LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

IBM ची सर्वात मोठी डील - 4.6 बिलियन डॉलर मध्ये Apptio ला विकत घेणार

Published By LifelineMarathi.com
On

तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी IBM ने सोमवारी असे जाहीर केले की, त्यांनी 4.6 बिलियन डॉलर मध्ये Apptio खरेदी करण्यासाठी विस्टा इक्विटी पार्टनर सोबत करार केला. एप्टियो वॉशिंग्टन डीसी मध्ये स्थित आहे जी फायनान्शियल ऑपरेशन आयटी मॅनेजमेंट आणि ऑप्टिमायझेशन सॉफ्टवेअर प्रदान करते.

मीडिया रिपोर्टनुसार आयटीची ऑटोमेशन क्षमता वाढवण्याचा यामागील उद्देश आहे. IBM च्या IT ऑटोमेशन सॉफ्टवेअर आणि त्याच्या AI प्लॅटफॉर्मसह च्या सोबतच Aptio क्लाइंटचा IT खर्च कमी करण्यास, ठोस फाइनेंशिल वैल्यू तसेच व्यवसाय सुधारण्यास मदत करेल.

आपल्या बॅलन्स शीटवरील रोख रकमेद्वारे हा करार पूर्ण केला जाईल असे IBM च्या वतीने सांगण्यात आले आहे. IBM ला हा करार पूर्ण करण्यासाठी विविध नियामकांकडून मान्यता घ्यावी लागेल. Apptio चे शेअर्स 2016 मध्ये न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्ट झाले होते. 2019 मध्ये, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सने 1.94 अरबच्या डीलमध्ये ते विकत घेतले आणि त्यानंतर त्याचे शेअर्स डिलिस्ट केले गेले.

कंपनीची स्थापना सन 2007 मध्ये सनी गुप्ता आणि कर्ट शिनटाफर यांनी केली होती. आयबीएम चे सीईओ आणि चेअरमन अरविंद कृष्णा यांनी सांगितले आहे की टेक्नॉलॉजी बिजनेस मध्ये वेगाने बदल होत आहेत जे आपण या आधी कधीच पाहिले नव्हते. एप्टियो एक फायदेशीर टेक बिझनेस मॅनेजमेंट सोल्युशन्स कंपनी आहे ज्याचे 1500 हून अधिक ग्राहक आहेत.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही गुंतवणूक केली असेल तर तुमच्या नफा-तोट्याला आम्ही जबाबदार नाही, त्यामुळे तुम्ही समजून घेऊन गुंतवणूक करा. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.