Virat Kohli Information In Marathi - विराट कोहली यांचा जीवन प्रवास

विराट कोहली यांची संपूर्ण माहिती - Virat Kohli Information In Marathi

virat kohli information in marathi

विराट कोहली यांना कोण ओळखत नाही. आज आपण त्यांच्याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

नाव - विराट कोहली

वडिलांचे नाव - प्रेम कोहली

जन्म - जून 5 नोव्हेंबर 1988

जन्मस्थान - दिल्ली

टोपण नाव - चिकू

आईचे नाव - सरोज कोहली

पत्नी - अनुष्का शर्मा कोहली

एक दिवसीय क्रिकेट मध्ये पदार्पण - 18 ऑगस्ट 2008 रोजी श्रीलंका विरुद्ध

T-20 पदार्पण - 12 जून 2010 रोजी जिमबॉम्बे विरुद्ध

कसोटी पदार्पण - 20 जून 2011 रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध

विराट कोहली यांना कोण ओळखत नाही सध्याचे भारताच्या तिन्ही ही प्रकारच्या क्रिकेट चे ते कर्णधार आहेत.

विराट कोहली यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबामध्ये झाला. त्यांचे वडील वकील होते. विराट त्यांना एक मोठा भाऊ आणि एक मोठी बहीण आहे.

त्यांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण हे विशाल भारती स्कूल मधून घेतले. विराट यांच्या क्रिकेटमध्ये वाढत्या रुचीला त्यांच्या वडिलांनी जाणले होते म्हणून त्यांचे वडील त्यांना दररोज क्रिकेटच्या सरावासाठी घेऊन जात. वयाच्या नवव्या वर्षी विराट यांच्या वडिलांनी त्यांना क्रिकेटच्या क्लब मध्ये ऍडमिशन घेऊन दिले.

विराट हे सुरुवातीपासूनच अभ्यासात सर्वसाधारण विद्यार्थी होते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचे अभ्यासापेक्षा क्रिकेटमध्ये असलेले जास्त लक्ष हेच होते. यामुळेच त्यांनी पुढे फक्त बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले व पूर्ण लक्ष हे क्रिकेटमध्ये देऊ लागले.

ब्रेन स्ट्रोकमुळे 2006 रोजी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. ज्यावेळेस त्यांना ही बातमी कळाली त्यावेळेस ते कर्नाटकमध्ये कर्नाटक विरुद्ध दिल्ली या रणजी मॅचमध्ये दिल्लीकडून खेळत होते. पहिल्यांदा त्यांनी मॅच पूर्ण केली नंतर ते ते दिल्लीला रवाना झाले.

2002 मध्ये त्यांनी अंडर-15 मध्ये खेळायला सुरुवात केली. यानंतर 2006 ला त्यांची अंडर 17 मध्ये निवड झाली. आणि इथूनच त्यांचा क्रिकेटचा एक नवीन प्रवास चालू झाला व त्यांच्या क्रिकेट मध्ये अमुलाग्र असे बदल घडू लागले.

पुढे ते अंडर- 19 या भारतीय टीम संघामध्ये आपले स्थान मिळविण्यात यशस्वी ठरले आणि या वेळेस या संघाचे कर्णधार देखील होते. त्यांनी यशस्वीरीत्या आपल्या संघाची जबाबदारी पार पाडली आणि श्रीलंका विरुद्ध 2011 ला त्यांनी अंडर 19 विश्वकप वर भारताचे नाव कोरले.

त्यांचा खेळ हा पुढे सुधरत राहिला. पुढे त्यांची गणना ही सर्वोत्तम फलंदाजांमध्ये होऊ लागली. आता त्यांना सर्वजण ओळखत होते आणि ते आपल्या खेळामुळे प्रसिद्ध देखील झाले होते.

त्यानंतर त्यांनी 2011साली कसोटी सामन्यात आपले स्थान निर्माण केले. नंतर त्यांनी एक दिवसीय सामन्यांमध्ये सहाव्या नंबर वर खेळायला सुरुवात केली . सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये त्यांना आपले कौशल्य दाखवता आले नाही परंतु त्यांनी त्यांच्या चुका सुधारल्या आणि त्याच्या पुढच्याच हे सामन्यांमध्ये हे 116 धावा बनवून सिद्ध केले की ते एक उत्तम प्रकारचे फलंदाज आहेत.

त्यांच्या या उत्तम प्रकारचा खेळांमध्ये त्यांना भरपूर संधी मिळत गेल्या. 2012 मध्ये एशियाई कप साठी त्यांना कॅप्टन म्हणून निवडण्यात आले. तेव्हाच सिद्ध झाले होते की जर विराट असेच खेळत राहिले तर त्यांना भविष्यात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल आणि पुढे ती मिळालीच.

विराट कोहली यांचे आयपीएल करियर

विराट कोहली यांनी 2008 ला पहिला आयपीएलचा सामना रॉयल चॅलेंजेस बेंगलोर यांच्या बाजूने खेळला. याच वर्षी ते रॉयल चॅलेंजर बंगलोर या संघांमध्ये वीस लाख रुपये देऊन खरेदी करण्यात आले होते. त्यांनी त्या वर्षी 13 सामन्यांमध्ये फक्त 165 धावा केल्या.

2009 मध्ये त्यांनी आरसीबी (RCB) या संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले होते. तसेच 2014 मध्ये देखील त्यांचे आयपीएल प्रदर्शन काही विशिष्ट असे नव्हते त्यांनी फक्त 37 च्या सरासरीने धावा केल्या.

याच वर्षी महेंद्रसिंग धोनी हे कसोटी कर्णधार पदावरून निवृत्त झाले त्यामुळे या कर्णधारपदाची जबाबदारी ही विराट कोहली यांच्याकडे सोपविण्यात आली.

2016 मध्ये विराट कोहली यांनी एशिया कप T-20 मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले. इथूनच त्यांची खेळण्याची शैली लोकांना आकर्षित करू लागली. त्यामुळे त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच जाऊ लागली. त्यामुळे 2018 मध्ये झालेल्या आयपीएल च्या लीलावामध्ये त्यांना 18 करोड एवढी बोली लावून खरेदी करण्यात आले.

याचबरोबर त्यांच्या खेळण्याच्या उत्तम शैलीने त्यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच मध्ये देखील उत्तम कामगिरी करत भरपूर असे विक्रम त्यांच्या नावी केले.

T20 आंतरराष्ट्रीय मध्ये शतक ठोकणारे असे मोजकेच खेळाडू आहेत त्यामध्ये विराट कोहली हे नाव देखील आहे. त्यांनी सर्वात जलद एक दिवसीय क्रिकेटमध्ये शतके ठोकण्याचा विक्रम त्यांच्या नावी आहे. त्यांच्या आधी हा विक्रम सचिन तेंडुलकर यांच्या नावे होता.

विराट कोहली यांच्या नावी भारतातील क्रिकेट खेळाडूंपैकी पैकी सर्वात जलद 1000, 3000 आणि 5000 धावा बनवण्याचा विक्रम आहे.

विराट कोहली यांच्या नावे असलेले काही विक्रम

  1. 2011 - वर्ल्डकप मध्ये शतक मारणे.
  2. वयाच्या बाविसाव्या वर्षी एक दिवसीय मॅच मध्ये शतक बनवणारे विराट कोहली हे तिसरे भारतीय आहेत.
  3. विराट कोहली यांच्या नावी भारतातील क्रिकेट खेळाडूंपैकी पैकी सर्वात जलद 1000, 3000 आणि 5000 धावां बनवण्याचा विक्रम आहे.
  4. 2013 ला जयपुर मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी फक्त 53 बॉल्समध्ये सेंचुरी केली.
  5. एकदिवसीय सामन्यांमध्ये 7500 सगळ्यात वेगाने बनवणारे ते पहिले भारतीय आहे.

विराट कोहली यांना मिळालेले काही अवार्ड्स

  1. 2012- आाईसीसी ओडीआई प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड
  2. 2013- अर्जुन अवॉर्ड फॉर क्रिकेट
  3. 2017- सीएनएन-आईबीएन इंडियन ऑफ द इयर
  4. 2017- पद्मश्री अवॉर्ड

विराट कोहली यांचे विवाहीक जीवन

7 डिसेंबर 2017 रोजी विराट कोहली आणि बॉलीवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी लग्न केले.

विराट कोहली हे खालील ब्रँड चे ब्रँड ॲम्बेसिडर आहेत.

  1. गूगल डुओ ( Google Duo)
  2. पुमा (Puma)
  3. मींतरा (Myntra)
  4. हिमालया (Himalaya)
  5. उबर इंडिया (Uber India)
  6. वाल्वोलीन (Valvoline)
  7. अमेज इन्वर्टर (Amaze Inverters and Batteries)
  8. बूस्ट एनर्जी ड्रिंक (Boost Energy Drink)
  9. फिलिप्स इंडिया (Philips India)
  10. एमआरएफ टायर्स (MRF Tyres)
  11. अमेरिकन टूरिस्टर (American Tourister)
  12. विक्स इंडिया (Vicks india)
  13. सन फार्मा वोलीनी (Sun Pharma Volini)
  14. कोलगेट (Colgate)
  15. हीरो मोटोकोर्प (Hero Motocorp)
  16. मोबाइल प्रीमियर लीग (Mobile Premier League)

तर तुमच्याकडे विराट कोहली यांच्या बद्दल अजून इन्फॉर्मेशन असेल तर ती आमच्याशी नक्कीच Share करा किंवा आम्ही दिलेल्या माहिती ती माहितीमध्ये काही त्रुटी असेल तर ती ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगावी आम्ही तात्काळ त्यावर कार्य करू.

Read More
Categories