कबड्डी खेळाची संपूर्ण माहिती | Kabaddi Information In Marathi

Kabaddi Information in marathi

कबड्डी हा एक अत्यंत लोकप्रिय सांघिक खेळ आहे, ज्यात कौशल्य, ताकत आणि चतुराई या गुणधर्मांची आवश्य आवश्यकता असते. कबड्डी या खेळाची ची ऊत्पत्ती ४००० वर्षांपूर्वी भारतात झाली आहे. हा खेळ प्रामुख्याने भारतात खेळला व आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो. या खेळाचा मुख्य उद्देश स्वतःचे रक्षण करणे हा गुण विकसित करणे होता. हा खेळ सोपा आणि स्वस्त आहे तसेच या खेळासाठी विशिष्ट मैदानाची गरज नसते. कब्बडी या खेळाला विविध नावे आहेत, जसे महाराष्ट्रात - हू-तू-तू, चेन्नईत - चेडूयुडू, पंजाबात - झाबर गंगा / सौची पक्की अशी विविध प्रांतानुसार विविध नावे आहेत. कबड्डी हा खेळ महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरात मध्ये खूप प्रसिद्ध आहे.

कबड्डी खेळाचा इतिहास

पूर्वीच्या काळात हा खेळ केवळ मनोरंजनासाठी वापरला जात नसे तर शाररिरीक शक्ती व स्वतःचे सामर्त्य वाढवण्यासाठी तसेच आत्म रक्षन(Self-Defense ) वृत्ती वाढवण्यासाठी खेळला जात असे. मूलतः ह्या खेळाचे अस्तित्व महाभारतातील हिंदु पौराणिक कथांमध्ये आढळून येते.इसवी सन १९१८ मध्ये कबड्डीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळाला. यामध्ये महाराष्ट्राचा खूप मोठा वाट होता.

कबड्डीसाठी लागणारे मैदान – Kabaddi Ground

Kabaddi ground, कबड्डीसाठी लागणारे  मैदान
  • कबड्डीसाठी लागणारे मैदान हे १२.५० मीटर लांबी व १० मीटर रुंदी चे पुरुषांकरिता असते. तसेच महिलांकरिता आणि लहान मुलांकरिता ११ मीटर लांब आणि ८ मीटर रुंदीचे मैदान बनविले जाते.
  • मैदान शक्यतो माती व शेणखत यांनी बनविले जाते. परंतु आता मॅट सुद्धा वापरले जाते.
  • मैदानाच्या मध्यभागी एक रेषा आखली जाते जी मैदानाला दोन सामान भागात विभागते. या दोन भागांना कोर्ट असे संबोधले जाते.
  • प्रत्येक लॉबीच्या दोन्ही बाजूंना राखीव क्षेत्र प्रत्येकी १-१ मीटरचे असते. या क्षेत्राला लॉबी असे संबोधले जाते.
  • तसेच मध्यरेषेपासून सुमारे ३ मीटर अंतरावर एक रेषा असते जिला निदान रेषा म्हणजेच टच लाइन (Touch Line ) म्हणतात.
  • या निदान रेषेपासून १ मीटर अंतरावर बोनस रेषा असते.

कबड्डी खेळाचे नियम

  • जो संघ नाणेफेक जिंकतो तो संघ 'अंगण' किंवा 'चढाई' यापैकी एक निवडतो.
  • जो व्यक्ती चढाई करतो त्याला 'कबड्डी ' हा शब्द स्पष्टपणे आणि सलग करावा लागतो तसे न आढळलयास पंच त्याला ताकीत देऊन त्यांच्या विरुद्ध सांगाल संधी देतो.
  • चढाई करणारा जेव्हा विरुद्ध संघातील खेळाडूला स्पर्श करून आपल्या क्षेत्रात येईल तेव्हा त्याच्या संघाला १ गुण देण्यात येईल.
  • रक्षण करणाऱ्या संघने जर चढाई करणाऱ्या खेळाडूस यशस्वीरीत्या पकडून त्याची चढाई व्यर्थ केली तर रक्षण करणाऱ्या संघाला १ गुण देण्यात येतो.
  • जर चढाई करणारा खेळाडू रक्षण करणाऱ्या संघाच्या पकडीतून यशस्वीरीत्या निसटून मध्य रेषा पार केली तर ज्या ज्या रक्षण करणाऱ्या खेळाडूंनी चढाई करणाऱ्या खेळाडूस पकडण्याचा प्रयत्न केला किंवा स्पर्श केला असेल ते सर्व खेळाडू बाद होतात.
  • जेव्हा एखाद्या संघातील सर्व खेळाडू बाद होतात तेव्हा त्याच्या विरुद्ध संघाला २ गुण अतिरिक्त देण्यात येतात.
  • जो खेळाडू चढाई करण्यासाठी जातो त्याची चढाई तेव्हाच वैध मानली जाते जेव्हा तो निदान रेषा ओलांडून किंवा स्पर्श करून येतो. तसे न झाल्यास तो खेळाडू बाद म्हणून घोषित करण्यात येतो व त्याच्या विरुद्ध संघास १ गुण देण्यात येतो.
  • जर कोणताही खेळाडू खेळाच्या वेळी अंतिम रेषा ओलांडून बाहेर गेला तर त्याला बाद म्हणून घोषित केले जाते.
  • चढाई करणारा खेळाडू जर विपक्षी खेळाडूंची संख्या ६ किंवा ७ असेल तर बोनस रेषेला स्पर्श करून १ गुण घेऊ शकतो.
  • ३ किंवा त्यापेक्षा कमी रक्षण करणाऱ्या खेळाडूंनी जर चढाई करणाऱ्या खेळाडूस पकडले तर रक्षण करणाऱ्या संघाला १+१ असे २ गुण देण्यात येतात.
  • चढाई करणारा खेळाडू जेव्हा विपक्षी खेळाडूला स्पर्श करेल तेव्हाच तो आणि विपक्षी खेळाडू राखीव क्षेत्रामध्ये (लॉबी ) जाऊ शकतात. जर चढाई करणारा खेळाडू विपक्षी खेळाडूला स्पर्श ना करता राखीव क्षेत्रामध्ये जातो तर तो बाद ठरवण्यात येतो.
  • प्रत्येक संघामध्ये किमान १० आणि कमाल १२ खेळाडू असणे आवश्यक असते. त्यातील फक्त ७ खेळाडू मैदानात खेळतात. बाकीचे ३ किंवा ५ राखीव म्हणून असतात.
  • सामन्याचा कालावधी हा कमीत कमी ४० मिनिटांचा असतो. हे ४० मिनिटे २०-२० मिनिटांमध्ये विभागलेले असतात.

तर मित्रानो आपल्याला हि माहिती आवडलयास नक्कीच आम्हाला comment बॉक्स मध्ये कळवा आणि जर आपल्याकडे काही suggestions असतील तर तेही आमच्याशी नक्कीच share करा. आमच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका.

Read More
Categories