MUTUAL फंड बद्दल संपूर्ण माहिती Mutual Fund Information In Marathi

Mutual Fund Information In Marathi

तुम्हीं Mutual Fund बद्दल ऐकलेच असेल. परंतु काय तुम्हाला माहिती आहे कि Mutual फंड कसे काम करते? जर नसेल तर आपण आता तेच पाहणार आहोत.

Mutual Fund बद्दल माहिती | Mutual Fund Information In Marathi

Mutual Fund मध्ये खूप सारे गुंतवणूकदार पैसे गुंतवतात. हे पैसे व्यवस्तीत रित्या व्यवस्थापित (Manage) करण्यासाठी एक व्यवस्थापक (Manager )नेमला जातो. हा नेमलेला व्यवस्थापक गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती असतो. हा व्यवस्थापक गुंतवणूकदाचें पैसे share किंवा bonds मध्ये लावून गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो. व्यवस्थापक कमीत कमी जोखीम पत्करून जास्तीत जास्त नफा मिळविण्याच्या दिशेने काम करीत असतो.

Mutual फंडचा इतिहास | History Of Mutual Funds

१९६३ मध्ये भारतीय रिजर्व बँक व सरकार यांच्या मदतीने Mutual फंड ची सुरुवात झाली. ह्याचा मुख्य उद्देश छोटे मोठे गुंतवणूकदारांना आकर्षित करणे होता.

Shares आणि Mutual Fund मध्ये काय अंतर आहे?

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणे हे Shares मध्ये गुन्तवणूक करण्यापेक्षा वेगळे आहे. Shares मध्ये गुंतवणूक करण्यासाठी एकाद्या कंपनीचे Shares खरेदी करावे लागतात परंतु मुतुअल फंड च्या एका युनिट मध्ये गुंतवणूक हि कित्येक वेगवेगळ्या Shares मध्ये केलेल्या गुंतवणुकीचा हिस्सा असते.

NAV (नेट एसेट वैल्यू) म्हणजे काय?

Mutual फंड ची किंमत हि नेट ऍसेट वैल्यू (NAV ) प्रति युनिट मध्ये असते. Mutual फंड हे त्याच्या वर्तमान NAV वर खरेदी केला किंवा विकला जातो.

SIP म्हणजे काय?

SIP म्हणजे सिस्टेमैटिक इन्वेस्टमेंट प्लान. प्रत्येक महिन्याला थोडे थोडे पैसे जास्त कालावधीसाठी Mutual फंड मध्ये गुंतवण्याला SIP असे म्हणतात.

Mutual Fund चे प्रकार?

Mutual Fund चे भरपूर प्रकार आहेत परंतु आपण त्यांना दोन श्रेणींमध्ये विभागु शकतो.

A. MUTUAL फंड ची संरचना नुसार

१ Open Ended Mutual Fund

ह्या अंतर्गत गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार कोण्याही क्षणी Fund खरेदी किंवा विकू शकतात.

२. Close Ended Mutual Fund

ह्या अंतर्गत गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार Fund निर्धारित वेळे मध्येच खरेदी करू शकतात.

३.Interval Fund

हा fund Open-Ended आणि Close Ended दोन्हीना मिळून बनलेला असतो.

B. ऍसेट्स वर आधारित Mutual fund नुसार

१. Debt Fund

ह्या प्रकारच्या फंड मध्ये गुंतवणूकदाराला कमी जोखीम असते. कारण ह्याचे व्यव्स्थाहपक सरकारी बॉण्ड्स आणि वेगवेगळ्या निश्चित मिळकत भेटणाऱ्या गोष्टींमध्येच गुंतवणूक केली जाते.

२. Liquid Mutual Funds

ह्या फंड द्वारे कमी वेळासाठी आपणास गुंतवणूक करायची असेल तर ती ह्याच्या मदतीने करू शकता.

३. Equity Funds

जर तुम्हाला दीर्घकाळ outcome पाहिजे असतील तर Equity Funds हे आपल्यासाठीच बनले आहे. ह्यामध्ये जोखीम भरपूर असतो परंतु ह्याद्वारे भेटणार फायदा हा इतरांच्या टुनेर खूप जास्त असतो.

Mutual Fund चे फायदे?

तसे Mutual Fund चे भरपूर फायदे आहेत त्यातीलच काही आपण पाहणार आहोत.

१. Professional management

आपण ज्या Mutual Fund मध्ये पैसे गुंतवले आहेत त्या फंड चे व्यवस्थापक (Manager ) तो पैसे विविध ठिकाणी गुंतवतात. हे व्यवस्थापक ज्यामध्ये पैसे गुंतवणार आहेत त्याचा पूर्ण तर्हयेने अभ्यास करतात. त्याच्याबद्दल माहिती गोळा करतात आणि तेव्हाच्या ते एकाद्या फंड मध्ये गुंतवणूक करतात.

२. विविधता

फंड चे व्यवस्थापक गोळा झालेला पैसे हा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवत असतात ज्यामुळे रिस्क फॅक्टर कमी होऊन जास्तीत जास्त नफा मिळण्यास मदत होते.

३. सुविधा

जितक्या सोप्प्या पद्धतीने तुम्ही मुतुअल फंड मध्ये पैसे गुंतवता तितक्याच सोप्या पद्धतीने ते लगेच काढू हि शकता.

४. टॅक्स बद्दल चे फायदे

जेव्हा आपण share बाजारात गुंतवणूक करता तेव्हा ते सहारे खरेदी करण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी आपल्याला टॅक्स द्यावा लागतो. परंतु Mutual Fund मध्ये यासाठी कोणताच टॅक्स द्यावा लागत नाही.

Mutual Fund चे तोटे?

Mutual Fund चे फायदे पाहून अनेक लोक त्याच्याकडे आकर्षित होतात परंतु जश्या नाण्याला दोन बाजू असतात तश्याच Mutual Fund मध्ये गुंतवणुकीला देखील आहेत. Mutual Fund च्या युनिट ची किंमत हि NAV मध्ये मोजली जाते आणि त्यामध्ये उतार चढाव हा होताच असतो. हे Mutual Fund Professional Manager द्वारा व्यवस्थापित केले जातात त्यामुळे त्यांचे Returns देखील जास्त असू शकतात परंतु याची काही शाश्वती देता येऊ शकत नाही कारण हे Mutual Fund मार्केट मध्ये असणाऱ्या घटकांवर प्रभावित होत असतात.

तर मित्रानो आपल्याला हि माहिती आवडलयास नक्कीच आम्हाला comment बॉक्स मध्ये कळवा आणि जर आपल्याकडे काही suggestions असतील तर तेही आमच्याशी नक्कीच share करा. आमच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका.

Read More
Categories