LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

मागील वर्षी 5 वेळा तर 2023 मध्ये 2 वेळा डिव्हीडंट देणार हा शेअर | या दिवशी घेतला जाईल निर्णय

Published By LifelineMarathi.com
On

नमस्कार मित्रांनो आमच्या या नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तुमचे स्वागत आहे. आज या ब्लॉग पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला एका अशा स्टॉक बद्दल सांगणार आहोत ज्या स्टॉकने 2022 मध्ये पाच वेळा डिव्हीडंट देण्याची घोषणा केली होती, आणि आता यावर्षी दुसऱ्या वेळेस ही कंपनी गुंतवणूकदारांना डिव्हीडंट देणार आहे.

Balkrishna Industries:

आम्ही या पोस्टमध्ये बालकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनी बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. बालकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड (Balkrishna Inds.) ही ऑटो टायर आणि रबर उत्पादन क्षेत्रातील कंपनी आहे. या कंपनीच्या बोर्डाची बैठक 11 जुलैला आहे. या मीटिंगमध्ये गुंतवणूकदारांना डिव्हीडंट द्यायचा की नाही याचा निर्णय घेतला जाईल.

Balkrishna Industries कडून दिले गेलेले डिव्हीडंट:

2022 मध्ये या कंपनीने गुंतवणूकदारांना 5 वेळा डिव्हीडंट दिला होता, जो 21 फेब्रुवारी 2022 मध्ये 4 रुपये आणि 12 रुपये होता, जून मध्ये 4 रुपयांचा डिव्हीडंट, ऑगस्ट मध्ये 4 रुपयांचा डिव्हीडंट, नोव्हेंबर मध्ये 4 रुपयांचा डिव्हीडंट कंपनीकडून गुंतवणूकदारांना मिळाला होता. यासोबतच कंपनीने यावर्षीही फेब्रुवारी मध्ये 4 रुपयांचा डिव्हीडंट आधीच दिलेला आहे आणि आता जुलै महिन्यात देखील कंपनी डिव्हीडंट देण्याचा निर्णय जाहीर करणार आहे.

2008 पासून ही कंपनी गुंतवणूकदारांना सतत डिव्हीडंट देत आलेली आहे. आणि एका वर्षात 3 ते 4 वेळा डिव्हीडंट देत असते. बालकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड या शेअरची प्राईज 2362.20 रुपये आहे.

या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 5 वर्षात 96.57%, एका वर्षात 10.18%, 6 महिन्यांत 11.28% परतावा दिला आहे. 1 महिन्यात 3% पर्यंत रिटर्न्स या शेअरने गुंतवणूकदारांना दिले आहेत.

आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिमाहीत कंपनीचा नफा 378.8 करोड रुपयांवरून 259.9 करोड रुपयांवर घसरला. या कंपनीचा EBITDA रु. 643.3 कोटींवरून रु. 479.7 कोटींवर घसरला तर मार्जिन 27.1% वरून 20.7% पर्यंत घसरले आहे.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.