LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

टाटा ग्रुपच्या या कंपनीने डिविडेंड देण्याचे केले जाहीर | पहा रेकॉर्ड डेट

Published By LifelineMarathi.com
On

शेअर मार्केटमध्ये टाटा ग्रुपच्या अनेक कंपन्या लॉन्ग टर्म साठी गुंतवणूकदारांना भरघोस रिटर्न्स देण्यासाठी ओळखल्या जातात, वेळोवेळी टाटा ग्रुपच्या कंपन्याकडून गुंतवणूकदारांना डिव्हीडंट चे गिफ्ट दिले जाते. त्यापैकीच एक कंपनी म्हणजे Benares Hotels.

कंपनीकडून पोझिशनल गुंतवणूकदारांना प्रति शेयर 20 रुपये डिव्हीडंट देण्याचे जाहीर केले आहे. कंपनीने या डिव्हीडंट साठी रिकॉर्ड डेट ही जाहीर केली आहे. शुक्रवारी Benares Hotels, या कंपनीची बोर्ड मिटिंग झाली होती या मीटिंगमध्ये कंपनीने प्रत्येक शेअरवर 20 रुपये डिव्हीडंट देण्याचा निर्णय घेतला आहे, आणि त्यासाठी 17 ऑगस्ट 2023 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.

कंपनीच्या एजीएम कडून मंजुरी मिळाल्यानंतर 4 सप्टेंबर नंतर पात्र गुंतवणूकदारांना हा डिव्हीडंट मिळू शकतो. याआधी Benares Hotels या कंपनीने 10 रुपयांचा डिव्हीडंट आपल्या गुंतवणूकदारांना दिला होता. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. मार्केट बंद होताना टाटा ग्रुपच्या या कंपनीचे शेअर 10 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले.

गेल्या दोन वर्षात टाटा ग्रुपचा हा शेअर 1225 रुपयांवरून 5862.95 रुपयांवर पोहोचला आहे, म्हणजेच कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 375 टक्क्यांची वाढ झालेली आहे. तसेच यावर्षी कंपनीच्या शेअर्समध्ये 115 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.