Information On Parrot In Marathi | पोपटाबद्दल माहिती आणि निबंध (Essay)

पोपटाबद्दल माहिती आणि निबंध | Information & Essay On Parrot In Marathi

या पोस्टमध्ये आहे पोपटाबद्दल माहिती ( Information On Parrot In Marathi) तसेच निबंध.

information on parrot in marathi

पोपट हा एक अतिशय सुंदर, अविश्वसनीय आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा पक्षी आहे. जगभरात सुमारे ३७२ प्रजातींचे पोपट आढळतात. पोपट हे चमकदार रंगाचे आढळतात. भारतातील पोपट हे हिरव्या रंगाचे असतात.

त्यांना लाल वक्राकार चोच, दोन पाय ज्यांना प्रत्येकी चार चार नख्या असतात तसेच त्यांना हिरवी पिसे असतात. त्याच्या मानेभोवती काळ्या रंगाचा वक्राकार वलय आढळतो. पोपट हे उष्णकटिबंधीय हवामानातच आढळतात. ते असे एकमेव पक्षी आहेत जे तोंडात अन्न आणण्यासाठी त्याच्या पायाचा वापर करू शकतात.

पोपटांकडे सर्वात कणखर चोच असते. ते सर्वात कठीण कवच असलेले पदार्थ देखील आपल्या चोचीने फोडू शकतात. पक्षांच्या सर्व जातींपैकी पोपटाला सर्वात बुद्धिमान पक्षी मानले जाते कारण ते उत्तम प्रकारे ऐकलेल्या आवाजाची नक्कल करू शकतात.

भारतीय पोपटांचे आयुष्य हे सरासरी २०-३० वर्ष्यापर्यंत असते. ते बहुदा कीटक, फळे, बियाणे खातात. हे पदार्थ खाण्यामध्ये त्यांची वक्राकार चोच त्यांना खूप उपयुक्त ठरते. त्याला मुख्यतः पेरू, कठीण कवचाची फळे आवडतात

पोपट हे सहसा झाडांच्या पोकळीत आपले घरटे बांधतात. ते हवेत वेगाने उड्डाण करू शकतात. पोपट हे एकत्र राहतात आणि बर्‍याचदा अन्नाच्या शोधात एकत्रितपणे बाहेर पडतात.

पोपटांच्या सर्वच जातींमध्ये नर व मादा सारखेच दिसतात. त्यांच्यातील फरक ओळखण्यासाठी आपणास त्यांच्या रक्ताची चाचणी करावी लागते. इतर पक्ष्यांच्या प्रजातींप्रमाणे पोपटही अंडी देतात. त्यांच्याकडे असलेल्या नक्कल करण्याच्या क्षमतेमुळे ते आपल्याला हवेहवेसे वाटतात. त्यांच्या याच वृत्तीमुळे आपण त्यांना पिंजऱ्यात ठेवतो परंतु हे सरासर चुकीचे आहे कारण प्रर्त्येक प्राण्याला स्वतःचे आयुष्य मुक्तपणे जगण्याचा अधिकार आहे.

जगातील सुमारे एक चतुर्थांश पोपट नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जंगलतोडी व होणारा पर्यावरणाचा ह्रास यामुळे सुंदर अश्या या पोपटांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.

पोपटाबद्दल काही थोडक्यात माहिती

  1. वैज्ञानिक नाव: Psittaciformes (पित्तासिफोर्म्स)
  2. थोडक्यात माहिती : पोपट हे बऱ्याच रंगामध्ये अढळतात परंतु भारतात ते प्रामुख्याने हिरव्या रंगामध्येच आढळतात.
  3. आकार : पोपटांचे आकार हे त्यांच्या विविध जातींनुसार आढळतात. परंतु भारतात ते प्रामुख्याने ३०-४० सेंमी पर्यंत आढळतात.
  4. वजन : सरासरी 260 ग्रॅम
  5. पंखांची लांबी : सरासरी १५-१८ सेंमी

❌महत्वाचे❌

कृपया लक्ष द्या....

पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्याचे अस्तित्व हे पर्यावरणाचा समतोल राखण्याचे महत्वाचे काम करत असते. आपण मानव सुद्धा याचाच एक भाग आहोत तसेच प्रत्येक प्राण्याची पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्वाची भूमिका व गरज आहे. पोपट हा त्यातील एक. ते जंगलात असो किंवा बंदिवासात, त्यांचे अस्तित्व टिकून राहणे हि आपली जबाबदारी आहे. या पक्ष्यांना पकडणे, मारणे हे काही बरोबर नाही. या पक्ष्यांचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी आपणच त्यांची चांगलीकाळ्जी घेतली पाहिजे. चला तर मग आपण अश्या लुप्त होत चाललेल्या प्रजातींना वाचविण्यास मदत करू आणि त्यांची संख्या वाढविण्यास प्रयत्न करूयात.

तर आपणास हि माहिती आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. हि माहिती आपली मित्र मैत्रिणींशी नक्कीच शेअर करा.

Read More
Categories