LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

ऑटोमोबाईल सेक्टर मधील ही कंपनी देणार आहे 140 रुपयांचा डिव्हिडंट

Published By LifelineMarathi.com
On

विविध कंपन्यांकडून डिव्हीडंट देण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांवर पुन्हा एकदा डिव्हीडंटचा पाऊस पडणार आहे. वेगवेगळ्या कंपन्यांकडून गुंतवणूकदारांना डिव्हीडंट मिळणार आहे. त्यामध्ये ऑटो सेक्टर मधील एक नामांकित कंपनीचा ही समावेश आहे. चला तर मग पाहूयात कोणती आहे ती ऑटोमोबाईल सेक्टर मधील भरमसाठ डिव्हीडंट देणारी कंपनी.

Bajaj Auto Ltd will give a dividend of 140 rupees

बजाज ऑटो या मोटार सायकल विकणाऱ्या कंपनीकडून तिच्या योग्य त्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 140 रुपये इतका मोठा डिव्हीडंट देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. मागील आठवड्यामध्ये बजाज ऑटो लिमिटेड शेअर मध्ये किंचित उसळी पहायला मिळाली.

बजाज ऑटो लि. कंपनीकडून शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, दहा रुपये फेस व्हॅल्यू असणाऱ्या एका शेअरवर 1400 टक्के इतका डिव्हीडंट दिला जाईल. याचा अर्थ असा की, कंपनीमधील गुंतवणूकदारांना कंपनीकडून 140 रुपये प्रति शेअर इतका मोठा डिव्हीडंट दिला जाईल. बजाज ऑटो लिमिटेड कंपनीकडून डिव्हिडंट साठी 30 जून 2023 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांची नावे रेकॉर्ड बुक मध्ये असतील त्या गुंतवणूकदारांना या डिव्हिडंटचा लाभ मिळेल.

मागील सहा महिन्यांतील शेअरच्या हालचालीवर नजर टाकली तर शेअर्स मध्ये ३० टक्क्यांची वाढ झालेली पाहायला मिळेल. एका वर्षापासून जा गुंतवणूकदारांनी बजाज ऑटो लि. या कंपनीचे शेअर होल्ड करून ठेवले आहेत त्यांना आतापर्यंत 19 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळाला असेल. मागील पाच वर्षांमध्ये या शेअर्सने 64 टक्के पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुमच्या नफा-तोट्याला आम्ही जबाबदार नाही, त्यामुळे तुम्ही समजून घेऊन गुंतवणूक करा. तसेच तुमची आर्थिक गुंतवणूक करण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्यावा.