Letter Writing In Marathi With Examples | पत्रलेखन

letter writting

पत्रलेखन हि सुद्धा एक कलाच आहे. आपल्या मनातील विचार, भावना समाजापर्यंत पोहोचवण्याचे पत्र हे एक उत्कृष्ट साधन आहे. आपण आतापर्यंत खूप पत्रे पारंपरिक पद्धतीने लिहिली असतील परंतु आता आपण तंत्रज्ञान युगात राहतो. इंटरनेट, मेल, कॉम्पुटर, मोबाइल याद्वारे आपली तंत्रज्ञानाशी चांगली मैत्री झाली आहे.

जसजसा फोनचा चा वापर वाढला तसतशी पत्रलेखनाची गरज कमी झाली. असे असूनही अनौपचारिक पत्रात आपल्या भावना प्रकर्षाने व्यक्त करता येणे हे एक आवश्यक कौशल्य आहे. अनौपचारिक पत्रात आपली भावना, मागणी, तक्रार योग्य आणि कमी शब्दात समाजापर्यंत पोहोचवने आवश्यक आहे. याफुढे पत्रलेखनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे.

आताच्या काळात मेल पाठवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे आणि काही ठिकाणी करत देखील आहे. त्यामुळे पत्रलेखनाचे स्वरूप हे तंत्रन्यानानुसार बदलण्यात आलेले आहे.

पत्रलेखनाचे स्वरूप

दिनांक- १ जानेवारी, २०२०
प्रति,
माननीय - (अधिकारी, प्राचार्य,शिक्षक,सन्माननीय व्यक्ती) किंवा
तीर्थरूप - (वडील,काका मामा) किंवा
प्रिय-(मित्र,मैत्रीण,भाऊ,बहीण, मुलगा, मुलगी)
(------------------------------------------
----------------पत्ता-----------------------)

विषय - (------------------ -------------- --------------------------)

महोदय,

(-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------मायना ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------)
अधिकारी असल्यास (आपला, आपली नम्र)
शिक्षक असल्यास (तुमचा,तुमची आज्ञाधारक)
वडील, काका असल्यास (आपला नम्र)
(पत्र लिहिणार्याचे नाव )
(----------------------
पत्र लिहिणार्याचा पत्ता
----------------------- )

नमुना पत्र १ - पुस्तकांच्या मागणी बाबत

दिनांक- 1 जानेवारी 2022
प्रति,
माननीय व्यवस्थापक,
प्रगती पुस्तकालय ,
१०२,विकास नगर,
डॉ. आंबेडकर मार्ग,
पुणे, ४९० ००४

विषय-पुस्तकांच्या मागणी बाबत.

महोदय,
स. न. वि. वि.

आमच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी आम्हाला काही पुस्तके हवी आहेत, त्याची यादी खाली दिलेली आहे, तरी महाविद्यालयाच्या पत्त्यावर ती पाठवावीत ,हि विनंती. आपण आम्हाला पुस्तकाच्या किमतीत नेहमीच सवलत देता, ती याही वेळेस मिळावी अशी आशा आहे. पुस्तकांची यादी फुढील प्रमाणे:

पुस्तकाचे नाव लेखक / कवी प्रति
श्यामची आई पांडुरंग सदाशिव साने १०
दासबोध समर्थ रामदास स्वामी
गुलामगिरी ज्योतिराव फुले १३

आपला विश्वासू,
(------- ----------- ----------)
ग्रंथपाल, प्रगती पुस्तकालय
१०२,विकास नगर,
डॉ. आंबेडकर मार्ग,
पुणे, ४९० ००४

नमुना पत्र २ - लिपिकाच्या पदासाठी अर्ज

दिनांक- १ जानेवारी २०२०

प्रति,
माननीय प्राचार्य,
XYZ विद्यालय ,
१०२,विकास नगर,
डॉ. आंबेडकर मार्ग,
पुणे, ४९० ००४

विषय: लिपिकाच्या पदासाठी अर्ज.

महोदय,

आपल्या महाविद्यालयात लिपिकाचे पद भरायचे असल्याबाबतची जाहिरात आज दिनांक १ जानेवारी २०२० च्या दैनिक सकाळ च्या अंकात वाचली. मी हा सादर अर्ज करत असून मी या पदासाठी इच्छुक आहे.

मी ABC पदवीधर असून २०१८ साली इतिहास व अर्थशास्त्र या भाषांतील पदवी परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झालो आहे. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच मी इंग्रजी आणि मराठी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण झालो आहे. माझी इंग्रजी टायपिंग ची गती ६५ शब्द प्रति मिनिट आहे तसेच मराठी टायपिंग हि सहजतेने करू शकतो.

मी ______ महाविद्यालयात मागील दोन वर्षांपासून टंकलेखकाचे काम करत आहे. मी आपल्या महाविद्यालयातीळ काम समाधानकारकरित्या पार पाडीन याची मला खात्री आहे.

माझ्या परीक्ष्यांची गुणकपत्रे आणि प्रमाणपत्रे तसेच शिफारस पत्र व माझ्या वर्तवणुकीचा दाखल यांच्या सत्य प्रति सोबत जोडल्या आहेत.

माझ्या अर्जाचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून मला मुलाखतीची संधी द्यावी हि नम्र विनंती.

आपला विश्वासू,
(श्याम क. आपटे )
अजिंक्य सदन,
अनुबंध रोड,
पुणे ४१२५४.

सहपत्रे:
१. पदवी परीक्षेचे प्रमाणपत्र (झेरॉक्स प्रत )
२. टायपिंग प्रमाणपत्र (झेरॉक्स प्रत )

नमुना पत्र ३ - घरगुती पत्र

दिनांक- १ जानेवारी २०२०

प्रति,
प्रिय मामा,
चिरायू सदन ,
१०२,विकास नगर,
डॉ. आंबेडकर मार्ग,
पुणे, ४९० ००४

तीर्थरूप मामास,
सा. न. वि. वि.

काही दिवसांपूर्वी मामा तुझे पत्र मिळाले, त्यातून तू दिलेल्या गोड शुभेचाही मिळाल्या. २२ फेब्रुवारी पासून माझी परीक्षा सुरु होत आहे. माझ्या अभ्यासाची तयारी हि चांगली झाली आहे. मी मागील वर्षीच्या सर्व प्रश्नपत्रिका सोडविल्या आहेत आणि त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे पण १२ वी झाल्यानंतर पुढे काय करावे याचा निर्णय मी अजून घेतलेला नाही. आई बाबा म्हणतात "तुला जे आवडते ते निवडण्याची तुला मुभा आहे परंतु तो निर्णय तू व्यवस्तीत विचार करून घे." मामा, याबाबतचा निर्णय मी तुझ्याशी चर्च्या करूनच घ्यावा असे मला वाटत आहे, म्हणून माझी परीक्षा संपल्यानंतर मी तुझ्याकडे येऊ का?

मार्च च्या पहिल्या आठवड्यात माझी परीक्षा संपेल, नंतर मी तुझ्याकडे येण्याचा विचार केला आहे. त्याच काळात तुझा काही खास कार्यक्रम नाही ना? तुझ्या ऑफिस च्या कामासाठी तू कोठे बाहेर जाणार नाहीस ना?

मामा, माझ्या मित्रांशी चर्च्या केली असता ते इंजिनीरिंग व डॉक्टर अभ्यासक्रम निवडू इच्छित आहेत. पण आमची आर्थिक परिस्तिथी लक्ष्यात घेता होणारा आर्थिक भार मला माझ्या बाबांवर टाकायचा नाही आणि मला त्यात आवड सुद्धा नाही. मला लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे रहायचे आहे. त्या दृष्टीने एकादा व्यवसाय किंवा नोकरीची हमी देणारा कोर्स तुझ्या माहितीत आहे का? त्यामुळे याबाबत तू विचार करून ठेव. मी आल्यावर आपण याबाबत विचार करू.

आजीला आणि मामींना साष्टांग नमस्कार. छोट्या श्रेयस ला अनेक आशीर्वाद.

आपला आज्ञाधारक,
(अक्षय शांताराम माने )
अजिंक्य सदन,
अनुबंध रोड,
सांगली ४२२५४

पत्रातील संक्षेपांचे अर्थ

शि. सा. न. वि. वि.- शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष.
सा. न. वि. वि. - साष्टांग नमस्कार विनंती विशेष.
स. न. वि. वि. - सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
चि.- चिरंजीव
ती.- तीर्थरूप
सौ.- सौभाग्यवती
श्री. - श्रीयुत
श्रीम. - श्रीमती
मा. - माननीय

जर तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. अश्याच नवीन नवीन गोष्टी आपल्या मातृभाषेतुन मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक पेज ला like करून आमचे मनोबल वाढवा.

Read More
Categories