LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

या आठवड्यात येणार “या” सहा कंपन्यांचे IPO जाणून घ्या काय आहे प्राईज बैंड आणि इशू डेट

Published By LifelineMarathi.com
On

या आठवड्यामध्ये सहा कंपन्यांचे आयपीओ दाखल होणार आहेत, त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा उत्तम ठरणार आहे. तर या पोस्टद्वारे जाणून घ्या कोणत्या आहेत त्या कंपन्या ज्यांचे आयपीओ या आठवड्यामध्ये येणार आहेत.

Ideaforge - Ideaforge कंपनीचा आयपीओ 26 जून 2023 रोजी येणार आहे, तसेच गुंतवणूकदारांना 29 जून पर्यंत सबस्क्राईब करता येईल. Ideaforge कंपनीचा आयपीओ साईज आहे 567 करोड रुपये. कंपनीने आयपीओ साठी 639-672 रुपये प्राइस बैंड निश्चित केली आहे.

Cyient DLM - एंकर गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ 20 जून रोजी ओपन होईल, तर इतर गुंतवणूकदार 27 जून ते 30 जून या दरम्यान सबस्क्राईब करू शकतात. Cyient DLM ची IPO प्राइस बैंड 250 ते 265 रुपये प्रति शेअर आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून 592 करोड रुपये जुळवण्याचा विचार करत आहे.

पीकेएच वेंचर्स - हा आयपीओ 30 जून 2023 रोजी ओपन होणार आहे. गुंतवणूकदार ४ जुलै पर्यंत खरेदी करू शकतात . या कंपनीची प्राईस बैंडअजून जाहीर झालेली नाही. आयपीओच्या माध्यमातून ही कंपनी 380 करोड रुपये उभारण्याच्या तयारीत आहे.

पेंटागॉन रबर - गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ 26 जून रोजी ओपन होईल. 30 जून 2023 पर्यंत हा आयपीओ सबस्क्राईब केला जाऊ शकतो. या कंपनीची प्राईज बैंड 65 ते 70 रुपये ठेवण्यात आली आहे, तसेच या कंपनीच्या आयपीओ ची साईज 16 करोड रुपये आहे.

ग्लोबल पेट इंडस्ट्रीज - ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून 13 करोड रुपये जुळवण्याच्या विचारात आहे, तसेच या कंपनीचा आयपीओ 29 जून ते 3जुलै पर्यंत ओपन राहील. कंपनीच्या आयपीओची प्राईस बैंड 49 रुपये प्रति शेअर आहे.

Tridhya Tech and Synoptics Technologies- गुंतवणूकदार 30 जून ते 5 जुलै या दरम्यान हा आयपीओ सबस्क्राईब करू शकतात कंपनीने आयपीओ साठी 35 ते 42 रुपये पर्यंतची प्राईस बैंड निश्चित केली आहे. कंपनीने 26.4 करोड रुपये आयपीओ ची साईज निश्चित केली आहे.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुमच्या नफा-तोट्याला आम्ही जबाबदार नाही, त्यामुळे तुम्ही समजून घेऊन गुंतवणूक करा. तसेच तुमची आर्थिक गुंतवणूक करण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्यावा.