LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

ही कंपनी देणार आहे चार 'बोनस शेअर' - 12 रुपयांचा शेअर आणि 77 रुपयांचा डिव्हीडंट

Published By LifelineMarathi.com
On

Penny stock Taparia Tools Ltd ने गुंतवणूकदारांना 4 बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यासोबतच या कंपनीने 77.50 रुपयांचा डिव्हिडंट ही जाहीर केला आहे. म्हणजे या कंपनीतील गुंतवणूकदारांचा फायदाच फायदा.

Taparia Tools ltd Gives 77 rupees dividend and 4 bonus shares

जशी कंपनीने बाजारामध्ये याची घोषणा केली तशी शेअर्स मध्ये तेजी पहायला मिळाली. तसेच शुक्रवारी Taparia Tools ltd या कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला होता.

कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहिती मध्ये असे सांगितले गेले आहे की कंपनी 1 शेअरवर 4 शेअर बोनस म्हणून देणार आहे, ज्यासाठी 11जुलै 2023 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे म्हणजेच ज्या गुंतवणूकदाराकडे या कंपनीचे शेअर्स असतील त्यांना याचा फायदा नक्कीच होईल. आज शेअर बाजारामध्ये कंपनी एक्स डिव्हीडंट ट्रेड करत आहे.

शुक्रवारी 5 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागल्यानंतर कंपनीच्या शेअर्सची किंमत 11.57 रुपयांवर पोहोचली. Taparia Tools Ltd शेअर्सच्या किमतीत गेल्या सहा महिन्यात 10 टक्क्याहून अधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे तसेच एक वर्ष गुंतवणूक असलेल्या गुंतवणूकदारांना आत्तापर्यंत 15 टक्क्याहून अधिक फायदा झालेला आहे.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुमच्या नफा-तोट्याला आम्ही जबाबदार नाही, त्यामुळे तुम्ही समजून घेऊन गुंतवणूक करा. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.