सकाळी लवकर उठण्याचे हे आहेत फायदे...

सकाळी लवकर उठण्याचे फायदे

benefits of early rising

मित्रांनो ते म्हणतात ना, लवकर निजे लवकर उठे त्यास आयु आरोग्य लाभे. याचा अर्थ जो लवकर झोपतो आणि लवकर उठतो त्याला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व धनसंपदा लाभते. त्यामुळे धर्मशास्त्रात सांगितले आहे ये की लवकर झोपणे हेच आरोग्यासाठी चांगले आहे. सकाळी लवकर उठल्यामुळे जे काही फायदे होतात ते आपण आता पाहणार आहोत.

पहाटेचा सूर्यप्रकाश:

सूर्यप्रकाश, विशेषत: दररोज सकाळी सूर्य उगवल्यावर बरोबरच उठल्याने आपल्या शरीराला कोवळा सूर्यप्रकाश मिळतो. सकाळचा सूर्यप्रकाश हा D-जीवनसत्वाचा एक चांगला स्रोत आहे. हे डी जीवनसत्व कॅल्शियमच्या पोषणामध्ये मदत करते. ज्यामुळे हाडे आणि दात मजबूत होण्यास मदत होते. सकाळचा सूर्य, निसर्गाच्या सौंदर्यासह, शांत, प्रदूषणवीणा असलेले वातावरण- मन प्रसन्न करण्यास मदत करते आणि जे एक निराशाविरोधी औषध देखील आहे. त्यामुळे सकाळी लवकर उठल्यामुळे आपणास सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तम आरोग्य लाभत असेल तर आपल्याला सकाळी लवकर उठण्यासाठी काहीच हरकत नाही. सकाळी लवकर उठणे ही अशी एक अशी आरोग्यदायी गोष्ट आहे जी आपल्याला लवकर उठून आपले जीवन साध्या केलेच पाहिजे.

एकांत:

या धकाधकीच्या जीवनामध्ये सकाळी लवकर उठून जर आपण स्वतःशी बोलणे चालू केले तर आपल्या मनामध्ये काय चालले आहे ते लगेच कळू शकते. फक्त विचार करावा लागतो तो म्हणजे आपण काल काय केले आपला कुठे वेळ वाया गेला आणि कुठे आपण कमी पडलो. या सर्व गोष्टींचा एकांतामध्ये अभ्यास करून आपण आपल्या गोष्टी सुधारू शकतो त्यामुळे भविष्यात यशस्वी होण्याची संभाव्यता वाढते.

स्वामी विवेकानंदांचे तुम्हाला वाक्या माहिती असेल ‘ दिवसातून एक वेळा तरी तुम्ही स्वतःची संपर्क साधा. जर तुम्ही तुमच्या मनाशी संपर्क साधत नसाल तर तुम्ही जगातील सर्वात उत्कृष्ट अशा व्यक्तीला गमावत आहात’. त्यामुळे मित्रांनो सकाळ ही एकांत देणारी असते. ना आजूबाजूला आपल्याला त्रस्त करणारे आवाज असतात ना त्रस्त करणाऱ्या गोष्टी असतात. असतो तो फक्त एकांत.

सकाळी लवकर उठल्यामुळे मिळणारा भरपूर वेळ:

मित्रांनो सकाळी लवकर उठल्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात भरपूर वेळ मिळतो. जर माणसाचे सरासरी आयुष्य हे सत्तर वर्ष पकडले आणि तो माणूस जर प्रत्येक दिवशी आठ तास झोपत असेल तर तो साधारणपणे त्याच्या आयुष्यातील 23 वर्ष हे फक्त नि फक्त झोपण्यामध्ये घालवतो. लवकर उठल्यामुळे आपण आपल्या ध्येयावर लक्ष व्यवस्थित केंद्रित करू शकतो तसेच लवकर उठल्यामुळे आपल्या रोजच्या कामांमधून वेळ काढून तो वेळ हा व्यायामासाठी किंवा योगा व मेडिटेशन करण्यासाठी गुंतवू शकतो. त्याचा फायदा आपल्याला भविष्यात नक्कीच मिळणार.

कार्य करण्याची क्षमता वाढते:

एक संशोधन करण्यात आले जे टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आले होते. हे संशोधन हे सकाळी उठल्यामुळे आपली कार्यक्षमता वाढते की नाही हे पाहण्यावर होते. त्यामध्ये असे आढळून आले की जे व्यक्ती सकाळी लवकर उठतात त्यांच्यामध्ये असणारी कार्य करण्याची क्षमता ही उशिरा उठणाऱ्या लोकांपेक्षा जास्त असते. म्हणूनच यशस्वी लोक सकाळी लवकर उठून आपल्या कामाची सुरुवात करतात.

सकाळी लवकर उठल्यामुळे होणारा ताण हा कमी होतो:

सकाळी लवकर उठल्यामुळे आपल्या कामाचे व्यवस्थित नियोजन होते त्यामुळे आपल्याला पुरेसा वेळ मिळतो. ह्या मिळालेल्या पुरेशा वेळामुळे आपल्याला गडबड आणि चिंता होत नाही. याउलट जी व्यक्ती उशिरा उठतात त्यांना त्यांच्या पुढील कामाची ची तयारी करावयाची असते परंतु त्यांच्याकडे तेवढा वेळ शिल्लक राहिलेला नसतो म्हणून ती लोक घाईगडबड करतात. आणि त्यांचे काम वेळेवर झाले नाही की त्यांना मानसिक ताण व चिडचिडेपणा होतो. म्हणून मित्रांनो जर आपल्यावरील ताण कमी करायचा असेल तर सकाळी लवकर उठणे शिवाय पर्याय नाही.

मनःस्थिती व्यवस्थित राहते:

सकाळी लवकर उठणारया व्यक्तींची मनस्थिती ही आनंदित राहते कारण त्यांचे सर्व काम हे व्यवस्थित रित्या योग्य पद्धतीने झालेले असते. त्यामुळे लवकर उठणारया व्यक्तींमध्ये सकारात्मकता ही दिसून येते. याउलट जे लोक उशिरा उठतात त्यांचा प्रत्येक कामाला हा उशीर होतच राहतो आणि या होणाऱ्या उशीरा मध्ये यांच्यामध्ये नकारात्मकता दिसून येते. या नकारात्मकतेमुळे त्यांची मनस्थिती ही व्यवस्थित नसते.

आरोग्य व्यवस्थित राहते:

सकाळी लवकर उठल्यामुळे व पुरेसा वेळ उपलब्ध असल्यामुळे ती सकाळी लवकर उठणार व्यक्ती स्वतःकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकतात. जसे की त्यांचे खानपान, यांचा व्यायाम, त्यांची मानसिकता, त्यांचे ध्येय आणि बऱ्याच गोष्टी. उशिरा उठल्यामुळे त्या व्यक्तींकडे पुरेसा वेळ नसतो त्यामुळे त्यांची प्रत्येक गोष्टीत गडबड होत असते. याच कारणांमध्ये ते त्यांच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकत नाहीत.

नियोजन:

सकाळी लवकर उठल्यामुळे आपल्याला आपल्या सर्व गोष्टींचे व्यवस्थित नियोजन करण्यास पुरेसा वेळ मिळतो ज्यामध्ये आपण आपल्या बारीक-सारीक गोष्टींचे नियोजन करू शकतो जेणेकरून ते पुढे येणाऱ्या गोष्टींना आपण व्यवस्थितरीत्या सामोरे जाऊ शकू.

सकाळचा नाश्ता:

सकाळचा नास्ता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण दिवसांमध्ये जो काही आहार घेतो त्या आहारामध्ये जवळपास चार ते पाच तासाचे अंतर असते. परंतु रात्रीच्या आहारा नंतर आपण झोपी जातो आणि सकाळी उठल्यानंतरच आहार घेतो. या सकाळी घेतल्या जाणाऱ्या आहारामध्ये असणारे अंतर हे भरपूर असते जवळपास नऊ ते दहा तास. याचा अर्थ असा होतो की नऊ ते दहा तास तुमच्या पोटामध्ये काहीही नसते. त्यामुळे आपल्या शरीराला सकाळचा नाश्ता हा खूप गरजेचा असतो. जर आपण उशिरा उठत असो तर हेच अंतर जवळपास अकरा ते बारा तासापेक्षाही जास्त होऊन जाते त्यामुळे याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. याचमुळे सकाळचा नाष्टा हा महत्त्वाचा ठरतो.

तर मित्रांनो आपल्या या गोष्टी कशा वाटल्या आम्हाला नक्कीच कळवा आणि आपल्याला काही सुचवायचे असेल तेही आपण सुचवू शकता. आपण आमच्या फेसबुक पेजला लाईक करून अशाच नवीन नवीन गोष्टींची जोडलेले रहा आणि आमचे मनोबल वाढवा.

हे पण वाचा

Categories