LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

युनियन बँकेकडून मिळाली करोडोंची ऑर्डर जाणून घ्या कोणती आहे ‘ती’ IT कंपनी

Published By LifelineMarathi.com
On

गेल्या तीन वर्षात आयटी क्षेत्रातील कंपनी Dynacons Systems and Solutions Ltd च्या शेअर्समध्ये 2200 टक्क्यांनी वाढ झाली आहे, आणि आता कंपनीने गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे, युनियन बँक ऑफ इंडिया च्या वतीने Dynacons Systems and Solutions Ltd ला करोडो रुपयांची ऑर्डर देण्यात आली आहे.

युनियन बँक ऑफ इंडियाकडून मिळाली करोडो रुपयांची ऑर्डर:

सध्या या कंपनीचे शेअर, 26 जून पर्यंत सुमारे तीन टक्क्यांच्या घसरणीसह 500.10 वर ट्रेड करत आहेत. Dynacons Systems and Solutions Ltd ने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, युनियन बँक ऑफ इंडियाने या आयटी कंपनीला 79.47 कोटी रुपयांची ऑर्डर दिली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने, हाइपर कनवजेंड इंफ्रास्ट्रक्चर एंड सॉफ्टवेयर सॉल्यूशन डेवलप करण्याचे कार्य Dynacons Systems and Solutions Ltd या कंपनीला दिले आहे.

तीन वर्षात कंपनीने दिलेले रिटर्न - 9 जून पर्यंत या कंपनीचे शेअर्स 22.20 रुपयांवर ट्रेड करत होते तर आज त्यांनी पाचशे रुपयांच्या वरचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या तीन वर्षात या कंपनीचे शेअर 2200 टक्क्यांनी वाढले आहेत. तसेच मागील एका वर्षात Dynacons Systems and Solutions Ltd या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 60 टक्के होऊन अधिक रिटर्न दिले आहेत.

Dynacons Systems and Solutions Ltd या कंपनीची स्थापना 1995 मध्ये झाली. या कंपनीचे सीईओ आणि एमडी शिरीष अंजरिया आहेत. या कंपनीची मार्केट कैप 654 करोड रुपये आहे.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही गुंतवणूक केली असेल तर तुमच्या नफा-तोट्याला आम्ही जबाबदार नाही, त्यामुळे तुम्ही समजून घेऊन गुंतवणूक करा. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.