LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

या IPO ने गुंतवणूकदारांना केले मालामाल, कंपनीचे मार्केट मध्ये जबरदस्त पदार्पण

Published By LifelineMarathi.com
On

1 शेअर वर गुंतवणूकदारांना मिळाला 114 रुपयांचा फायदा. Senco Gold IPO ने केला धमाका. शेअर मार्केटमध्ये सेन्को गोल्ड लिमिटेड ची एन्ट्री धमाकेदार झाली आहे. बीएससी मध्ये कंपनीची लिस्टिंग 35.96% प्रीमियम वर म्हणजेच 431 रुपयांवर झाली आहे.

ज्या गुंतवणूकदारांना कंपनीचे शेअर अलॉट झाले, त्यांना लिस्टिंग मध्ये 1 शेअरवर 114 रुपयांचा फायदा झाला आहे. तसेच यापूर्वी cyient आणि ideaforge या कंपनीच्या आयपीओने जबरदस्त लिस्टिंग द्वारे गुंतवणूकदारांना श्रीमंत केले होते.

Senco Gold IPO तपशील:

सेन्को गोल्ड लिमिटेड कंपनीचा आयपीओ 4 जुलै 2023 मध्ये ओपन झाला होता. गुंतवणूकदारांना 6 जुलै 2023 पर्यंत हा आयपीओ सबस्क्राईब करण्यासाठी ओपन होता. कंपनीने आयपीओ साठी 301 रुपये ते 317 रुपये प्रति शेअर हा प्राइस बैंड निश्चित केला होता.

Senco Gold IPO चा लॉट साइज 47 शेअर्सचा होता, त्यामुळे रिटेल गुंतवणूकदारांना किमान 14899 रुपयांची गुंतवणूक करावी लागली होती. सेन्को गोल्ड आयपीओ च्या ओपनिंग डे ला गुंतवणूकदारांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही, मात्र दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांनी खरेदीसाठी गर्दी केली.

आयपीओ च्या सुरुवातीच्या दोन दिवशी अनुक्रमे 0.75 पट आणि 2.85 पट हा आयपीओ सबस्क्राईब झाला तर Senco Gold आयपीओच्या शेवटच्या दिवशी 77.25 पट हा आयपीओ सबस्क्राईब झाला.

Senco Gold Ltd चांदी, प्लॅटिनम, मौल्यवान आणि अर्ध-मौल्यवान दगड आणि इतर विविध धातूंनी बनवलेल्या दागिन्यांची व्हरायटी देतात. या सर्व उत्पादनांची विक्री Senco Gold & Diamonds व्यापार या नावाने केली जाते.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युचुअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.