LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

IDFC आणि IDFC First Bank च्या विलनीकरणाला मंजुरी | गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?

Published By LifelineMarathi.com
On

IDFC आणि IDFC First Bank चे विलीनीकरण होणार. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलानी करणानंतर आणखीन एक मोठे विलीनीकरण होणार आहे. यावेळी आयडीएफसी फर्स्ट बँक चे आयडीएफसी लिमिटेड मध्ये विलीनीकरण होणार आहे.

IDFC फर्स्ट बँकेच्या संचालक मंडळाने सोमवारी IDFC लिमिटेडचे ​​स्वतःमध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता दिली. या बातमीनंतर आयडीएफसी फर्स्ट बँक आज घसरणीसह ट्रेड करत आहे. आज सकाळी बँकेचा शेअर तीन रुपयांच्या घसरणी सह 78.50 रुपयांवर ट्रेड करत आहे. या शेअर ने आज 77.05 रुपयांचा नीचांक तसेच 81.50 रुपयांचा उच्चांक बनवला आहे.

तर दुसरीकडे विलीनीकरणाच्या बातमीनंतर आयडीएफसी लिमिटेड चा शेअर तेजीत दिसत आहे. आज सकाळी आयडीएफसी लिमिटेड शेअर मध्ये सुमारे 2 रुपयांच्या वाढीसह शेअर 111.45 वर ट्रेड करत आहे. या शेअर चा आजचा नीचांक 107.80 रुपये आहे तसेच 115.70 रुपयांचा उच्चांक या शेअर ने बनवला आहे.

विलीनीकरणासाठी शेअर एक्सचेंज रेशोही निश्चित करण्यात आला आहे. IDFC लिमिटेडच्या शेअर होल्डर्स ना प्रत्येकी 100 शेअर्सवर बँकेमध्ये 155 शेअर्सचे वाटप केले जाईल. हे विलीनीकरण या वर्षाच्या शेवटपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

विलीनीकरणानंतर, IDFC फर्स्ट बँकेच्या शेअर्सचे मूल्य 4.9 टक्क्यांनी वाढले आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेने सोमवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितले की, आयडीएफसी एफएचसीएल, आयडीएफसी लिमिटेड आणि आयडीएफसी फर्स्ट बँक यांच्या कॉर्पोरेट संरचना सुलभ करण्याच्या उद्देशाने हे केले जात आहे.

यामुळे नियमांचे पालन करणेही सोपे होईल, असे बँकेचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीच्या विलीनीकरणानंतर भारतातील वित्तीय क्षेत्रातील हे दुसरे सर्वात मोठे विलीनीकरण आहे.

शेअर होल्डर्सवर काय परिणाम होईल?

सोमवारी, आयडीएफसी फर्स्ट बँकेचे शेअर्स NSE वर 2.90 टक्क्यांनी वाढून 81.70 रुपयांवर बंद झाले. त्याच वेळी, IDFC लिमिटेड 7 टक्क्यांच्या वाढीसह सुमारे 110 रुपयांवर बंद झाले. हे विलीनीकरण झाल्यास, IDFC लिमिटेडच्या गुंतवणूकदारांना अतिरिक्त शेअर्स मिळतील आणि IDFC फर्स्टच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे त्यांना मोठा नफा मिळेल.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.