LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

1 लाखाचे झाले 3 कोटी - पहा कोणता आहे तो टाटाचा शेअर

Published By LifelineMarathi.com
On

टाटा ग्रुपच्या टायटन कंपनीने आर्थिक वर्ष 2023 - 2024 मध्ये 25 आंतरराष्ट्रीय स्टोअर्स उघडण्याचे लक्ष ठेवले आहे. तसेच चालू आर्थिक वर्षात कंपनीने तनिष्क भूषण ब्रँड चे 18 नवीन आंतरराष्ट्रीय स्टोअर्स उघडण्याच्या तयारीत आहे.

सध्याच्या काळात तनिष्क ज्वेलरी ब्रांड ला अमेरिका मार्केटमध्ये खूप चांगली पसंती दिली जात आहे, आणि याची खूप मागणी देखील आहे. याचाच फायदा घेत कंपनी नवीन मार्केटमध्ये प्ले स्टोअर उभारत आहे. या कंपनीने आतापर्यंत 7आंतरराष्ट्रीय तनिष्क स्टोअर उघडले आहेत.

टायटनच्या शेअर मध्ये 1 लाखाचे झाले 3 कोटी:

टायटन कंपनीच्या शेअर बद्दल बोलायचे झाले तर या कंपनीचा शेअर 20 वर्षाच्या कालावधीमध्ये 3 रुपयांवरून सुमारे 3140 रुपयांपर्यंत वाढला आहे, तसेच सध्याच्या स्थितीत हा शेअर चांगल्या टार्गेटवर ट्रेड करत आहे. या शेअरने 104700 टक्क्यांहून अधिक परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे.

जर गुंतवणूकदारांनी 2005 मध्ये या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर सध्याच्या काळात त्या गुंतवणूकदारांना सुमारे 3 कोटी रुपये परतावा मिळाला असता. ही कंपनी शेअर मार्केटमध्ये 3144 रुपयांवर ट्रेड करत आहे.

मागील 5 वर्षात या शेअरने 274.87 पेक्षा जास्त परतावा दिला आहे तसेच 1 वर्षात 45% पेक्षा जास्त परतावा दिला आहे, तर सहा महिन्यात या शेअरने 28% रिटर्न्स गुंतवणूकदारांना दिले आहेत.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.