LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

Multibagger Stock: या कंपनीला मिळाली 385 करोड रुपयांची ऑर्डर, शेअर मध्ये तेजी

Published By LifelineMarathi.com
On

शेअर मार्केटने अनेक कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे, त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. असाच एक स्मॉल कॅप कंपनी शेअर, भारत अर्थ मूवर लिमिटेड आहे.

बुधवारी BEML या कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली तेजी पाहायला मिळाली. हा शेअर 35 रुपयांवरून 1608 रुपयांवर पोहोचला. गुंतवणूकदारांना भरघोस असा रिटर्न या शेअर मधून मिळाला आहे. कंपनीच्या शेअरमध्ये ही वाढ मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर पाहायला मिळाली.

भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) ने शेअर बाजाराला माहिती दिली आहे की, त्यांना भारत डायनामिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्याकडून हाई मोबिलिटी व्हीकल सप्लाई करण्यासाठी 385 करोड रुपयांचा करार मिळाला आहे. याआधी BEML कंपनीने संरक्षण मंत्रालयाकडून हाय मोबिलिटी व्हेईकलसाठी 423 करोड रुपयांचे कंत्राट मिळवले होते.

जानेवारी 1999 रोजी भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडचे ​​शेअर्स 24 च्या पातळीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून या कंपनीच्या गुंतवणूकदारांना सुमारे 6400 टक्के परतावा मिळाला आहे. 31 मार्च 2023 पर्यंत BEML Ltd ची एकूण ऑर्डर बुक 8570 करोड रुपये होती. जर आपण भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडचे वर्तमान ऑर्डर बुक पाहिले तर ते 9378 करोड रुपयांवर पोहोचले आहे.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या नफा-तोट्याला आम्ही जबाबदार नाही. त्यामुळे तुम्ही समजून घेऊन गुंतवणूक करा. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.