि यामुळेच त्यांची विज्ञान क्षेत्रात रुची वाढू लागली.


माध्यमिक व महाविद्यालय शिक्षण 

त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते रामनाथपुरम येथे गेले. तिथे त्यांनी Schwartz Secondary School येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्याच शाळेतील काही शिक्षकांनचे कलाम हे अतिशय प्रिय विद्यार्थी होते.

1950 मध्ये कलाम यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून अंतरिक्ष विज्ञान मध्ये प्रवेश मिळवला. तेव्हा त्यांच्याकडे त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी 1 हजार रुपयांची गरज होती. त्या काळात ही रक्कम ही फार मोठी होती.


तेव्हा त्यांच्या मदतीला त्यांची बहीण म्हणजे जोहरा ह्या पुढे आल्या. त्यांनी स्वतःचे दागिने गहाण ठेवून पैशाची व्यवस्था केली आणि ते पैसे डॉक्टर कलाम यांना कॉलेजच्या ऍडमिशन साठी दिले आणि त्यांनी निश्चय केला कि मी मेहनत करीन आणि मेहनत करून माझ्या बहिणीचे दागिने लवकरात लवकर सोडून आणीन.


इथूनच मिसाईल मॅन या प्रवासाला सुरुवात झाली. या नंतरचे पुढील तीन वर्ष त्यांनी एरोनॉटिकल इंजीनियरिंग करण्यात घालवली.


यामध्ये त्यांना एक प्रोजेक्ट मिळाला परंतु या प्रोजेक्टवर काम फार हळू चालले होते त्यामुळे या प्रोजेक्टचे अध्यक्ष डॉक्टर कलाम यांच्यावर नाराज होते. तेव्हा त्या अध्यक्षांनी डॉक्टर कलाम यांना रागात सांगितले जर तु हा प्रोजेक्ट तीन दिवसांमध्ये मला पूर्ण करून दिला नाहीस तर तुला मिळणारी स्कॉलरशिप ही बंद करण्यात येईल. त्यामुळे जिद्दीला पेटून डॉक्टर कलाम यांनी तो प्रोजेक्ट 24 तासात, मात्र 24 तासात पूर्ण केला हे पाहून अध्यक्ष चकित झालेMissile Man बनण्याची सुरुवात

एम आय टी मधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कलाम हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बेंगलोर येथे एरोनॉटिकल इंजीनियरिंग मध्ये ट्रेनी इंजिनियर म्हणून काम करू लागले .

नंतर त्यांना आपले स्वप्न साकार करण्याचे दोन मार्ग दिसले. दोन ठिकाणी जागा सुटल्या होत्या त्यातील पहिली म्हणजे एअर फॉर्स आणि दुसरी म्हणजे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स.


दोन्ही ठिकाणी डॉक्टर कलाम यांनी अर्ज भरला. दोन्ही ठिकाणाहून त्यांना मुलाखतीची संधी भेटली. पहिल्यांदा ते दिल्लीतील मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मध्ये मुलाखतीसाठी गेले. ती मुलाखत चांगली झाली. 

नंतर, ते एअरफोर्सच्या मुलाखतीसाठी गेले तिथे मुलाखतीसाठी 25 लोक आले होते त्यामध्ये कलाम यांना नववे स्थान मिळाले आणि दुर्दैव म्हणजे यातील पहिल्या 8 लोकांना निवडण्यात आले. यामुळे डॉक्टर कलाम फार नाराज झाले आणि तिथून ते हृषीकेश ला गेले तिथे त्यांनी गंगेमध्ये स्नान केले व ते दिल्लीला गेले. 

तिथे त्यांनी पहिला इंटरव्यू दिला होता तिथून त्यांना अपॉइंटमेंट लेटर भेटले. 250 रुपये प्रति महिना सॅलरीवर त्यांना सीनियर सायंटिफिक असिस्टंट या पदावर नियुक्त करण्यात आले.

1992 ला ते इस्रो मध्ये रुजू झाले. नंतर त्यांनी प्रोजेक्ट डायरेक्टर सूत्रे हातात घेतल्यावर स्वदेशी उपग्रह सॅटलाईट लॉन्च वेहिकल 3 (SLV3) लॉंच करून भारताला नवीन यश मिळवून दिले.


1980 मध्ये डॉक्टर कलाम व त्यांच्या टीमने रोहिणी उपग्रह पृथ्वीच्या कक्षेमध्ये स्थापन करून भारताला इंटरनॅशनल स्पेस क्लबचे सदस्य बनवले.


अशाप्रकारे डॉक्टर कलाम यांनी स्वदेशी गोष्टींवर भर देऊन त्यांनी अग्नी, त्रिशूल आणि पृथ्वी यांसारखे मिसाईल बनवून यशस्वीरीत्या अवकाशात सोडले म्हणूनच त्यांना पुढे मिसाईल मॅन या नावाने ओळखले जाऊ लागले.


1998 मध्ये पोखरण येथे परमाणु शक्ती प्रयोग यशस्वी करण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते.राष्ट्रपती पदासाठी नियुक्ती


कलाम यांच्या कार्याला पाहून बीजेपी ने त्यांना राष्ट्रपती या पदाचे उमेदवार बनवले. डॉक्टर कलाम यांना 90 टक्के मते मिळाली आणि 25 जुलै 2002 मध्ये त्यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.


त्यांनी राष्ट्रपती या पदाचा कार्यकाल अतिशय उत्कृष्टपणे पार पाडला. 25 जुलै 2007 रोजी त्यांचा राष्ट्रपती या पदाचा कार्यकाल संपला.निवृत्तीनंतरच्या काळ

त्यांनी त्यांचे पुढील जीवन हे विद्यार्थ्यांच्या नावी केले. ते भारतात फिरून विद्यार्थ्यांना प्रेरित करू लागली आणि त्यांना देशातील महत्त्वपूर्ण विषयांबद्दल जाणीव करून देऊ लागले.

वयाच्या 83 व्या वर्षी, 27 जुलै 2015 रोजी IIM Shilong मध्ये ते विद्यार्थ्यांना संबोधित करत होते तेव्हाच ते स्वर्गवासी झाले. अशा या व्यक्तीवर संपूर्ण भारत देश अभिमान करतो. 
——————————————

एपीजे अब्दुल कलाम यांच्या आयुष्यातील ठळक मुद्दे

🔵 26 मे 2006 रोजी डॉक्टर कलाम यांनी स्वित्झर्लंडचा दौरा केला. यामुळे डॉक्टर कलाम यांच्या सन्मानार्थ स्विझर्लंड 26 मे हा दिवस विज्ञान दिन म्हणून घोषित केला.

🔵 डॉक्टर कलाम यांना तमिळ मध्ये कविता लिहिणे आणि विना वाजवणे फार आवडत होते.


🔵 सुरुवातीला डॉक्टर कलाम हे नॉन व्हेजिटेरियन होते परंतु नंतर ते ते पूर्णतः व्हेजिटेरियन झाले.


🔵 डॉक्टर कलाम हे पहिले असे राष्ट्रपती होते जे अविवाहित आणि जे एक वैज्ञानिक होते.


🔵 डॉक्टर कलाम जेव्हा राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांचा मिळणारा पगार हा ते दान करत होते त्यांनी त्यासाठी एक ट्रस्ट देखील बनवली होती त्याचे नाव त्यांनी ग्रामीण भागाला शहरी सुविधा पुरविणे (Providing Urban Amenities to Rural Areas(PURA)) हे होते. ह्या ट्रस्टमध्ये ते त्यांचा सर्व पगार दान करत असत.


🔵 डॉक्टर कलाम यांची आत्मकथा The Wings Of Fire (अग्निपंख) हे पुस्तक चायनीज तसेच इतर 13 भाषांमध्ये भाषांतर केलेले आहे.

——————————————

डॉक्टर कलाम यांना मिळालेले पुरस्कार

1981 - पद्मभूषण

1990 - पद्मविभूषण


1994 - विशेष शोधार्थी


1997 - भारतरत्न


1998 - इंदिरा गांधी राष्ट्रीय एकता पुरस्कार


1998 - वीर सावरकर पुरस्कार


2000 - रामानुजन पुरस्कार


2007 - डॉक्टर ऑफ सायन्स


2009 -  हुभर मेडल


2010 - डॉक्टर ऑफ इंजीनियरिंग


2014 - डॉक्टर ऑफ सायन्स


2015 - व्हीलर आयलंडचे नाव बदलून अब्दुल कलाम बेट करण्यात आले. 

तर मित्रांनो आपल्याला हीएपीजे अब्दुल कलाम यांची  माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्र-मैत्रिणी सोबत शेअर करा आणि ह्या माहितीमध्ये अजून काही माहिती पाहिजे असेल किंवा काही प्रतिसाद असतील तर कंमेंट मध्ये आम्हाला नक्कीच कळवा.  धन्यवाद!!!
——————————————

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने