Motivational Story Of Jack Ma In Marathi | जॅक मा

जॅक मा यांची जीवनगाथा - Motivational Story Of Jack Ma - Founder Of Alibaba In Marathi

motivational story of jack ma in marathi

जर तुम्ही प्रयत्न करणे सोडलेले नसेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही अजूनही हरलेले नाहीत आणि तुम्ही तेव्हाच हरता जेव्हा तुम्ही प्रयत्नच करत नाही असे जॅक मा चे म्हणणे आहे.ज्यांना संपूर्ण जग आज अली बाबा चे संशोधक म्हणून ओळखतात.परंतु एक असाही काळ होता ज्या काळात ते स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी किंवा एखादी छोटी नोकरी मिळवण्यासाठी इकडे तिकडे धडपडत होते.तो काळ त्यांच्यासाठी खराब होता ते जेथेही नोकरीसाठी जात होते तिथून त्यांना नकार कळवला जात असे. त्यावेळी त्यांचा वेळ खराब होता किंवा त्यांचे भाग्य त्यांच्यासोबत नव्हते किंवा त्यांचे नशीब त्यांच्या हातून नोकरीऐवजी काहीतरी मोठे काम करून घेणार होते,किंवा त्यांचे शिक्षण हे कोणत्याही नोकरीसाठी योग्य नव्हते हे आज आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत.

15 ऑक्टोबर 1964 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मलेले मायुन म्हणजे जॅक मा हे लहानपणापासूनच अभ्यासामध्ये कमी होते. ते प्राथमिक शिक्षणामध्ये तीन वेळा माध्यमिक शिक्षणामध्ये दोन वेळा आणि कॉलेजमध्ये दोन वेळा नापास झाले. आणि नापास होण्यामध्ये ही त्यांनी रेकॉर्ड बनवले होते, कॉलेजमध्ये असताना गणित विषयांमध्ये 120 गुणांपैकी त्यांना फक्त १ च गुण मिळाला होता. नापास होणं ही तर वेगळी गोष्ट आहे परंतु 120 पैकी एक गुण मिळवणे ही तर फारच अनोखी गोष्ट होती. म्हणजेच एका अलीबाबा टेक्नॉलॉजी कंपनीच्या संस्थापकचे गणित हे खूपच कच्चे होते.

त्यांनी कोणत्याही मॅनेजमेंट चा अभ्यास केला नव्हता आणि ते आजही आपल्या कंपनीमधील अकाउंटचे रिपोर्ट वाचू शकत नाहीत. चला तर मग यातून एक गोष्ट तरी समजली की करोडोपती होण्यासाठी गणित विषय चांगले असणे आवश्यक नाही. जॅक मा हे असे एकच व्यक्तीं नाहीत जे अभ्यासामध्ये कमी होते तर अल्बर्ट आईन्स्टाईन आणि एडिसन सुद्धा लहानपणी अभ्यासात कच्चे होते. परंतु जॅक मा मध्ये एक गुणवत्ता अशी ही होती की त्यांची शरीर यष्टी नाजूक असली तरी हे आपल्यापेक्षा मोठ्या मुलांबरोबर भांडण्यासाठी ते कधीच मागे पडत नसे. आणि त्याचा परिणाम काय होईल याचाही ते विचार करत नव्हते आणि त्यांच्या याच गुणवत्तेने ने त्यांना जीवनामध्ये कशी मदत केली ते आपण पुढे पाहणार आहोत.

जॅक मा कसेबसे पुढे शिकत आहे त्यांना इतर कोणत्याही विषया मध्ये विशेष रुची नव्हती परंतु त्यांना इंग्लिश शिकण्या मध्ये जास्त रुची होती आणि त्यामुळेच लहानपणापासूनच शिक्षणा बरोबरच ते टुरिस्ट ना मोफत फिरवत असे आणि त्यांच्याकडून इंग्रजी शिकून घेत असे.आणि असेच ते पुढे आठ वर्ष करत होते आणि त्यामुळे त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व वाढले होते.

पुढे त्यांनी हावर्ड यूनिवर्सिटी मध्ये शिकण्यासाठी प्रयत्न चालू केले परंतु हावर्ड यूनिवर्सिटी ने त्यांना रिजेक्ट केले.परंतु ते हार मानणारे नव्हते,मनामध्ये खूप चिकाटी आणि जिद्द घेऊन एक-दोन वेळा नाही तर दहा वेळा त्यांनी युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेशासाठी प्रयत्न केला परंतु तिकडे हावर्ड यूनिवर्सिटी ही खूप जिद्दी होती त्यांनी दहा वेळा जॅक मा यांना रिजेक्ट केले.परंतु त्यांची हीच जिद्द आणि चिकाटी वृत्ती त्यांना सामान्य लोकांपासून वेगळ बनवते.

त्यांना याचा काहीही फरक पडत नव्हता की कॉलेज त्यांना दहाही वेळा रिजेक्ट करत होते आणि ते पुन्हा नवीन जोमाने अर्ज करत होते आणि ते असाच विचार करत असे की कधीतरी माझा नंबर येईल. जेव्हा त्यांचे शिकण्याचे सर्व प्रयत्न संपले तेव्हा त्यांनी 1988 रोजी हॉन्गजॉन नॉर्मल या युनिव्हर्सिटीमधून इंग्लिश विषयामध्ये आपली पदवी पूर्ण केली.

पुढे पदवी पूर्ण झाल्यानंतर एखादी छोटीशी नोकरी मिळवावी असे त्यांचे ध्येय होते ते नोकरी मिळवण्यासाठी खूप ठिकाणी प्रयत्न करु लागले परंतु सर्व ठिकाणाहून त्यांना रिजेक्ट करण्यात आले आणि असे त्यांच्यासोबत एक-दोन वेळा नाही तर तब्बल तीस वेळा झाले. त्यांनी पोलीस मध्ये भरती होण्यासाठीही प्रयत्न केले परंतु तिथेही त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर चार लोकांना सिलेक्ट केले आणि फक्त जॅक मा यांना असे सांगण्यात आले की तुम्ही या नोकरीसाठी अयोग्य आहात.

एवढेच नाही तर KFC मध्ये एकूण चोवीस लोकांनी इंटरव्यू दिला त्यातील 23 लोकांना सिलेक्ट करण्यात आले परंतु फक्त हे एकच असे व्यक्ती होते त्यांना रिजेक्ट करण्यात आले.विचार करा काय परिणाम झाला असेल त्यांच्यावर.

जॅक मा असे म्हणतात की आज जर वाईट होत असेल तर उद्या याहीपेक्षा वाईट होऊ शकते पण नंतर काहीतरी चांगले होणारच.त्यानंतर जॅक मा पाशी त्यांची एकच उपलब्धी होते म्हणजे त्यांचे इंग्लिश.त्यांनी पुढे एका कॉलेजवर $12 प्रतिमहिना एवढा पगारावर इंग्लिश शिक्षकाची नोकरी केली आणि त्यासोबतच त्यांनी इंग्लिश ट्रान्सलेटर चे काम करण्यास सुरुवात केली आणि त्याच वेळेस 1995 रोजी त्यांना ट्रान्सलेटर म्हणून अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली आणि त्याच प्रवासामध्ये पहिल्यांदा त्यांना yahoo हाताळणीसाठी मिळाले. त्यांनी याहू (yahoo) सर्च इंजिन वर बियर हा शब्द टाकल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटले की सर्व देशांमध्ये बियर yahoo वर दाखवले परंतु चीनसारख्या मोठ्या देशाची बियरच काय तर इतर कोणत्याही संदर्भात माहिती yahoo वर नव्हती. चायनामध्ये इंटरनेट बिझनेस करण्याची मोठी युक्ती जॅकच्या मनात आली. अमेरिका वरून परत आल्यावर त्यांनी 50 लोकांना चीनमध्ये इंटरनेटच्या व्यवसायाबद्दल माहिती दिली परंतु त्या लोकांनी जॅक मा

यांना असे उत्तर दिले की तुला तर कम्प्युटरही चालवता देखील येत नाही तु कसा काय बिझनेस करणार.तुझी ही संकल्पना एकदम खराब आहे ती चालू शकणार नाही. परंतु हार मानून घेईल तो जॅक मा कुठला. त्यांनी हार मानून घेतली नाही आणि त्याने त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पैशांमधूनच येलो चायना पेज ची स्थापना केली.

त्यांच्या या संकल्पनेला विदेशातून चांगली प्रतिक्रिया येऊ लागली परंतु त्यांच्याकडे कमी पैसे असल्यामुळे ते पुढे या योजनेवर काम करू शकत नव्हते त्यामुळे त्यांना या चायना पेजवर काम करणे बंद करावे लागले. जॅकने पुन्हा नोकरी करणे चालू केले परंतु त्याने त्याच्या या संकल्पनेवर काम करणे सोडले नाही. त्यांनी तीन हजार डॉलर एवढ्या रकमेसाठी बँकेमध्ये कर्जासाठी निवेदन दिले.तीन महिने वाट पाहून देखील त्यांचे निवेदन हे मान्य झाले नाही. त्यानंतर त्यांनी काही इन्वेस्टर लोकांशी संवाद साधला आणि त्यांना या संकल्पनेबद्दल माहिती दिली. त्या सर्वच मिस्टरांनी जॅक मा यांच्या या संकल्पनेमध्ये पैसे गुंतवण्यास नकार दिला.

त्यांना जवळपास चार वर्षे लागली असे मित्र आणि गुंतवणूकदार गोळा करण्यासाठी जे त्यांच्या संकल्पनेवर पैसे लावतील आणि त्यांच्यासोबत काम करतील. 1999 साली त्यांनी आपल्या 19 मित्रांच्या मदतीने अलीबाबा या कंपनीची स्थापना केली. त्यावेळेस हे एक ऑनलाईन बिझनेस टू बिझनेस प्लॅटफॉर्म होते.

आता संकल्पनेवर तर काम झाले होते परंतु ती संकल्पना पुढे चालू ठेवण्यासाठी पैशांची गरज होती त्यासाठी त्यांनी गुंतवणूकदार पाहण्यास सुरुवात केली परंतु कोणताही गुंतवणूकदार त्यांच्या या संकल्पनेमध्ये पैसे गुंतवण्यास तयार नव्हता.

परंतु त्यांनी हार मानली नाही आणि गुंतवणूकदार पाहणे चालूच ठेवले. शेवटी त्यांच्या या प्रयत्नाला यश आणि Goldman Sachs आणि SoftBank यांनी मिळून जवळपास पंचवीस मिलीयन डॉलर इतकी इन्व्हेस्टमेंट अलीबाबा या त्यांच्या संकल्पनेमध्ये केली. या भेटलेल्या गुंतवणुकीमुळे अलीबाबा पुढच्या एका वर्षामध्ये नफ्यामध्ये आली आणि नवे उच्चांक गाठू लागली. नंतर 2005 ला अलीबाबा या ग्रुपमध्ये Yahoo वन बिलियन डॉलर इतकी इन्वेस्टमेंट करून अलीबाबाची 40% शेअर्स विकत घेतले.

महिन्याचे तीनशे रुपये कमावणारा शिक्षक आता दुनियातील सर्वात श्रीमंत अशा शंभर व्यक्तींमध्ये आपले स्थान मिळवतो. मेहनत, जिद्द आणि चिकाटी असेल तर काहीही करणे शक्य आहे हे सिद्ध करून दाखवली आहे अलिबाबा चे संस्थापक जॅक मा यांनी. त्यांनी त्यांच्या देशाला म्हणजेच चीनला एका वेगळ्या क्षेत्रात नवीन ओळख करून दिली आहे.एखाद्या देशाचे सरकार जेवढे देशांमध्ये बदल घडवून आणू शकत नाही तेवढी बदल घडवून आणण्याची ताकद ही एका उद्योजकांमध्ये असते हे यांनी उत्तम प्रकारे सिद्ध केले आहे.

तर मित्रांनो तुम्हाला हा जॅक मा यांचा एक प्रेरणादायी प्रवास कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करुन सांगा आणि अशाच नवनवीन गोष्टी वाचण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

अजुन वाचा:

Categories