Inspirational Story Of Samuel Walton In Marathi

पेपर टाकण्यापासून अब्जोपती बनण्यापर्यंतचा प्रवास

Inspirational Story Of Samuel Walton In Marathi

आजपासून जवळपास शंभर वर्षापूर्वी अमेरिकेतील एका गावातील एका शेतकऱ्याच्या घरात एका लहान मुलाने जन्म घेतला. ज्याला सॅम नावाने ओळखले जात होते. ज्याचे वडील एक शेतकरी होते व ते आपला परिवार चालवण्यासाठी शेती तसेच कोंबडीची अंडी विकत असत. काही वर्षांनी सॅम च्या वडिलांना अजून एक पुत्र झाला. आता कुटुंब शेती आणि अंडी विकून चालू शकत नव्हते. तसेच गावांमध्ये शिक्षण आणि नोकरी ह्या सुविधा जवळपास नव्हत्या. म्हणून सॅम च्या वडिलांनी गावातील सर्व काही सोडून शहरात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीच्या काळात त्याचे वडील हे छोट्या छोट्या शहरांमध्ये जाऊन काम करून घर चालवत होते. परंतु आयुष्य कधीच सरळ नसते, म्हणजेच जेव्हा हा बारा वर्षाचा झाला त्यावेळेस अमेरिकेमध्ये महामंदी आली. त्यामुळे याचा परिणाम त्याच्या वडिलांच्या उत्पन्नावर देखील झाला. त्यामुळे कुटुंबाला हातभार लावण्यासाठी अभ्यासाबरोबरच पेपर टाकने, दूध विकणे, मॅक्झिन विकणे यासारखी छोटे-मोठे काम करू लागला.

यामध्ये त्यांनी कधी अभ्यास सोडला नाही. हळूहळू महामंदी कमी होत गेली व सॅम आणि त्यांचा परिवार हे कोलंबिया मध्ये येऊन स्थायिक झाले. सॅम अभ्यासाबरोबरच खेळामध्ये देखील चांगला होता. सॅमला माहिती होते जर आपल्याला पुढे भविष्यात काहीतरी करायचे असेल तर शिक्षण हे महत्त्वाचे आहे. परंतु त्याला हे देखील माहिती होते की आपल्याला माध्यमिक शिक्षणापेक्षा उच्च माध्यमिक शिक्षणामध्ये येणारा खर्च हा देखील अधिक असणार आहे आणि परिवाराकडे पाहता परिवाराला हा खर्च झेपणार नव्हता म्हणून त्याला त्याच्या शिक्षणाचा खर्च हा स्वतः च घ्यावा लागणार होता.

स्वतःच्या उच्च माध्यमिक शिक्षणासाठीचा खर्च भागवण्यासाठी त्याने सकाळी वर्तमानपत्र विकणे, दूध विकणे, अंडी विकणे व लोकांच्या गाड्या साफ करणे अशी बरीच कामे केली. तसेच त्याने रेस्टोरंटमध्ये वेटरचे काम देखील करू लागला. काही वर्षे निघून गेली. त्याने इकॉनॉमिक्स मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. वेळ वाया न घालवता त्याने लगेच एका रिटेल स्टोअर मध्ये काम करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर दुसरे विश्व युद्ध चालू झाले या विश्व युद्धामध्ये आपल्या देशाच्या बाजूने लागण्यासाठी त्याने सेनेमध्ये जायचे ठरवले. विश्व युद्ध संपल्यानंतर त्याने सेने मधून निवृत्ती घेतली आणि फुडें स्वतःचेच एक रिटेल स्टोअर दुकान टाकायचे ठरवले.

तो त्याला हवे तसे एक रिटेल स्टोअर शोधू लागला. काही दिवसातच त्याला एक स्टोअर मिळाले जे तोट्यामध्ये चालले होते. ते स्टोअर पंचवीस हजार डॉलर्स ला विकायला काढले होते. सॅमनी सेनेमध्ये काम करत असताना 5 हजार डॉलर एवढी रक्कम जमा केली. परंतु त्याच्याकडे 25 हजार डॉलर्स एवढी रक्कम नव्हती. त्याने बँकेमध्ये कर्जासाठी निवेदन दिले परंतु ते मान्य झाले नाही. त्याने त्याच्या मित्रांकडे पैशाची मागणी केली परंतु त्याची हि मागणी मित्रांनीही पूर्ण केली नाही. त्याने गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास सांगितले परंतु गुंतवणूकदारांनी देखील गुंतवणूक केली नाही.

शेवटी त्याच्या काकांनी त्याला 20 हजार डॉलर दिले. अशाप्रकारे त्यांनी ते स्टोअर भाडेतत्वावर विकत घेतली. थोड्याच दिवसात सॅमनी ते स्टोअर नफ्यामध्ये आणले आणि आपले 20,000 डॉलर्सचे कर्ज फेडून टाकले.

सॅमनी लोकांना आपल्या स्टोर पर्यंत आणण्यासाठी एक शक्कल लढवली होती. त्यांनी आपल्या स्टोअर समोर एक आईस्क्रीम ची गाडी लावली. त्या गाडीवर तो आईस्क्रीम एकदम स्वस्त म्हणजे खरेदी रक्कम पेक्षा देखील कमी रकमेमध्ये विकू लागला. जेव्हा लोक ते आईस्क्रीम खाण्यासाठी येत होते तेव्हा लोकांना त्या रिटेल स्टोअर मध्ये असलेल्या विविध ऑफर व त्यांवरील असलेले मोठे मोठे डिस्काउंट दिसत. त्याची ही संकल्पना एकदम भन्नाट होती ज्यामुळे दिवसेंदिवस त्याचा नफा वाढतच चालला होता.

स्वस्त आईस्क्रीम त्यांना मोठमोठे डिस्काउंट दाखवत आणि मोठे डिस्काउंट त्यांना स्टोरमध्ये घेऊन येत, ही संकल्पना उत्कृष्ट ठरली. ३ वर्षात त्यांचा उद्योग नवे उच्चांक गाठू लागला. जेव्हा हे दुकान विकत घेतले तेव्हा त्यांच्यामध्ये झालेल्या करारावर लक्ष्य दिले नाही. त्या करारानुसार सॅमचा ३ वर्षानंतर त्या दुकानाचा करार संपत होता. त्या दुकानाचा मालक ते दुकान त्याच्या मुलाला देऊ इच्छित होता. म्हणून त्याने करार पुढे चालू ठेवला नाही. त्यामुळे सॅमला आपल्या चांगल्या चाललेल्या स्टोअरमधून काढता पाय घ्यावा लागला. आता हे रिटेल स्टोअर्स सॅमच्या हातातून निघून गेले.

परंतु त्याला यातून काही महत्त्वाच्या गोष्टी शिकायला भेटल्या. ते रिटेल स्टोअर् सोडताना त्याला ५० हजार डॉलर एवढी रक्कम मिळाली. या रकमेत त्याने एका कंपनीची फ्रॅंचाईजी खरेदी केली आणि त्याचे स्टोर उघडले. येणाऱ्या वर्षात त्यांनी या दोन-तीन स्टोअर चे पंधरा-सोळा स्टोअर केले.

आता सॅमला ला काही वेगळे करायचे होते. त्याला समजले की गावांमध्ये मोठे डिस्काउंट उपलब्ध नाहीत म्हणून आपण आपले स्टोर गावांमध्ये उघडावे. ही संकल्पना त्याने ज्या कंपनीची फ्रॅंचाईजी घेतली होती त्यांना सांगितली. कंपनीच्या मानजेमेंटला ही संकल्पना आवडली नाही.

त्यामुळे त्याने स्वतः स्वतच्या नावाचे नवीन स्टोर उघडायचे ठरवले. आपल्या भावाच्या मदतीने त्यांनी एक स्टोअर सुरू केले. जिथे त्यांना एकाच छताखाली सर्व प्रकारच्या वस्तू उपलब्ध करून दिल्या होत्या. ते पण बाजारात असलेल्या वस्तूंच्या भावा पेक्षा कितीतरी स्वस्तपटीत वस्तू उपलब्ध करून दिल्या होत्या.

या स्वस्त आणि एकाच छताखाली भेटलेल्या सर्व वस्तूंमुळे त्यांचे हेच स्टोअर बाजारांमध्ये प्रसिद्ध झाले. बघता बघता एका स्टोर चे दोन, चार, आठ, दहा अशी संख्या वाढत गेली. तसेच या स्टोरच्या शाखा जगभरात पसरू लागल्या.

5 एप्रिल 1992 रोजी वयाच्या 73 व्या वर्षी सॅम्युएल वॉल्टन यांचे निधन झाले परंतु त्यांची ही कंपनी दिवसेंदिवस फुलत चाललेली होती. संपूर्ण जग त्यांच्या या स्टोअरला Walmart म्हणून ओळखते. आज त्यांनी या लावलेल्या वटवृक्षाची संख्या म्हणजेच त्यांच्या या स्टोअर्सची संपूर्ण जगात असणारी संख्या ही 12000 पेक्षा जास्त आहे व दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दिवसाला तीन करोड पेक्षा जास्त लोक हे वॉलमार्ट मधून खरेदी करत असतात. फ्लिपकार्ट चे सत्तर टक्के शेअर्स वॉलमार्टने खरेदी करून भारतामध्ये देखील त्यांनी त्यांची पकड मजबूत केली आहे.

मित्रांनो ही गोष्ट होती अशा व्यक्तीची ज्या व्यक्तीवर ना त्याच्या मित्रांनी विश्वास ठेवला, ना बँकेने आणि ना गुंतवणूकदारांनी तरीही स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या असणाऱ्या जिद्दीने त्यांनी शेवटी यश मिळवलेच.

तर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरु नका.

अजुन वाचा:

Categories