LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

बंद होणार HDFC लिमिटेडच्या शेअर्सचं ट्रेडिंग! जाणून घ्या कारण..

Published By LifelineMarathi.com
On

HDFC Limited ​​देशातील सर्वात मोठी खासगी बँक HDFC Bank मध्ये 1 जुलैपासून विलीनीकरण होणार आहे. दीपक पारेख यांनी मंगळवार 27 जून रोजी ही माहिती दिली आहे.

HDFC–HDFC Bank विलीनीकरण:

दीपक पारीख हे एचडीएफसीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे या विषयासंदर्भात ३० जून रोजी एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड यांच्यात बैठकही होणार आहे. त्यामुळे, एचडीएफसी-एचडीएफसी बँक विलीनीकरणाअंतर्गत, एचडीएफसी लिमिटेडची एचडीएफसी बँकमध्ये 41 टक्के हिस्सेदारी असेल.

या विलीनीकरणानंतर एचडीएफसीचे शेअर्स संपुष्टात येतील. एचडीएफसी बँकेचे शेअर्स प्रत्येक एचडीएफसी शेअरधारकाला दिले जातील. अशा प्रकारे, 13 जुलैपासून, एचडीएफसीचे शेअर्स एचडीएफसी बँकेच्या शेअर्सप्रमाणे व्यवहार करण्यास सुरुवात होईल.

दीपक पारेख यांनी पुढे असेही सांगितले की,आता प्रत्येक शाखेत मॉर्गेज सेलिंग होईल. एचडीएफसी बँक ज्या प्रकारे आपले कार्य करत आहे त्याप्रमाणे हाउसिंग पोर्टफोलियो देखील वाढत राहील.

दीपक पारेख यांनी 2015 मध्येच सांगितले होते की, परिस्थिती योग्य असल्यास एचडीएफसीचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण केले जाईल. पण आता हा क्षण आला आहे आणि 2022 मध्ये विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू झाली.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या नफा-तोट्याला आम्ही जबाबदार नाही. त्यामुळे तुम्ही समजून घेऊन गुंतवणूक करा. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.