पहिल्यांदा आई बनणाऱ्या स्त्री चा तिच्या आपत्यासह दुसरा जन्म होतो असे म्हणतात.बाळाची काळजी कशी घ्यावी, त्याला कसे खाऊ घालावे, बाळाला कसे उचलून घ्यावे, दूध कसे पाजावे अशा खूप साऱ्या जबाबदाऱ्या पालकांना घ्याव्या लागतात. नऊ महिन्यांच्या लांब आणि असहाय्य वेदनांनंतर जेव्हा बाळ तुमच्या मांडीवर असेल आणि त्याचा आवाज ऐकून तुम्ही तुमचा त्रास विसरून जाल व तुमचा आनंद दुप्पट होईल, पण या आनंदा सोबतच तुमची जबाबदारीही वाढेल. परंतु काळजी करू नका, तुम्ही तुमच्या बाळाची काळजी कशी घ्यावी ( Baby Care Tips In Marathi) त्याबद्दल सविस्तर माहिती आम्ही या लेखामध्ये दिलेली आहे.

Baby Care Tips In Marathi Language


Baby Care Tips No 1. बाळाचा आहार:

आईचे दूध हे बाळासाठी एक संपूर्ण आणि संतुलित आहार आहे. नवजात मुलांना पहिल्या सहा महिन्यात फक्त दुधाची गरज असते. बाळाला सर्व पोषक घटक आईच्या दुधातून मिळतात .त्यामुळे बाळाला ६ महिने स्तनपान केलेच पाहिजे. जेव्हा बाळाला भूक लागली असेल तेव्हा ते समजणे फार कठीण असते म्हणून नेहमी भूक लागण्याची लक्षणे समजून घेण्याचा प्रयत्न करा जसे की बाळ रडणे, तोंडात बोटे घालने. दूध पिल्यानंतर बाळाने ढेकर देणे आवश्यक आहे जेणेकरून बाळाच्या पोटात गॅस होत नाही.

Baby Care Tips No 2. बाळाला उचलताना घ्यावयाची काळजी:

आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की नवजात जन्मलेले बाळ हे खूपच नाजूक असते आणि बाळाची काळजी व्यवस्तितरित्या घेतली पाहिजे. बाळाचे डोके व मान योग्यप्रकारे धारावी, जसेकी आपण त्याला आधार देत आहात. एक हात डोके आणि मानेच्या खाली ठेवा आणि दुसरा हात पायांच्या खाली ठेवा.
लहान मुलांना उचलून घेताना विशेष काळजी घेतली गेली नाही तर त्याच्या मणक्याच्या आणि मानेच्या हाडांमध्ये दबाव येऊ शकतो. जर बाळ रडत असेल तर त्याच्या पाठीवर हळुवार थाप मारली पाहिजे.

Baby Care Tips No 3.बाळाची खोली कशी ठेवावी:

तुमचे मूल हे नुकतेच या जगात आले आहे, म्हणून जंतूंशी लढण्यासाठी ते खूपच नाजूक आणि अशक्त आहे. म्हणून बाळाच्या आजूबाजूचे वातावरण तसेच स्वतःला देखील स्वच्छ ठेवले पाहिजे. बाळाला स्पर्श करण्यापूर्वी आपले हात अँटी सेफ्टीक लिक्विड (सॅनिटायझर) ने स्वच्छ करा. तुमचे घर तसेच बाळाच्या सर्व खेळण्यांचे निर्जंतुकीकरण करा.

बाळाला वापरणारी फीडिंग बॉटल साफ आहे का याची खात्री करा. नियमितपणे या बॉटलचे निर्जंतुकीकरण करा. कारण हे मुलांना आजारी पाडू शकतात.

Baby Care Tips No 4. डायपर वापरताना घ्यावयाची काळजी:

आपण कपड्यांचे डायपर वापरत असाल किंवा डिस्पोजेबल वापरत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची खात्री करणे आवश्यक आहे जसे, डायपर च्या सतत वापरामुळे बाळाच्या त्वचेवर पुरळ उठू शकतात म्हणून साबण रहित वाइप्स ने बाळाची त्वचा साफ केली पाहिजे. याशिवाय तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मलम वापरू शकता.

बाळाचे डायपर वारंवार तपासा.निरोगी बाळ वारंवार लघवी करत राहते. जर बाळ बराच वेळ गलिच्छ डायपरमध्ये राहिले तर संसर्ग आणि ऍलर्जीचा धोका वाढू शकतो. लहान मुलांचे कपडे स्वच्छ धुवा आणि कडक उन्हामध्ये वाळवा म्हणजे जंतू नाहीशे होतील. 

Baby Care Tips No 5. बाळाला झोपवताना घ्यावयाची काळजी:

बऱ्याचदा लहान मुले रात्री लवकर झोपत नाही त्यांची झोप रात्री विचलित होते आणि त्यामुळे ते अधिक चिडचिडे होतात. लहान मुले त्यांच्या शारीरिक समस्या सांगू शकत नाहीत म्हणून त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. 

लहान मुलांना अंगाई गीत खूप आवडते म्हणून अंगाई ऐकताच मुले झोपी जातात, तसेच अंगाई गाताना बाळाच्या पाठीवर हळुवार थाप मारली पाहिजे तसेच मुलांची झोपण्याची जागा स्वच्छ आणि आरामदायक असावी. 

Baby Care Tips No 6. लहान बाळ रडत असेल तर घ्यावयाची काळजी:

काही लोकांचा असा विश्वास असतो की लहान मुले नेहमी रडतातच परंतु हा विचार चुकीचा आहे जर लहान मुले रडत असतील तर याचा अर्थ असा आहे की त्यांना काहीतरी हवे आहे. मुले बऱ्याच वेळ भूक लागल्यावर आणि झोपण्यासाठी रडत असतात. जर बाळ भुकेले असेल तर त्याला खायला द्या आणि जर ते अजूनही रडत असेल तर त्याला झोपण्याचा प्रयत्न करा. 

यानंतरही जर बाळ रडत असेल तर त्याला कोणत्या प्रकारचा त्रास आहे हे तपासा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Baby Care Tips No 7. बाळासोबत नेहमी बोलत रहा:

बाळासोबत घरातील लोकांनी नेहमी बोलत राहिले पाहिजे कारण नवजात मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी हे आवश्यक आहे. तसेच नवजात मुलांचा मेंदू हा विकासाच्या दिशेने असतो.

Baby Care Tips No 8. लहान मुलांना एकटे सोडू नका:

शिशू रोग तज्ञांचे असे म्हणणे आहे की दोन महिने बाळाला एकटे सोडू नका. दोन महिन्यांपर्यंत नवजात मुलांना नेहमी डोळ्यासमोर ठेवले पाहिजे.

Baby Care Tips No 9.

लहान मुलांची खेळणी त्यांच्यापासून थोडी दूरच ठेवा. काही लोक खेळणी मुलांच्या जवळ ठेवतात. मऊ खेळण्यांमुळे मुलांना झोपताना त्रास होऊ शकतो आणि कठीण खेळण्यांमुळे मुलांना दुखापत होण्याची भीती असते. काही खेळण्यांमुळे मुलांना अलर्जी होण्याची भीती असते तसेच काही खळण्याना विशिष्ट्य प्रकारचे रंग मावळे जातात ज्यामध्ये घटक केमिकल चे प्रमाण असते त्यामुळे बाळ तोंडात खेळणी घालणार नाही याकडे सातत्याने लक्ष दिले पाहिजे. 

Baby Care Tips No 10.

बाळाच्या आहारा सोबतच आईच्याही आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे कारण जर आई निरोगी असेल तर बाळाचे स्वास्थ्यही चांगले राहते.
Read More:

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने