विमानाचा रंग हा पांढरा का असतो? | Why Are Airplanes Usually White?

आपण सर्वानी पाहिलेल्या विमानाचा रंग हा पांढराच का असतो? असा कधी विचार केला आहे का?

Why Are Airplanes Usually White

आपण विमान बघितले असेल बहुधा विमानाने प्रवास हि केला असेल परंतु तुम्ही कधी काळे, पिवळे, निळे अथवा हिरवे विमान पहिले आहे का ? चला तर आज आपण हेच पाहणार आहोत कि विमानाचा रंग हा पांढरा का असतो?

१ सूर्यप्रकाश प्ररावर्तित करण्याची क्षमता - उन्हाळ्यामध्ये आपण जेव्हा काळ्या रंगाचे कपडे घालतो तेव्हा आपल्याला खूप घाम येतो कारण काळा रंग हा उष्णता शोसून घेण्याचे काम करतो. पांढरा रंग हा सूर्यप्रकाश प्ररावर्तित करतो. म्हणून विमान कमीत कमी तापावे यासाठी विमानाला पांढरा रंग दिला जातो तसेच ...

२ फिका पडणे - उच्च उंचीवर उड्डाण करताना, विमान पूर्णत: बाह्य वातावरणास सामोरे जात असते. जसे बाकीचे रंग कालांतराने फिके पडत जातात याउलट पांढरा रंग हा फिका पडत नाही.

३ झालेली हानी दर्शवते - सुरक्षेच्या कारणास्तव विमानाचे नियमितपणे क्रॅक आणि डेन्ट्स सारख्या नुकसानीची तपासणी केली जाते. त्यातच पांढऱ्या रंगामुळे डेन्ट्स, तेलाची गळती आणि इतर दोष सहजपणे ओळखले जाऊ शकतात आणि त्याची लगेच दुरुस्ती केली जाऊ शकते.

४ पक्ष्यांचे धडकणे - पक्षी विमानाला धडकणे हि गोष्ट जरी सामान्य वाटत असली तरी त्यापासून होणारे नुकसान हे फार मोठे ठरते.

त्यामुळे विमानाचा पांढरा रंग हा विमानाची दृश्यमानता वाढवतो त्यामुळे पक्ष्यांद्वारे त्याची ओळख पटणे आणि अपघात टाळण्याची संभाव्यता वाढते.

५ स्वस्त - विमानाला इतर रंग देण्यापेक्षा पांढरा रंग देणे हे विमान कंपनी ला स्वस्त पडते. Airbus A320 सारख्या विमानाला एक कोट देण्यासाठी जवळपास 245 लिटर इतका रंग द्यावा लागतो.

६ पुन्हा विक्री चे मूल्य- काही विमान कंपन्या भाडेतत्वावर चालतात. जरी विमान विकत घेयचे म्हणले तरी त्या विमान बनविणाऱ्या कंपन्यांकडे ना जात अशी विमाने घेतात जी सध्या विक्री ला काढली आहेत आणि पांढऱ्या रंगामध्ये आधीच रंगवलेली आहेत जेणेकरून त्यांना फक्त त्यांच्या कंपनीच्या लोगो च्या customization ची किंमत मोजावी लागेल.

विमाना बद्दल रोमांचक माहिती

🔴जगातील सर्वात मोठे हवाई जहाज हे Airbus A 380 हे आहे. या जहाजाची सर्वोत्तम गती ही 1280 किलोमीटर प्रति तास इतकी आहे.

🔴1977 मध्ये विमानाची सर्वात मोठी दुर्घटना घडली होती ज्यामध्ये दोन विमाने एकमेकांना धडकली होती. यामध्ये पाचशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता ही विमान इंडस्ट्री मधील सर्वात मोठी दुर्घटना म्हणून ओळखली जाऊ लागली.

🔴विमानामध्ये दोन engine असतात परंतु विमान हवेत उडण्यासाठी एकच इंजिन पुरेसे असते दुसरे इंजिन हे आपात्कालीन परिस्थितीमध्ये वापरण्यासाठी त्याची व्यवस्था केलेली असते.

🔴आपत्कालीन परिस्थितीमध्ये जो प्राणवायू मास्क आपल्याला दिला जातो तो केवळ पंधरा मिनिटे आपल्याला प्राणवायू देऊ शकतो.

🔴जगातील सर्वात पहिली महिला विमान पायलेट ही भारतीय आहे. आणि तिचे नाव सरला ठकराल हे आहे.

🔴ब्लॅक बॉक्स हा विमानामध्ये असतो कारण विमानामध्ये घडणाऱ्या घटना त्यांचा डाटा आणि त्यांचे संभाषण हे या बॉक्समध्ये साठवून ठेवण्यात येते. जर दुर्घटना झाली तर ह्या ब्लॅक बॉक्स च्या मदतीने त्या दुर्घटनेचे कारण शोधण्यास मदत होते महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ब्लॅक बॉक्स चा रंग ब्लॅक नसून केशरी असतो आणि हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या मागील बाजूस बसवलेला असतो.

🔴प्रत्येक दिवशी दुनियामध्ये दोन लाख पेक्षा जास्त जहाज उडान भरतात.

🔴विमानामध्ये दोन पायलेट असतात दोन्ही पायलटला वेगवेगळे जेवण दिले जाते कारण एकाची तब्येत जरी ते जेवण खाऊन बिघडली तरी दुसरा व्यवस्थित रित्या विमानास कंट्रोल करू शकेल म्हणून असे केले जाते.

विमाना बद्दल पडणारे महत्वाचे प्रश्न

▶️विमानामध्ये केलेली टॉयलेट ही जमिनीवर पडते का? प्रश्नच वाचून हसू येते परंतु हा प्रश्न पडणे सहाजिकच आहे. हवाई जहाजामध्ये 750 लिटरचा टँक असतो ज्यामध्ये ही केलेली टॉयलेट जमा होत असते जेव्हा जहाज जमिनीवर लँड करते तेव्हा तो भरलेला टँक खाली केला जातो.

▶️विमानामध्ये मोबाईल फोन स्विच ऑफ किंवा एरोप्लेन मोडवर टाकण्यास का सांगितला जातो? कारण जहाज एअर ट्राफिक कंट्रोल द्वारा पाठवलेल्या सिग्नल वर काम करत असते व विमान आणि मोबाईल चे सिग्नल हे एअर ट्रॅफिक कंट्रोल कडून आलेला सिग्नल ब्रेक करू शकतात त्यामुळे जहाजाचे पायलेट आणि एअर ट्राफिक कंट्रोल यांमधील संपर्क हा मोडला जाऊ शकतो म्हणून विमानामध्ये फोन स्विच ऑफ किंवा एरोप्लेन मोडवर टाकण्यास सांगितला जातो.

▶️विजांचा विमानावर काही परिणाम होतो का? विमान म्हणलं की विजांचा सामना हा होतोच परंतु विमानाचे डिझाईन असे बनवलेले असते की विमानावर या पडलेल्या घातक अशा विजांचा काहीच परिणाम होत नाही.

▶️विमानामध्ये थरमोमीटर ( तापमापी) नेण्यास सक्त मनाई का आहे? विमान हे पूर्णतः अलुमीनीयम चे बनलेले असते आणि जेव्हा तापमापी मध्ये असणारा पारा हा ॲल्युमिनियम च्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो तेव्हा तो ॲल्युमिनियम ला नष्ट करतो म्हणून विमानामध्ये हे पारा म्हणजेच मरक्यूरी घेऊन जाऊ शकत नाही हाच मर्क्युरी थर्मामीटर मध्ये असतो म्हणून थर्मामीटर देखील आपण घेऊन जाऊ शकत नाही.

Read More
Categories