Akbar-Birbal Stories In Marathi | अकबर बिरबल मराठी गोष्टी

Top 10 Akbar Birbal Stories In Marathi

बिरबलाची नेमणूक

Akbar-Birbal Stories In Marathi

एकदा अकबराने एका गावात आपला दरबार उभारला. याच गावामध्ये एक तरुण ब्राह्मण शेतकरी राहत होता. बादशहा अकबराने अशी घोषणा केली की, जो कलाकार बादशहा चे जिवंत चित्र तयार करेल त्याला बक्षीस म्हणून एक हजार सोन्याची नाणी देण्यात येतील, ही घोषणा ब्राह्मण शेतकऱ्याने ऐकली.

निश्चित दिवशी बादशहाच्या दरबारामध्ये कलाकारांची गर्दी झाली. प्रत्येकाच्या हातात बादशहाचे झाकलेले चित्र होते. दरबारामधील प्रत्येक जण हे जाणून घेण्यास उत्सुक होता की एक हजार सोन्याची नाणी कोणाला मिळतील?

अकबर एका उंच आसनावर बसला आणि एकामागून एका कलाकारांची चित्रे पाहिल्यानंतर आणि त्यावर विचार केल्यानंतर प्रत्येक चित्र नाकारू लागला आणि म्हणाला ही चित्रे मी आत्ता आहे तशी नाहीत.जेव्हा ब्राह्मण शेतकऱ्याची वेळ आली तेव्हा अकबर अस्वस्थ झाला आणि म्हणाला तूसुद्धा इतरांसारखे चित्र आणले आहेस का? पण ब्राह्मण शेतकरी शांत आवाजात म्हणाला बादशहा स्वतःला यामध्ये बघा आणि समाधानी व्हा.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते राजाचे चित्र नव्हते तर ब्राह्मणाच्या कपड्यामधून निघालेला एक आरसा होता.हे पाहून सर्वजण म्हणाले, हेच आहे राजाचे सर्वोत्कृष्ट चित्र. अकबराने त्या ब्राह्मणाचा सन्मान केला आणि त्याला एक हजार सोन्याची नाणी बक्षीस म्हणून दिली बादशाहाने शासकीय शिक्का असलेली अंगठी त्याला दिली आणि आपल्या राजधानीमध्ये आमंत्रित केले. तोच ब्राह्मण शेतकरी पुढे जाऊन अकबराचा विश्वास पात्र बिरबल बनला.

तीन प्रश्नांची उत्तरे

akbar birbal stories in marathi

बिरबल खूप हुशार होता अकबराच्या प्रश्नांची अचूक उत्तरे त्याच्याकडे असत. एके दिवशी अकबराने बिरबलाला तीन प्रश्न विचारले.

ईश्वर कोठे राहतो? ईश्र्वराला कसे शोधायचे ?ईश्वर काय करतो? जेव्हा अकबराने हे प्रश्न विचारले तेव्हा बिरबलाला आश्चर्याचा धक्का बसला आणि तो म्हणाला मी उद्या या प्रश्नांची उत्तरे देईन.असे म्हणून बीरबल आपल्या घरी परतला. या प्रश्नांमुळे बिरबल काळजीत पडला होता. जेव्हा बिरबलाच्या मुलाने चिंतेचे कारण विचारले असता त्याने ते तीन प्रश्न सांगितले

बिरबलाच्या मुलाने सांगितले की तो स्वतः उद्या दरबारामध्ये अकबराला या तीन प्रश्नांची उत्तरे देईल.

दुसऱ्याच दिवशी बिरबल आपल्या मुलासह दरबारात पोहोचला आणि अकबराला म्हणाला की तुमच्या तीनही प्रश्नांची उत्तरे माझा मुलगा देऊ शकतो.

अकबर म्हणाला ठीक आहे मग मला सांगा ईश्र्वर कोठे राहतो? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी बिरबलाच्या मुलाने साखर घातलेल्या दुधाची मागणी केली. त्याने ते दूध अकबराला दिले आणि म्हणाला हे दूध प्या आणि सांगा की दूध कसे आहे? अकबराने दुधाची चव घेतली आणि दूध गोड आहे असे सांगितले. मग बिरबलाच्या मुलाने विचारले की दुधात साखर दिसत आहे का?

अकबर म्हणाला नाही, त्यात साखर नाही ती दुधात विरघळली आहे. बिरबलाचा मुलगा म्हणाला बादशहा, अशाच प्रकारे देव जगातील सर्व गोष्टींमध्ये मिसळलेला आहे परंतु दुधामध्ये मिसळलेल्या साखरेप्रमाणे दिसत नाही. या उत्तरावर अकबर समाधानी झाला. अकबराने दुसरा प्रश्न विचारला ईश्‍वराला कसे शोधायचे? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी बिरबलाच्या मुलाने अकबराला दही दिले आणि विचारले बादशहा त्यात लोणी दिसत आहे का?

अकबर म्हणाला दह्यामध्ये लोणी आहे परंतु दही घुसळल्या नंतरच लोणी दिसेल. तेव्हा बिरबलाचा मुलगा म्हणाला, होय बादशहा याच प्रमाणे मनाला मंथन केल्यावरच ईश्वर सापडतो. अकबर या उत्तरानेही समाधानी झाला. अकबराने तिसरा प्रश्न विचारला ईश्वर काय करतो?

बिरबलाचा मुलगा म्हणाला, बादशहा या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुम्ही मला गुरु मानले पाहिजे. अकबर म्हणाला ठीक आहे आत्तापासून तुम्ही माझे गुरू आहात आणि मी तुमचा शिष्य आहे. तेव्हा बिरबलाचा मुलगा म्हणाला गुरु नेहमीच उंच ठिकाणी बसतो आणि शिष्य नेहमी खाली बसतो. अकबर ताबडतोब त्याच्या सिंहासनावरून उठतो आणि बिरबलाच्या मुलाला सिंहासनावर बसवतो.

सिंहासनावर बसताच बिरबलाचा मुलगा म्हणतो बादशहा तुमच्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे ईश्वर राजाला गरीब बनवू शकतो आणि गरिबाला राजा बनवू शकतो.

अकबराचे स्वप्न

akbar birbal stories in marathi

एके दिवशी सम्राट अकबराला एक विचित्र स्वप्न पडले की त्याचा एक दात सोडून उर्वरित सर्व दात पडले आहेत.

दुसऱ्याच दिवशी अकबराने देशभरातून नामांकित ज्योतिषांना बोलावून घेतले आणि आपल्या स्वप्नाबद्दल सांगितले आणि त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

सर्वांनी आपापसात चर्चा केली आणि अकबराला सांगितले बादशहा तुमचे सर्व नातेवाईक तुमच्या आधी मरणार.हे ऐकून अकबर फार संतापला आणि त्याने सर्व ज्योतिषांना दरबार सोडण्यास सांगितले. ते गेल्यानंतर अकबराने बिरबलाला त्याच्या स्वप्नाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितली. बिरबल काही वेळ विचारात मग्न होता, आणि म्हणाला बादशहा तुमच्या स्वप्नाचा अर्थ खूप शुभ आहे.

याचा अर्थ असा की आपल्या नातेवाईकांमध्ये आणि आप्तेष्टांमध्ये तुम्ही सर्वाधिक काळापर्यंत जीवित राहू शकता. बिरबलाचे हे बोलणे ऐकून अकबराला फार आनंद झाला.

बिरबलानेही तेच सांगितले जे ज्योतिषांनी सांगितले होते परंतु सांगण्या मध्ये फरक होता. बादशहाने बिरबलाला बक्षीस देऊन पाठवले

धर्म आणि बुद्धीचा संबंध

akbar birbal stories in marathi

बिरबल हा ब्राम्हण आणि अत्यंत बुद्धिमान होता. तेव्हा अकबराने ब्राह्मण होण्याचा विचार केला. एक चांगला माणूस होणे हेच पुरेसे आहे हे सांगण्यासाठी बिरबलाने खूप प्रयत्न केले,परंतु अकबर याच्याशी सहमत नव्हता आणि त्याने संस्कार कार्याची मागणी केली.

बिरबलाने बादशहाला हे सांगून एका नदीकिनारी नेले की तेथे एक व्यक्ती मुगल बादशहाला हिंदू ब्राह्मण बनवू शकतो. तेव्हा तेथे एक माणूस गाढवाला घासत होता.तो माणूस म्हणाला मी माझ्या गाढवाला घोडा बनवीत आहे. एका साधूने मला सांगितले की नदीच्या काठावर उभे राहून गाढवाला घासत राहिले तर त्याचा घोडा होईल.

अकबर त्याच्या या बोलण्यावर जोरजोरात हसू लागला आणि म्हणाला हे कधीच होऊ शकत नाही, हे कसे घडेल?

जेव्हा बिरबल हसला तेव्हा अकबराला त्याचे म्हणणे समजले. आपल्या बुद्धीचा रंग, जाती, आणि धर्माशी काहीही संबंध नसतो.

सत्य आणि असत्य मधील अंतर

akbar birbal stories in marathi

एक दिवस बादशहाने बिरबलाला विचारले की सत्य आणि असत्य मध्ये काय अंतर आहे. बिरबलाने उत्तर दिले बादशहा या दोन्हींमध्ये तेवढेच अंतर आहे जेवढे डोळे आणि कानामध्ये असते.

बादशाहाला हे उत्तर समजले नाही म्हणून त्याने अकबराला विचारले की असे का आहे?

तेव्हा बिरबलाने सांगितले बादशहा जे काही डोळ्यांनी पाहिले जाते ते सत्य असते आणि जे कानांनी ऐकले जाते ते अनेकदा असत्य असते. बिरबलाचे हे उत्तर ऐकून अकबर समाधानी झाला.

अकबराचा प्रश्न

akbar birbal stories in marathi

एके दिवशी अकबराने एका प्रश्नाने दरबारातील सर्व लोकांना आश्चर्यचकित केले. 'जर एखाद्या व्यक्तीने माझी दाढी ओढली तर त्याला कोणत्या प्रकारची शिक्षा दिली पाहिजे'?

अकबराने विचारले. दरबारातील एका व्यक्तीने सांगितले त्या व्यक्तीला चाबुकाने मारले पाहिजे. त्या व्यक्तीला फाशी दिली पाहिजे, असे दुसऱ्या व्यक्तीने सांगितले. तर तिसरा व्यक्ती ने सांगितले की असे करणाऱ्याचा गळा कापला पाहिजे.

सर्वांची उत्तरे ऐकून अकबराने बिरबलाला विचारले की माझी दाढी ओढणाऱयाला काय शिक्षा दिली पाहिजे. बिरबलाने सांगितले त्याला मिठाई दिली पाहिजे. तेव्हा आश्चर्यचकित होऊन सर्वांनी विचारले "मिठाई"? हो कारण फक्त एक नातूच असतो जो आपल्या आजोबांची दाढी ओढण्याची हिंमत करतो.

हे उत्तर ऐकून अकबराने आपली अंगठी बिरबलाला बक्षीस म्हणून दिली.

मूर्ख चोर

akbar birbal stories in marathi

एके दिवशी अकबराच्या राज्यातील एका श्रीमंत व्यापाऱ्याकडे चोरी झाली होती. तेव्हा तो व्यापारी मदतीसाठी अकबराकडे गेला. अकबराने बिरबलाला चोराला शोधण्यासाठी व्यापाऱयाला मदत करण्यास सांगितले. व्यापाऱ्याने बिरबलाला सांगितले की त्याला एका सेवकावर संशय आहे.

व्यापाऱ्याकडून इशारा मिळाल्यानंतर बिरबलाने सर्व नोकरांना बोलावून सरळ रेषेत उभे राहण्यास सांगितले. सर्व नोकरांना चोरीबद्दल विचारले असता सर्वांनी नकार दिला. त्यानंतर बिरबलाने प्रत्येक नोकराला एक काठी दिली आणि म्हणाला ज्याने चोरी केली आहे त्याची काठी उद्या दोन इंच वाढेल.

दुसऱ्या दिवशी बिरबलाने सर्वांना बोलावून त्यांच्या काठ्यांची तपासणी केली तेव्हा एका नोकराची काठी दोन इंच लहान होती. आश्चर्यचकित होऊन व्यापाऱ्याने या प्रकाराबद्दल बिरबलाला विचारले असता बिरबल म्हणाला हे सोपे आहे काठीचा आकार दोन इंच वाढेल म्हणून चोराने आपली काठी दोन इंच कापली आणि त्यामुळेच बिरबलाला चोराला शोधण्यात यश मिळाले.

खरा राजा कोण?

akbar birbal stories in marathi

एकदा बिरबलाला दुसऱ्या राज्यात राजदूत म्हणून पाठवण्यात आले होते. त्या राज्याच्या राजाने बिरबलाच्या तीक्ष्ण बुद्धी विषयीच्या कथा ऐकल्या होत्या आणि बिरबलाची परिक्षा घेण्यासाठी बिरबलाला बोलावण्यात आले होते. राजाने आपल्या सर्व मंत्र्यांना आपल्यासारखी वेशभूषा करण्यास सांगितले होते.

सर्वजण बिरबलाची परिक्षा घेण्यासाठी एका रांगेत बसले होते जेव्हा बिरबल दरबारामध्ये आला तेव्हा सर्वांना समान वस्त्र परिधान करून सिंहासनावर बसलेले पाहून तो चकित झाला.

आश्चर्यचकित होऊन त्याने सर्वांचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली मग तो एककाकडे गेला आणि त्याला नमन केले आणि ती व्यक्ती स्वतः राजा होती. राजाला आश्चर्य वाटले आणि त्याने उभे राहून बिरबलाला मिठी मारली.

राजाने बिरबलाला अचूक अंदाजाचे कारण विचारले असता बिरबल हसला आणि म्हणाला राजा तुमच्यासारखा आत्मविश्वास इतर कोणामध्येही नाही आणि तसेच इतर सर्वजण तुमच्या आद्न्ये साठी तुमच्या कडे पाहत होते. राजाला आश्चर्य वाटले आणि त्याने बिरबलाच्या तीक्ष्ण बुद्धीचे कौतुक केले.

फक्त एक प्रश्न

akbar birbal stories in marathi

एके दिवशी दुसऱ्या राज्यातील विद्वान अकबराच्या दरबारात भेट देण्यासाठी आला. त्याने अशी घोषित केली की, तो हुशार आहे आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरे कोणीही देऊ शकत नाही. त्या विद्वानाने बिरबलाला आव्हान दिले की तू माझ्या प्रश्नांची उत्तर दे आणि स्वतःहा हुशार असण्याचे सिद्ध कर.

विद्वान भडक स्वरात म्हणाला तू माझ्या शंभर सोप्या प्रश्नांची उत्तरे देतोस की एकाच कठीण प्रश्नाचे उत्तर देतोस.

बिरबल आत्मविश्वासाने म्हणाला मला फक्त एक कठीण प्रश्न विचारा.

ठीक आहे मग सांग प्रथम काय आले कोंबडी की अंड? मोठ्या आवाजात विद्वानाने प्रश्न विचारला .

बिरबलाने उत्तर दिले कोंबडी, विद्वानाने थट्टा करत विचारले तुला कसे माहीत? तुम्ही मान्य केले आहे की तुम्ही एकच प्रश्न विचारणार जो तुम्ही यापूर्वी विचारला आहे असे उत्तर बिरबलाने दिले. यावर अकबर-बिरबलावर खूप खुश झाला.

पाहुणा कोण ?

akbar birbal stories in marathi

एकदा एका श्रीमंत माणसाने बिरबलाला जेवणासाठी बोलावले. बिरबल जेव्हा त्या माणसाच्या घरी पोहोचला तेव्हा तेथे अनेक लोक उपस्थित होते. बिरबल म्हणाला मला माहीत नव्हते तुम्ही बऱ्याच लोकांना जेवायला बोलावले आहे.नाही, हे पाहुणे नाहीत हे माझे कर्मचारी आहेत या सर्वांना मी आज जेवणासाठी बोलावले आहे.

परंतु या सर्वांमध्ये तुमच्यासारखा एक पाहुणा आहे ज्याला तुम्ही ओळखून दाखवा, असे श्रीमंत माणसाने बिरबलाला सांगितले. या सर्वांना तुम्ही एक विनोद सांगा आणि मी तुम्हाला तो पाहुना ओळखून दाखवेन, असे उत्तर बिरबलाने दिले. श्रीमंत माणसाने सर्वांना विनोद सांगितला सर्व लोक मोठमोठ्याने हसू लागले.

बिरबलाने एका माणसाकडे लक्ष केंद्रित केले आणि हेच तुमचे पाहुणे आहेत असे त्या माणसाला सांगितले. आश्चर्यचकित होऊन त्या माणसाने बिरबलाकडे कुतूहलाने विचारणा केली की तुम्ही हे कसे ओळखले.

हे अगदी सोपे आहे, तुम्ही सांगितलेला विनोद अगदी मजेशीर नव्हता परंतु तरीही सर्वजण जोरजोरात हसू लागले आणि तुमच्या पाहुण्यांनी फक्त स्मित हास्य केले आणि मी त्यांना ओळखू शकलो.

या पोस्टमध्ये आम्ही अकबर बिरबल यांच्या 10 मजेशीर गोष्टी दिलेल्या आहेत तरी त्या तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करुन कळवा.

This post is app about Akbar birbal stories in marathi. we have included akbar birbal ghost marathi, akbar birbal stories in marathi akbar birbal chi goshta, story in marathi with moral, akbar birbal goshti marathi madhe, story books of akbar and birbal and 10 famous and awesome stories of akbar birbal in marathi. We hope that you will like them. If you like these akbar birbal stories in marathi then please let us know about in by commenting below.

Read More
Categories