LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

या कंपनीमध्ये फक्त अडीच वर्षात झाले एक लाखचे दहा लाख रुपये - बदलले गुंतवणूकदारांचे नशीब

Published By LifelineMarathi.com
On

या आर्टिकल मध्ये आम्ही एका अशा स्टॉक बद्दल माहिती सांगितली आहे ज्याने आपल्या गुंतवणूकदारांचे नशीब काही वेळातच बदलले आहे. या शेअरचा IPO 145 रुपयांवर इशू झाला होता आणि आज या शेअरची किंमत 1324 रुपयांवर पोहोचली आहे.

जहाज बनवणारी कंपनी Mazagon Dock Shipbuilders या स्टॉकच्या गुंतवणूकदारांना फार कमी कालावधीमध्ये खूप चांगला नफा मिळाला आहे. बुधवारी कंपनीचा शेअर 2 टक्क्यांनी वाढून 1324 रुपयांवर पोहोचला.

या स्टॉक ची लिस्टिंग 2020 मध्ये झाली होती. त्यावेळी त्याची इश्यू किंमत 145 रुपये होती, आणि आता या शेअरची किंमत 1324.15 रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे या शेअरच्या गुंतवणूकदारांना खूप चांगले रिटर्न्स मिळाले आहेत. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 32.48% ची वाढ झाली आहे.

Mazagon Dock च्या ग्राहकांमध्ये अनेक देशी आणि विदेशी कंपन्यांचा समावेश आहे. 1934 साली खाजगी कंपनी म्हणून स्थापन झालेली Mazagon डॉक सरकारने 1960 साली विकत घेतली. मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या मझगांव डॉकच्या शेअर्समध्ये जबरदस्त वॉल्यूम पहायला मिळत आहे.

कंपनी भारतातील तसेच विविध देशांतील ग्राहकांना मालवाहू जहाजे, प्रवासी जहाजे, सप्लाई जहाज, पाण्याचे टँकर, टग, ड्रेजर, मासे पकडणारे ट्रॉलर इत्यादींचा सप्लाय करते.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.