Thomas Alva Edison Information In Marathi

थॉमस अल्वा एडिसन यांच्याविषयी संपूर्ण माहिती (Thomas Alva Edison Information In Marathi):

Thomas Alva Edison Information In Marathi

Thomas Alva Edison Information In Marathi: इलेक्ट्रीक बल्ब, फोनोग्राफ यांसारखे महान शोध लावणाऱ्या थॉमस अल्वा एडिसन यांना मंदबुद्धी असे सांगून शाळेतून काढून टाकले होते. परंतु आपल्या कुशाग्र बुद्धीच्या जोरावर त्यांनी बरेच मोठे शोध लावले आणि संपूर्ण जगासमोर एक नवीन आदर्श उभा केला .

या संपूर्ण जगाचे आणि लोकांचे जीवन बदलण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले आणि संपूर्ण जगाला आपल्या परिश्रम आणि ज्ञानाच्या जोरावर विद्युत बल्ब सारख्या अविष्काराने उजळून टाकले.

जगातील पहिली प्रयोगशाळा स्थापन करण्याचे श्रेय थॉमस एडिसन यांना दिले जाते. थॉमस एडिसन जगातील सर्वात महान संशोधकांमध्ये गणले जातात कारण 1903 पेटंट स्वतःच्या नावावर असणारे अमेरिकेतील ते एकमेव व्यक्ती आहेत.

थॉमस अल्वा एडिसन यांच्या महान जीवनापासून प्रत्येकाने प्रेरणा घेणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया थॉमस अल्वा एडिसन यांचा जीवन प्रवास.

थॉमस अल्वा एडिसन जन्म, कुटुंब, प्रारंभिक जीवन आणि शिक्षण:

जगातील महान संसोधक थॉमस एडिसन यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1847 मध्ये ओहायो राज्यातील मिलैन या शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सामूएल ओगडेन एडिसन तर आईचे नाव नैनसी मैथ्यु इलियट असे होते.

थॉमस अल्वा एडिसन लहानपणापासूनच हुशार आणि बुद्धिमान विद्यार्थी होते. त्यांना सुरुवातीपासूनच नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता होती. सुरुवातीला त्यांना शिक्षकांनी शाळेत प्रवेश दिला परंतु तीन महिन्यानंतर ते शिकण्यास समर्थ नाहीत असे सांगून शाळेतून काढून टाकण्यात आले.

यानंतर एडिसन यांनी आईच्या मार्गदर्शनाखाली घरीच अभ्यास केला जेव्हा एडिसन अवघ्या दहा वर्षांचे होते तेव्हा त्यांनी गिबन, सीआर यांसारख्या महान ग्रंथांत सोबतच डिक्शनरी ऑफ सायन्स याचाही अभ्यास केला.

वयाच्या नवव्या वर्षी त्यांच्या आईने त्यांना प्रारंभिक विज्ञान नावाचे एक पुस्तक दिले जेणेकरून त्यांना घरीच रसायन विज्ञानाचे प्रयोग शिकता येतील. त्या पुस्तकाचा अभ्यास करून एडिसन यांना केवळ प्रयोगच समजले नाहीत तर त्यांनी त्यामध्ये स्वतःची आवडही दाखवली. थॉमस अल्वा एडिसन या महान वैज्ञानिकां बद्दल असे म्हटले जाते की सुरुवातीपासूनच स्कार्लेट नावाच्या एका आजारामुळे त्यांच्यात ऐकण्याची क्षमता कमी होती आणि शेवटच्या क्षणी त्यांनी ऐकण्याची क्षमता गमावली होती परंतु थॉमस अल्वा एडिसन यांनी ही गोष्ट कधीच आपल्या यशामध्ये आणली नाही आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे कठोर परिश्रम केले आणि आपले संपूर्ण जीवन उत्कृष्ट कामगिरी करून साध्य केले.

थॉमस अल्वा एडिसन यांचे संघर्षमयी जीवन :

विजेचा बल्ब यासारखा महान शोध लावून जगाला प्रकाशित करणाऱ्या थॉमस अल्वा एडिसन यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी खूप संघर्ष केला. घराची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे घर खर्चाच्या आधारासाठी त्यांनी घरोघरी वर्तमानपत्रे वाटण्याचे कामही केले इतकेच नव्हे तर संघर्षाच्या काळात त्यांनी टेलिफोन ऑपरेटर म्हणूनही काम केले.

वयाच्या पंधराव्या वर्षी एडिसन यांनी स्वतःचे वृत्तपत्र छापण्यास सुरुवात केली ते दररोज रेल्वे जवळ आपले वृत्तपत्र विकत असे. नेहमीप्रमाणे थॉमस एडिसन रेल्वे स्थानकावर वृत्तपत्रे विकत होते तेव्हा त्यांनी स्टेशन मास्तरच्या 3 वर्षाच्या मुलाला रेल्वे रूळावरून फिरताना पाहिले तेव्हा त्यांना एक मालवाहू ट्रक वेगाने येताना दिसला एडिसन यांनी पळत जाऊन त्या मुलाचे प्राण वाचवले त्यामुळे स्टेशन मास्तर आनंदित होऊन त्यांनी टेलिग्राम बद्दल एडिसन यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी पाच वर्षे टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम केले आणि त्यानंतर टेलिग्राम ची उपकरणे सुधारण्यासाठी प्रयोगही केले.

सन 1866 मध्ये, आपल्या शोधाने जगाला प्रकाशित करणारे थॉमस अल्वा एडिसन केंटुकी येथे गेले आणि तेथे त्यांनी एका असोसिएट प्रेसच्या ब्युरो मध्येही काम केले. एडिसन यांनी तेथे रात्री काम केले जेणेकरुन त्यांना आपल्या प्रयोगांना अधिक वेळ देता येईल. एके दिवशी ऑफिसमध्ये ते आपल्या बॅटरी वर ऍसिड ने काही प्रयोग करत होते तेव्हा ऍसिड फरशीवर सांडले आणि त्यानंतर थॉमस अल्वा एडिसन यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

थॉमस अल्वा एडिसन यांचे अविष्कार :

थॉमस अल्वा एडिसन यांना लहानपणापासूनच नवनवीन अविष्कार करण्याची आवड होती ते वर्तमानपत्र आणि भाज्या विकून त्यातून मिळणारे पैसे आपल्या प्रयोगांमध्ये खर्च करीत असत.

एडिसन यांनी इलेक्ट्रॉनिक वर्ल्ड रेकॉर्डर हा पहिला शोध लावला जो त्यांनी 1668 मध्ये पेटंट केला होता. त्यांचा हा शोध कोणीही विकत घेतला नव्हता परंतु त्यानंतरही त्यांनी आपले प्रयोग करणे चालूच ठेवले.

त्यानंतर त्यांनी हार्मोनिक टेलीग्राफ चा शोध लावला त्यानंतर त्यांनी मायक्रोफोन आणि फॅक्स मशीनचा शोध लावला.

सन 1877 मध्ये बनवलेल्या फोनोग्राफ मध्ये त्यांना ओळख मिळाली त्यानंतर 1878 पासून थॉमस अल्वा एडिसन यांनी त्यांच्या सर्वात महत्त्वाचा शोध म्हणजे इलेक्ट्रिक बल्ब वर काम करण्यास सुरुवात केली या आविष्कारामुळे त्यांना हजारो अपयशाला सामोरे जावे लागले परंतु प्रत्येक अयशस्वी प्रयत्नातून धडा घेऊन त्यांनी मेहनतीने आणि प्रामाणिकपणे आपले काम पुढे चालू ठेवले.

यानंतर सन 1879 मध्ये कार्बन थ्रेड फिलामेंट ची निर्मिती करण्यामध्ये त्यांना यश मिळाले हा अविष्कार करण्यासाठी त्यांना सुमारे चाळीस हजार डॉलर खर्च करावे लागले.

22 ऑक्टोबर 1879 रोजी बल प्रज्वलित करण्यामध्ये त्यांना यश मिळाले आणि या अविष्कारामुळे संपूर्ण जग प्रकाशमय झाले या आविष्कारासाठी त्यांना 27 जानेवारी 1880 रोजी पेटंट प्राप्त झाले. आणि याच अविष्कारानंतर एडिसन महान सांसोधक म्हणून जगभरात प्रसिद्ध झाले.

महान संशोधक थॉमस अल्वा एडिसन यांचा मृत्यू :

इलेक्ट्रीक बल्ब चा शोध लावणारे महान संशोधक थॉमस अल्वा एडिसन आपल्या जीवनातील शेवटच्या दिवसातही अविष्कार करत होते.

एडिसन हे केवळ वैज्ञानिक नव्हे तर सुप्रसिद्ध व्यापारी देखील होते.

18 ऑक्टोबर 1931 रोजी थॉमस अल्वा एडिसन यांनी अखेरचा श्वास घेतला आणि या जगातून ते कायमचे निघून गेले. एडिसन यांच्या महान शोधाबद्दल आजही लोक त्यांची आठवण काढतात.

This article is all about Thomas Alva Edison Information In Marathi. If you like this article then, share it with your friends and family. If you have any suggestions, don't hesitate to contact us.

Read More
Categories