युपीएससी ची संपूर्ण माहिती | UPSC Exam Information In Marathi

या लेखामध्ये यूपीएससी परीक्षेची संपूर्ण माहिती दिलेली आहे. युपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्विस कमिशन (Union Public Service Commission). या परीक्षेसाठी लागणारी वयोमर्यादा म्हणजे किमान वय हे 18 पूर्ण व जास्तीत जास्त 32. (SC/ST- 5 वर्ष तसेच OBC- 3 वर्ष सवलत)

शिक्षण:-  उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे.  तसेच ही परीक्षा आपण कितीवेळा देऊ शकता यावर देखील काही ही निर्बंध आहेत ते खालील प्रमाणे
  • सर्वसामान्य उमेदवार ही परीक्षा सहा वेळा देऊ शकतात ( वय वर्ष 32 पर्यंत)
  • OBC मधील उमेदवार ही परीक्षा 9 वेळा देऊ शकतात (वय वर्ष 35 पर्यंत )
  • SC/ST मधील उमेदवारांना ही परीक्षा देण्यासाठी कोणतेही निर्बंध नाहीत ते कितीही वेळा ही परीक्षा देऊ शकतात (वय वर्ष 37 पर्यंत )

यूपीएससी परीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रम

यूपीएससी परीक्षा ही तीन टप्प्यांमध्ये होते पहिला टप्पा म्हणजे पूर्व परीक्षा, दुसरा टप्पा म्हणजे मुख्य परीक्षा आणि तिसरा टप्पा म्हणजे मुलाखत.

यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रम


पेपर कालावधी प्रश्न गुण
पेपर १ २ तास १०० २००
पेपर २ २ तास ८० २००
Total ४००
पेपर क्रमांक दोन हा केवळ पात्रतेसाठी असून त्यामध्ये विद्यार्थ्याला ते 33 टक्के गुण मिळवणे आवश्यक असते व महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षेसाठी होणारी निवड ही पेपर 1 मध्ये असलेल्या गुणांवरच होते.


यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रम


Sr.No पेपर विषय गुण
1
पेपर A
Indian Language(पात्रतेसाठी)
300
2
पेपर B
English (पात्रतेसाठी)
300
3
पेपर 1
निबंध
250
4
पेपर 2
General Studies 1
250
5
पेपर 3
General Studies 2
250
6
पेपर 4
General Studies 3
250
7
पेपर 5
General Studies 4
250
8
पेपर 6
optional subject 1
250
9
पेपर 7
optional subject 2
250
Total
1750

या परीक्षेमध्ये असणारे पेपर आणि पेपर बी हे हे फक्त पात्रतेसाठी असून विद्यार्थ्याला त्यामध्ये फक्त पास होणे अपेक्षित असते. या पेपरचे असणारे गुण हे एकूण गुणांमध्ये ग्राह्य धरले जात नाहीत.
त्यानंतर असते ती म्हणजे मुलाखत. मुलाखतीसाठी २७५ गुण असतात. अशाप्रकारे मुख्य परीक्षेमध्ये मिळालेले गुण व मुलाखतीमध्ये मिळालेले गुण यांची बेरीज करून एकत्रितपणे 2025 पैकी गुण काढले जातात. व या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड होते.

ऑप्शन साठी असणारे विषय


  • Agriculture
  • Animal Husbandry and Veterinary Science
  • Anthropology
  • Arabic
  • Botany
  • Chemistry
  • Civil Engineering
  • Commerce & Accountancy
  • Economics
  • Electrical Engineering
  • Geography
  • Geology
  • History
  • Law
  • Management
  • Mathematics
  • Mechanical Engineering
  • Medical Science
  • Philosophy
  • Physics
  • Political Science
  • Psychology
  • Public Administration
  • Sociology
  • Statistics
  • Zoology 

युपीएससीच्या पोस्ट या तीन प्रकारांमध्ये विभागल्या जातात


A.अखिल भारतीय नागरी सेवा [All India Civil Services]

  • भारतीय प्रशासकीय सेवा [Indian Administrative Service (IAS)]
  • भारतीय पोलिस सेवा [Indian Police Service (IPS)]
  • भारतीय वन सेवा [Indian Forest Service (IFoS)]


B.गट ‘अ’ सिव्हिल सर्व्हिसेस [Group ‘A’ Civil Services]
  • भारतीय परराष्ट्र सेवा [Indian Foreign Service (IFS)]
  • भारतीय ऑडिट आणि लेखा सेवा [Indian Audit and Accounts Service (IAAS)]
  • भारतीय नागरी खाती सेवा [Indian Civil Accounts Service (ICAS)]
  • भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा [Indian Corporate Law Service (ICLS)]
  • भारतीय संरक्षण लेखा सेवा [Indian Defence Accounts Service (IDAS)]
  • भारतीय संरक्षण एस्टेट सर्व्हिस [Indian Defence Estates Service (IDES)]
  • भारतीय माहिती सेवा [Indian Information Service (IIS)]
  • भारतीय आयुध कारखाना सेवा [Indian Ordnance Factories Service (IOFS)]
  • इंडियन कम्युनिकेशन फायनान्स सर्व्हिसेस [Indian Communication Finance Services (ICFS)]
  • भारतीय टपाल सेवा [Indian Postal Service (IPoS)]
  • भारतीय रेल्वे खाती सेवा [Indian Railway Accounts Service (IRAS)]
  • भारतीय रेल्वे कर्मचारी सेवा [Indian Railway Personnel Service (IRPS)]
  • भारतीय रेल्वे वाहतूक सेवा [Indian Railway Traffic Service (IRTS)]
  • भारतीय महसूल सेवा [Indian Revenue Service (IRS)]
  • भारतीय व्यापार सेवा [Indian Trade Service (ITS)]
  • रेल्वे संरक्षण बल [Railway Protection Force (RPF)]

गट ‘ब’ सिव्हिल सर्व्हिसेस Group ‘B’ Civil Services

  • सशस्त्र सेना मुख्यालय नागरी सेवा [Armed Forces Headquarters Civil Service]
  • डॅनिक्स [DANICS]
  • डॅनिप्स [DANIPS]
  • पांडिचेरी नागरी सेवा [Pondicherry Civil Service]
  • पांडिचेरी पोलिस सेवा [Pondicherry Police Service]

ही होती यूपीएससी (UPSC Exam Information In Marathi ) विषयी माहिती तर आपणास ही माहिती कशी वाटली आम्हाला जरुर कळवा तुमची काही प्रतिक्रिया असेल ती ही कळवा.
Read More
Categories