LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

तूर डाळीचे भाव आटोक्यात आणण्यासाठी सरकारची मोठी घोषणा, डाळींची विक्री होणार बफर स्टॉक मधून

Published By LifelineMarathi.com
On

अनेकदा तूर डाळीच्या किमतीत मोठी वाढ झालेली दिसून येते आणि त्याचाच परिणाम इतर इतर डाळींवरही पडतो. जरी भारत हा डाळीचा सर्वात मोठा उत्पादक देश असला तरी तूर डाळीचा अभाव जाणवत आहे. तो अभाव भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात तूर डाळ आयात करावी लागते.

तूर डाळीची भाव वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक पाऊल उचलण्यात उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार आता बफर स्टॉक मधून स्टॉकमधून तूर डाळ विकणार आहे. तुर आयात केलेला साठा भारतीय बाजारपेठेत येईपर्यंत ही विक्री केली जाईल.

तूर डाळ ही भारतातील सर्वाधिक पसंतीची डाळ आहे. अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत तूर डाळ ही पहिली पसंती आहे. या डाळीच्या किमतीत वाढ झाल्यामुळे केंद्र सरकारने तूर डाळ तसेच उडीद डाळ वर ऑक्टोबर पर्यंत स्टॉक लिमिट लावली आहे.

डाळींची उपलब्धता वाढवण्यासाठी पात्र मिलर्सना डाळ विकली जाईल. तूर डाळीची उपलब्धता वाढल्याने दरात घट होण्याची शक्यता आहे. सरकारच्या आदेशानुसार 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी तूर आणि उडीद डाळीसाठी साठा मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

होलसेल साठी स्टॉक लिमिट 200 टन तसेच रिटेल साठी 5 टन इतकी आहे. मोठ्या साखळी विक्रेत्यांसाठी होलसेल दुकानात प्रति 5 टन, आणि डेपोमध्ये 200 टन इतकी मर्यादा आहे. तसेच गिरणी मालकांसाठी शेवटच्या 3 महिन्यांचे उत्पादन किंवा वार्षिक स्थापित क्षमतेच्या 25%, यापैकी जे जास्त असेल. तसेच या संस्थांना विभागाच्या पोर्टलवर स्टॉकची स्थिती जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या नफा-तोट्याला आम्ही जबाबदार नाही. त्यामुळे तुम्ही समजून घेऊन गुंतवणूक करा. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.