ऍमेझॉन कंपनीची संपूर्ण माहिती - Amazon Information In Marathi

ऍमेझॉन कंपनीची संपूर्ण माहिती, Amazon Information In Marathi,Amazon company Information In Marathi

या लेखामध्ये ॲमेझॉन(Amazon Information In Marathi) या कंपनी बद्दल संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे जी जगातील सर्वात मोठी कंपनी व त्याचे निर्माणकर्ता हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

ॲमेझॉन ची सुरुवात

ॲमेझॉन ची सुरुवात करण्यापूर्वी जेफ बेझोस हे न्यूयॉर्कमधील एका इन्व्हेस्टिंग कंपनीमध्ये व्हॉइस प्रेसिडेंट या पदावर कार्यरत होते. त्यावेळेस त्यांच्या असे लक्षात आले की इंटरनेट भरपूर वेगाने वाढत चालले आहे. म्हणजेच इंटरनेटचा वापर वर्षाखेरीस 2300 टक्के पेक्षा जास्त वाढत चालला आहे.

याचमुळे त्यांनी या संधीचा फायदा घेण्याचे ठरवले आणि इंटरनेट क्षेत्रात आपला व्यवसाय चालू करण्याचे देखील ठरवले. त्यानंतर सर्वप्रथम त्यांनी 20 ते 25 अशा गोष्टींची यादी बनवली जे ते ऑनलाईन विकू शकतील परंतु त्या सर्व यादीमधून त्यांनी पुस्तके ऑनलाइन विकणे याची निवड केली कारण त्यांना वाटत होते पुस्तकं तर बदलत नाहीत ना त्यांची किंमत बदलते, ना त्यांना मुदत असते व लोकांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध देखील होऊन जातील म्हणून त्यांनी पुस्तक ऑनलाईन विकण्याची सुरुवात करण्यासाठी ठरवले.

त्यांना वाटत होते की पुस्तके विकायची असतील तर आपल्याला त्या पुस्तकांचा साठा करून ठेवावा देखील लागणार नाही. जेव्हा कधी एखाद्या पुस्तकाची ऑर्डर त्यांना येईल तेव्हा ते पुस्तक बाजारातून विकत घेतील आणि त्या व्यक्तीला पोहोचवतील असा त्यांच्या मनात विचार होता.

आपली बिझनेस आयडिया फायनल केल्यानंतर ते सिएटल (seattle)ला गेले कारण त्यांना लागणारी टेक्नॉलॉजी सहज रित्या उपलब्ध होणार होती तसेच या शहरांमध्ये पुस्तकांची होलसेल दुकाने देखील भरपूर होती व अशा तऱ्हेने नोव्हेंबर 1994 मध्ये त्यांनी आपल्या गॅरेजमधून दोन प्रोग्रमसच्या मदतीने ॲमेझॉन ची सुरुवात केली.

ॲमेझॉन ची वाढ

सुरुवातीला त्यांना त्यांच्या या उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्याची गरज होती, त्यांच्याकडे असलेले पैसे तर आत्तापर्यंत सुरू केलेल्या व्यवसायांमध्ये निघून गेले म्हणून त्यांनी त्यांच्या वडीलांकडे या गुंतवणुकीची मागणी केली.

वडिलांनी विचारपूस केली असता जेफ बेझोस यांनी इंटरनेट द्वारे ऑनलाईन स्वरुपात पुस्तके विकण्याचा उद्योग असल्याचे सांगितले. त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी पहिला प्रश्न विचारला तो म्हणजे हे "इंटरनेट काय असते?"

त्यांच्या वडिलांना इंटरनेट काय असते हे माहित नसून देखील त्यांच्या वडिलांनी त्यांच्या या उद्योगांमध्ये गुंतवणूक केली कारण त्यांना त्यांच्या मुलावर ठाम विश्वास होता.

सुरवातीला त्यांची पहिली पत्नी मॅकेंझी यांनीदेखील जेफ बेझोस यांना संपूर्ण पाठिंबा दिला.

कंपनीचे नाव ॲमेझॉन

सुरुवातीला जेफ बेजोस यांनी जेव्हा आपली कंपनी रजिस्टर केली तेव्हा त्यांनी या कंपनीचे नाव डाबरा असे ठेवले. त्यांनी हे नाव आबरा का डाबरा या जादुई वाक्यापासून घेतले होते.

परंतु नंतर त्यांना असे लक्षात आले की आपल्या कंपनीचे नाव हे लोकांना प्रथमदर्शनी कळत नाही म्हणून त्यांनी लोकांमधील संभ्रम दूर करून याचे नाव सहज व लोकांच्या मुखामध्ये असलेल्या गोष्टीवरुन ठेवण्याचे ठरवले. त्यामुळेच त्यांनी ॲमेझॉन हे नाव शेवटी फायनल केले.

त्यांनी आपल्या वडिलांकडून मिळालेल्या पैशांच्या मदतीने अजून काही लोकांना कामावर ठेवले आणि 5 जुलै 1994 ला त्यांनी आपली ऍमेझॉन डॉट कॉम (amazon.com) ही कंपनीची वेबसाईट लॉन्च केली.

वेबसाइट लॉन्च नंतरच्या पहिल्या आठवड्यातच कंपनीने 12,438 डॉलर्स एवढ्या किमतीच्या ऑर्डर मिळवल्या. हळूहळू ॲमेझॉन या वेबसाईटवर येणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली त्यात ॲमेझॉन ला लागणारे ऑफिस व लोकांची संख्या देखील वाढू लागली. परिस्थिती अशी झाली की त्यांना दर सहा महिन्यांनी एक मोठे ऑफिस घेण्याची गरज भासत होती.

आता पुस्तकांची ची विक्री दमदार होत होती त्यामध्ये जेफ बेझोस यांनी ॲमेझॉन या वेबसाईटवर म्युझिक आणि मूवी विकण्याचा देखील निर्णय घेतला व त्यानंतर त्यांनी लोकांच्या गरजा लक्षात घेता अनेक घरगुती सामग्री, टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट व इतर गोष्टी वेबसाईटवर टाकण्यास सुरुवात केली.

डॉट कॉम बस्ट चा काळ

यानंतरचा काळ थोडा कठीण गेला कारण या काळात आला तो म्हणजे डॉट कॉम बस्ट . यामुळे अनेक लोक हे ॲमेझॉन च्या बिजनेस मॉडेलवर संशय घेऊ लागले. याचेच कारण म्हणजे 1998 साली त्यांच्या शेअर्सची किंमत $130 एवढी होती ती डॉट कॉम बस्ट नंतर 2001 साली फक्त $15 एवढीच राहिली.

2003 मध्ये हरी पॉटर या पुस्तकाचा पाचवा भाग बाजारामध्ये येणार होता. यासाठी ॲमेझॉन वेबसाइटवर लोक प्रिऑर्डर करू शकत होते. हे पुस्तक बाजारात येण्यापूर्वी या पुस्तकाच्या 13 लाख पेक्षा जास्त कॉपी या ॲमेझॉन वर प्रिऑर्डर च्या माध्यमातून विकल्या गेल्या होत्या.

त्यानंतर 2007 मध्ये ॲमेझॉनने किंडल बाजारामध्ये आणले त्याच्या माध्यमातून लोक ऑनलाईन पुस्तके वाचू शकत होते.

आताची परिस्तिथी

सध्याच्या परिस्थितीमध्ये ॲमेझॉन हे 13 देशांमध्ये कार्यरत आहे ते तसेच त्यांच्या कंपनीची किंमत ही जवळपास 820 बिलियन डॉलर पेक्षा जास्त आहे.

सारांश

हे शक्य झाले फक्त नि फक्त एका माणसाच्या जिद्दीमुळे. ज्याने स्वतःचे सुरळीत चाललेला जॉब सोडून बाजारामध्ये नवीन गोष्ट असलेल्या म्हणजेच इंटरनेट या क्षेत्रात नवीन काहीतरी करून पाहण्याची ची इच्छा मनात आणली आणि ती पूर्ण देखील केली. त्यामुळेच तर हा व्यक्ती जगातील श्रीमंत व्यक्ति आहे.

Read More
Categories