Tuna Fish In Marathi | मराठी नेम ऑफ टुना फिश

Tuna Fish In Marathi या लेखामध्ये Marathi Name Of Tuna Fish तसेच टूना मासा माहिती मराठी बद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे. कदाचित काही लोकांना टूना फिश माहिती नसेल की तो त्याच्या गुणधर्मांसाठी ओळखला जातो. तसेच काही लोकांना असेही प्रश्न पडले असतील की, What Is Marathi Name Of Tuna Fish, what is tuna fish called in marathi तसेच tuna fish benifits in marathi, Tuna Fish Meaning In Marathi?

तर आपण या लेखामध्ये Tuna Fish Information In Marathi पाहणार आहोत. मासे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे सर्व पोषक घटक माशांमध्ये असतात. सर्वात चविष्ट तसेच शरीरासाठी पौष्टीक असणाऱ्या माश्यांपैकी टूना फिश याबद्दल म्हणजेच कुपा मासा याबद्दल माहिती आपण बघणार आहोत.

टूना फिश प्रोटीन, पोटॅशिअम आणि ऊर्जेचा चांगला स्रोत आहे. जर तुम्ही मासे खाण्याचे शौकीन असाल तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये टूना फिशचा समावेश करू शकता.

टूना मासा प्रामुख्याने खारट पाण्यात म्हणजेच समुद्रात आढळणारा मासा आहे. टूना फिश ची लांबी 1 ते 15 फूट पर्यंत असू शकते. यामध्ये ओमेगा एसिड 3 आणि विटामिन बी असते, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. टूना फिश वजन कमी करण्यास, हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतो. या लेखा मध्ये आपण टूना फिश बदल माहिती जाणून घेणार आहोत.

Tuna Fish In Marathi, मराठी नेम ऑफ टुना फिश

टूना फिशचे मराठीत काय नाव आहे ? Tuna Fish Name In Marathi

टूना फिश ला मराठीत कुपा मासा (Kupa Fish) असे म्हणतात. टूना माश्याचे वैज्ञानिक नाव थुनिनी असे आहे. टूना माशाच्या जगभरात अनेक प्रजाती आढळतात, तसचे हे मासे खारट पाण्यामध्ये सापडतात. टूना फिश मध्ये विटामिन बी 6, विटामिन बी 12, विटामिन डी, पोटॅशियम आणि फॉस्फरस असते तसेच यामध्ये थायमिन, मॅग्नेशियम आणि आयोडीन ही असते जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे.

टूना फिशचे फायदे | Benefits of Tuna Fish

टूना फिशचे अनेक फायदे आहेत, टूना फिश मुळे हाडे मजबूत होतात, तसेच हृदयविकाराचे प्रमाण देखील कमी होते. परंतु अनेकांना त्याच्या गुणधर्मांबद्दल फार कमी माहिती आहे की टूना फिश आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

1. हाडांसाठी टूना फिशचे फायदे:

जसे कि आपल्या सर्वाना माहिती आहे हाडे मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन डी आणि कॅल्शिअम महत्वाचे आहेत. टूना माश्यामध्ये व्हिटॅमिन डी असल्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. तर टूना फिश कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत आहे ज्यामुळे हाडांचा कमकुवतपणा दूर होण्यास मदत होते. त्यामुळे हाडे निरोगी राहतात आणि हाडांच्या आजारांचा धोकाही कमी होतो.

2. टूना फिशचे त्वचेसाठी फायदे:

टूना फिश त्वचेसाठीही फायदेशीर मनाली जाते. त्यात अँटी-एजिंग आणि अँटी-रिंकल गुणधर्म आहेत, जे त्वचेतील वाढत्या वयानुसार दिसणाऱ्या लक्षणांना रोखण्यासाठी प्रभावी ठरते. त्यामुळे टूना मासा खाणे हे त्वचेसाठी फायदेशीर म्हंटले जाते.

3. शक्ती वाढवण्यासाठी टूना फिशचे फायदे:

शरीरातील अशक्तपणामुळे अनेक आजारांना आपल्याला तोंड द्यावे लागते. त्यामुळे शरीराची ताकद वाढवण्यासाठी व्हिटॅमिन बी12 आवश्यक असते. टूना फिशमध्ये व्हिटॅमिन बी 12 तसेच फोलेटचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे शरीर मजबूत होते. टूना फिश स्नायू मजबूत करते तसेच शरीरात लाल पेशी तयार करण्यास मदत करते.

4. टूना फिशचे डोळ्यांसाठी फायदे:

डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही टूना फिशचे सेवन करू शकता. टूना फिशमध्ये असणाऱ्या ओमेगा 3 मुळे डोळ्यांच्या आजारांपासून संरक्षण होते. डोळ्यांच्या आजारापासून दूर राहण्यासाठी डॉक्टर टूना फिश खाण्याचा सल्लाही देतात.

5. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी:

विविध प्रकारच्या व्हायरस, बॅकटेरिया पासून संरक्षण करण्यासाठी शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढणे आवश्यक आहे. टूना माशामध्ये ओमेगा 3 फैटी एसिड आहे जे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करते. त्यामुळे इम्युनिटी वाढवण्यासाठी टूना फिशचे सेवन केले पाहिजे.

टूना फिश मधील पोषक तत्व:

टूना फिश पोषक तत्त्वांपासून परिपूर्ण असते. यामध्ये कॅलरी, प्रथिने, कॅल्शियम, ऊर्जा, आणि लोह भरपूर प्रमाणात असते. याशिवाय या माशात मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि झिंक देखील असते. टूना फिश व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचा चांगला स्रोत आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी 12 भरपूर आहे. तसेच, ट्यूना फिशमध्ये हेल्दी फैट असते, ज्यामुळे स्नायू मजबूत होण्यास मदत होते.

Read More

टूना फिशचे नुकसान:

गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी हा मासा खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

लहान मुलांना टूना फिश प्रमाणात खायला द्यावा, जेणेकरून त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाही.

टूना माश्याचे सेवन रोज करू नये.

स्वयंपाक करण्यापूर्वी टूना फिश स्वच्छ धुवून घ्यावा म्हणजे संसर्ग होणार नाही.

Benefits of Tuna Fish In Marathi या लेखामध्ये आपण टूना फिशची माहिती पहिली, तुम्हाला tuna fish name in marathi हि पोस्ट कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. तसेच तुम्हाला टूना फिश म्हणजे काय? ह्या पोस्ट बद्दल काही प्रतिक्रिया द्यायची असेल किंवा तुमच्या कडे टूना फिशचे फायदे तसेच नुकसान बद्दल काही माहिती असेल तर आम्हाला नक्की कळवा आम्ही ती माहिती या लेखामध्ये समाविष्ट करू.

तुम्हाला टूना फिशचे मराठी नाव हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणींना तसेच परिवारातील इतर सदस्यांना व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटरद्वारे नक्की शेअर करा.

या लेखा द्वारे तुम्हाला माहिती पुरवणे हा आमचा उद्देश आहे. आम्ही तुम्हाला कोणत्याही औषधाचा किंवा उपचाराचा सल्ला देत नाही. तुम्हाला केवळ डॉक्टरच चांगला सल्ला देऊ शकतात.

Read More
Categories