Share Market Information In Marathi | शेअर मार्केट म्हणजे काय? - शेअर बाजार संपूर्ण माहिती

Share Market Information In Marathi | शेअर मार्केट म्हणजे काय?

शेअर मार्केट म्हणजे काय? हे तुम्ही ऐकून असाल किंवा शेअर बाजार बद्दल तुम्ही बऱ्याच लोकांकडून ऐकलेही असेल, परंतु शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी, किंवा शेअर मार्केट मधून पैसे कसे कमवावे याची संपूर्ण माहिती Share Market Information In Marathi या लेखामध्ये दिलेली आहे.

Share Market Information In Marathi

पैसा तर सर्वचजण कमवतात. काही लोक नोकरी करून तर काही स्वतःचा व्यवसाय उभारून पैसे कमवतात, आणि काही लोक योग्य अभ्यास करून, माहिती मिळवून शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवून पैसे कमवतात. या पोस्ट मध्ये आपण शेअर मार्केट ची संपूर्ण माहिती तसेच Mumbai Share Market Information In Marathi बघणार आहोत, आणि आम्हाला आशा आहे की, ही माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल, आणि तुमच्या मनात शेअर मार्केट बद्दल ची जी भीती असेल ती नाहीशी होऊन तुम्हाला शेअर मार्केट हे पैसे कमवण्याचे नवीन साधन मिळेल.

शेअर मार्केट म्हणजे नक्की काय? What is Share Market?

शेअर मार्केट आणि स्टॉक मार्केट हे असे मार्केट आहे जेथे शेअर ची खरेदी आणि विक्री होते आणि शेअर हा इंग्रजी शब्द आहे ज्याचा अर्थ भाग किंवा हिस्सा असा आहे. एखाद्या व्यक्तीने कंपनीचा शेअर विकत घेतला असेल तर तो व्यक्ती त्या शेअर्सचा मालक बनतो. उदा., तुम्ही एखाद्या कंपनीचे 10 शेअर्स 2000 रुपयांना खरेदी केले, तर तुम्ही त्या कंपनीचे शेअर होल्डर्स झालात, आणि कंपनी तुमचे शेअर्स तुम्हाला केव्हाही विकण्याची परवानगी देते.

शेअर खरेदी करून, आपण त्या कंपनीमध्ये पैसे गुंतवू शकता. जसजशी कंपनी वाढत जाईल तसतशी तुमच्या शेअर्सची किंमतही वाढेल, आणि ते शेअर्स विकून तुम्ही नफा कमवू शकता. शेअर्सच्या किंमतीवर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. कधीकधी किंमत वाढू शकते आणि कधीकधी ती घसरूही शकते. जसे तुम्ही स्टॉक मार्केट मधून पैसे कमवू शकता तसेच पैसे घालवूही शकता कारण शेअर मार्केट मध्ये चढ उतार नेहमी होत असतात.

एखादी कंपनी पब्लिक मध्ये शेअर्सची विक्री का करते? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. एखाद्या कंपनीला तिच्या विकासासाठी, विस्तारासाठी आणि इतर अनेक कारणांसाठी भांडवल किंवा पैशांची आवश्यकता असते आणि या कारणास्तव ती लोकांकडून पैसे जमा करते आणि या प्रक्रियेद्वारे कंपनी समभाग जारी करते त्याला इनिशिएशनल पब्लिक ऑफर (IPO) असे म्हणतात.

तुम्ही लोकांना बुल मार्केट (Bull market) किंवा बेअर मार्केट (Bear market) या बद्दल बोलताना ऐकले असेल. Bull market हे असे मार्केट आहे ज्यामध्ये शेअर ची किंमत वाढते किंवा वाढण्याची अपेक्षा असते, आणि Bear market मध्ये शेअर ची किंमत कमी होते किंवा आणखीन घसरण्याची शक्यता असते. भारतात शेअर्स ची खरेदी आणि विक्री प्रामुख्याने दोन Stock Exchange Market मध्ये होते. National Stock Exchange ज्याला NSE असेही म्हणतात आणि Bombay Stock Exchange म्हणजेच BSE. हे दोन्ही भारतातील प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत जे SEBI (Securities and Exchange Board of India) द्वारे नियंत्रित आहेत.

भारतीय शेअर बाजाराचा इतिहास

BSE म्हणजेच Bombay Stock Exchange आशिया खंडातील पहिला स्टॉक एक्सचेंज आहे ज्याची स्थापना 1875 मध्ये झाली. भारत स्वातंत्र झाल्यानंतर सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट अ‍ॅग्रीमेंट अ‍ॅक्ट 1956 च्या अंतर्गत मान्यता मिळालेला हा देशातील पहिला स्टॉक एक्सचेंज आहे.

BSE (मुंबई शेअर बाजार) ची सुरुवात 1850 मध्ये मुंबईतील एका वटवृक्षाखाली झाली. बीएसईची स्थापना 1875 मध्ये 'नेटिव्ह स्टॉक ब्रोकर असोसिएशन' म्हणून केली गेली, ज्याला नंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असे नाव देण्यात आले.

शेअर मार्केट महत्वाचे का आहे?

प्रत्येक कंपनीचा विस्तार करण्यासाठी आणि वाढीसाठी शेअर बाजाराची महत्वाची भूमिका आहे. आयपीओद्वारे कंपन्या शेअर्स जारी करतात आणि त्या बदल्यात विविध उद्देशाने वापरला जाणारा निधी प्राप्त करतात. आयपीओनंतर कंपनी स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होते आणि त्यामुळे सामान्य व्यक्तीलाही प्रत्येक कंपनीचे स्टॉक खरेदी करता येऊ शकतात.

आपण शेअर बाजारात ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर असू शकता. ट्रेडर कंपनीमध्ये कमी कालावधीसाठी गुंतवणूक करतात तर इन्व्हेस्टर कंपनीमध्ये जास्त कालावधी साठी गुंतवणूक करतात. तुमच्या आर्थिक गरजा नुसार तुम्ही कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकता.

कंपनीमधील गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणूकीचा उपयोग जीवनातील लक्ष्य पूर्ण करण्यास करू शकतात. प्रत्येकाच्याच आयुष्यात पैसा खूप महत्वाचा असतो आणि आज जगामध्ये सर्वच जण पैशाला खूप महत्व देतात. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे हा एक मुख्य प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या द्वारे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कधीही शेअर खरेदी किंवा विक्री करून पैसा कमवू शकता.

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी । How to Invest In Share Market

प्रत्येक कंपनी आपले शेअर्स NSE आणि BSE या स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध करते आणि तेथूनच आपण शेअर्सची खरेदी आणि विक्री करतो. शेअर मार्केट मध्ये शेअर खरेदी करण्यासाठी तुम्हाला डिमॅट अकाऊंट (Demat Account) उघडावे लागेल. तुम्ही Demat Account दोन प्रकारे काढू शकता.

पहिला मार्ग म्हणजे तुम्ही ब्रोकर कडे जाऊन डिमॅट खाते उघडू शकता. शेअर मार्केट मध्ये शेअरची खरेदी आणि विक्री ही दलालामार्फत म्हणजेच ब्रोकर द्वारे केली जाते. हे दलाल सेबी संस्थेत नमूद झालेले असतात आणि यांच्याकडे सेबीचा अधिकृत परवाना असतो.

डिमॅट अकाऊंट मध्ये तुमचे शेअर चे पैसे ठेवले जातात ज्याप्रमाणे आपण आपल्या बँकेच्या खात्यात पैसे ठेवतो त्याचप्रमाणे. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमचे डीमॅट खाते असणे गरजेचे आहे. डिमॅट अकाऊंट उघडण्यासाठीचे वय 18 पेक्षा जास्त असायला हवे. दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये जाऊन तुमचे डिमॅट अकाऊंट उघडू शकता.

डिमॅट अकाऊंट उघडण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:

डिमॅट अकाऊंट उघडण्यासाठी तुमचे बँकेमध्ये सेविंग अकाऊंट (Saving Account) असणे आवश्यक आहे आणि पुराव्यासाठी Pan card ची कॉपी आणि Address proof गरजेचं आहे, तसेच

  • आधार कार्ड (मोबाइल नंबर आधार कार्ड शी लिंक असणे आवश्यक आहे)
  • पॅन कार्ड
  • बँक पासबूक किंवा बँक स्टेटमेंट
  • फोटो

ट्रेडिंगचे प्रकार

Scalping (स्केलपिंग): या ट्रेडिंग च्या प्रकारामध्ये शेअर काही सेकंदांसाठी किंवा काही मिनिटांसाठी आपल्या जवळ ठेवला किंवा होल्ड केला जातो यालाच स्केलपिंग असे म्हणतात.

Intraday Trading (इंट्राडे ट्रेडिंग): इंट्राडे ट्रेडिंग मध्ये तुम्ही शेअर ची खरेदी आणि विक्री एकाच दिवशी करू शकता, इंट्राडे ट्रेडिंग करणे थोडे अवघड असते तसेच यामध्ये जोखीमही जास्त असते.

Swing Trading (स्विंग ट्रेडिंग): या ट्रेडिंग च्या प्रकारामध्ये शेअर खरेदी केल्यापासून तो एका आठवड्यापर्यंत होल्ड करता येतो.

Positional Trading (पोजिशनल ट्रेडिंग): पोजिशनल ट्रेडिंग मध्ये तुम्ही शेअर खरेदी करून तो तुमच्याजवळ एक ते तीन महिन्यांपर्यंत ठेऊ शकता, याच ट्रेडिंग ला शॉर्ट टर्म ट्रेडिंग असेही म्हणतात.

ट्रेडिंग करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा:

तणावाखाली येऊन किंवा भावनिक निर्णय घेऊन ट्रेडिंग करणे टाळा.

एकाच दिवशी जास्त वेळा ट्रेडिंग करू नका.

ट्रेडिंग करताना Stop Loss लावायला विसरू नका.

जे शेअर्स नेहमी पडत असतील किंवा ज्यामध्ये मुमेंट होत नसेल अश्या स्टॉक मध्ये ट्रेडिंग करू नका.

बजेट दिवस, सणांच्या दिवशी, मोठ्या घडामोडी तसेच इलेक्शन निकाल अशा दिवशी ट्रेडिंग करणे टाळा.

भारतातील टॉप 10 यशस्वी गुंतवणूकदार

राकेश झुंझुनवाला

राधाकिशन दमानी

रमेश दमानी

रामदेव अग्रवाल

विजय केडिया

नेमीश शाह

पोरिंजू वेलियाथ

डॉली खन्ना

आशिष कचोलिया

चंद्रकांत संपत

Share Market information in Marathi language ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला नक्की कळवा, तसेच शेअर बाजार संपूर्ण माहिती हा लेख तुम्ही तुमच्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना नक्की शेअर करा.

Read More
Categories