जेनेरिक औषधांबद्दल माहिती | फरक, उपयुक्तता, उपलब्धता, तक्रार |Generic Medicine Information In Marathi

Generic Medicine Information In Marathi

आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत जेनेरिक औषधे म्हणजे काय? (What Is Generic Medicine?) ब्रँडेड आणि जेनेरिक औषधे यांमधील फरक? (Difference Between Branded Medicine And Generic Medicine?) जेनेरिक औषधे कोठे मिळतात? त्यासाठी प्रेस्क्रीप्शन ची गरज असते का? व बरेच काही.

आज संपूर्ण देशात कंपन्या आपले ब्रँड निर्माण करून वेगवेगळी औषधे बनवतात परंतु ब्रँड शिवाय जी औषधे बनविली जातात आणि त्यांची विक्री केली जाते ती औषधे म्हणजेच जेनरिक औषधे.

ब्रँडेड औषधांमध्ये ज्या घटकांचे प्रमाण वापरले जाते तेच प्रमाण वापरून जेनेरिक औषधे बनवली जातात. त्यामुळे या दोन्ही औषधांचा परिणाम हा सारखाच असतो. परंतु जेनरिक औषधांच्या अपुऱ्या माहितीमुळे या औषधांबद्दल अनेक गैरसमज लोकांच्या मनात आहेत.

ब्रँडेड औषधांचा किमतीमध्ये असलेली वाढ ही त्या मागील असलेले घटकांमुळे आहे. तर आज आपण या लेखांमधून जेनरिक औषधांची माहिती पाहूया.

ब्रँडेड औषधे आणि जेनरिक औषधे यांमधील फरक?

ब्रँडेड औषधे आणि जेनरिक औषधे यांमधील मुख्य फरक म्हणजे त्यांची किंमत हाच आहे.

ब्रँडेड औषधांवर संशोधनाचा खर्च तसेच त्यावर केलेल्या विज्ञापना चा खर्च देखील संबंधित कंपनी औषधांचा किमती मधून काढते आणि औषधांच्या संपूर्ण उत्पादनाच्या किमतीवरू औषदांची किंमत ठरवली जाते. त्यामुळेच ब्रँडेड औषधांच्या किंमतीत जेनरिक औषधा पेक्षा पाच ते दहा टक्के वाढ जाणवते.

अमेरिकेत पाहिले असता औषधांची बाजारपेठेत ८० टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त जेनरिक औषधांचा वापर दिसून येतो. त्यामुळे दरवर्षी अमेरिकेत शेकडो अब्ज रुपये वाचविले जातात. अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या औषधांमध्ये जास्त प्रमाण हे भारतातून उत्पादन केलेल्या औषधांचे आहे.

भारतामध्ये गरिबांसाठी सरकारी आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत परंतु डॉक्टरांनी लिहिलेल्या ब्रँडेड औषधांचा खर्च हा खूप मोठा आहे. जर डॉक्टरांनी जेनरिक औषधे लिहण्यास सुरुवात केली तर होणारा औषधाचा खर्च हा कमी होण्यास मदत होईल.

उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, रदयविकार हे मोठया लोकांचे आजार मानले जात होते, पण या आजाराचे प्रमाण हे सामान्य जनतेमध्ये ही दिसून येते. या आजारासाठी दीर्घकाळ औषधे घावी लागतात परंतु जर या आजारासाठी जेनरिक औषधे उपलब्ध करू दिली तर होणारा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल.

फ डी ए (FDA) ची भूमिका ?

डॉक्टरांनी रुग्णांना प्रिस्क्रीप्शन मध्ये जेनरिक औषधे लिहून द्यावीत नाहीतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. अशी भूमिका अन्न व औषध प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे जेनरिक औषधांची मागणी वाढून लोकांमध्ये त्याबद्दल संभ्रम होणार नाही.

जेनरिक औषधे कोठे कोठे मिळतात ?

जरी डॉक्टरांनी जेनेरिक औषधे लिहून दिली तरी ती कोठे मिळणार याबाबत चिंता लोकांच्या मनात आहे. जेनेरिक औषधे ही कोणत्याही मेडिकल स्टोर मध्ये मिळू शकतात अथवा तशी मागणी आपण केमिस्टकडे केली तरी आपल्याला जेनेरिक औषधे मिळू शकतात.

प्रेस्क्रीप्शन ची गरज असते का?

जेनेरिक औषधे घेण्यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन ची गरज ही असते. रुग्णांना कोणत्या औषधांची गरज आहे त्याची किती मात्रा लागणार आहे त्यांच्या विचार करूनच डॉक्टर औषधे लिहून देतात त्यामुळे जेनेरिक औषधे घेताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

जेनेरिक औषधे न मिळण्याचे कारण?

भारतातील औषधी कंपन्यांचे प्रमाण वाढले असल्यामुळे कंपन्या आपल्या ब्रँडची जाहिरात करण्यासाठी मार्केटिंग वर भरपूर खर्च करतात तसेच डॉक्टरांना फ्री सॅम्पल भेटवस्तू दिल्या जातात हे सर्वांनाच माहीत असेल त्यामुळे डॉक्टरही जनेरिक औषधांच्या ऐवजी महागड्या ब्रँडची औषधे लिहून देतात असा आरोप केला जात आहे परंतु हे सर्वच ठिकाणी होत नाही.

भारतातील डॉक्टरांच्या मते भारतातील एफ डी ए अमेरिकेतील एफ डी ए प्रमाणे कार्यरत नाही तसेच भारतातील यंत्रणा ही अमेरिकेतील यंत्रणे एवढी सक्षम नाही आणि ही औषधे योग्य प्रकारे तयार केलेली नसल्यास रुग्णांच्या आरोग्यास धोका उद्भवतो अशावेळी त्या रुग्णांची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न डॉक्टर विचारत आहेत.

जेनेरिक औषधे योग्य प्रकारेच बनवली गेली आहेत परंतु सर्वच कंपन्या हे ठामपणे सांगत नाहीत कारण असे झाल्यास त्या कंपनीच्या पोटावर पाय येऊ शकतो त्यामुळेच जेनेरिक औषधांची लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचत नाही.

जर आपणास जेनेरिक औषधांबाबत काही प्रश्न किंवा तक्रार असल्यावर काय कराल?

जेनेरिक औषधांबद्दल माहिती किंवा तक्रार नोंदवण्यासाठी खाली दिलेल्या ई-मेल ॲड्रेस किंवा फोन नंबर वर आपण फोन करू शकता.

Email Id - [email protected]

Phone No- 1800-180-8080

Website - http://www.janaushadhi.gov.in/

तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्र-मैत्रिणी सोबत शेअर करा आणि ह्या जेनेरिक औषधांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद!!!

Read More
Categories