LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

आजचा सोन्याचा भाव (24 व 22 कॅरेट ) - gold rate today । सोन्याचा आजचा भाव महाराष्ट्र

Published By LifelineMarathi.com
On

अनेक गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करतात तसेच सोन्याचे दागिनेही खरेदी करण्याचा विचार करत असतात. सोन्याच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे, त्यामुळे अनेकजण सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. यामध्ये आम्ही देशातील aajcha sonyacha bhav लेटेस्ट 22 कॅरट आणि 24 कॅरट सोन्याचा आजचा भाव देण्याचा प्रयत्न करत आहोत.

तुम्हालाही सोनं खरेदी करायचे असेल किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी आवश्यक असलेली सर्व महत्त्वाची माहिती तसेच आजचा सोन्याचा भाव आम्ही येथे देण्याचा प्रयत्न करत आहोत. 22 Carat आणि 24 Carat sonyacha bhav लेटेस्ट बाबत तुम्हाला अपडेट करणे हा आमचा उद्देश आहे.

या पोस्ट मध्ये आम्ही सोन्याचा भाव तसेच gold rate today pune याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. aajcha sonyacha bhav या पोस्ट मध्ये दररोज gold rate today in marathi अपडेट केले जातात.

सोन्याचा आजचा भाव (1gm) 7/7/23 ₹5,932 ₹5,440
(India) Date 24 कॅरट 22 कॅरट

या पोस्टमध्ये आम्ही सोन्याचा आजचा दर दिलेला आहे. आज दिनांक 7 जुलै 2023 रोजी 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्राम चा दर 59,220 रुपये आहे, तर काल दिनांक 06 जुलै 2023 रोजी 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्राम चा दर 59,320 रुपये होता. 22 कॅरेट सोन्याचा दहा ग्राम चा दर आज दिनांक 07 जुलै 2023 रोजी 54,300 रुपये आहे, तर काल दिनांक 06 जुलै 2023 रोजी 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्राम चा दर 54,400 रुपये होता.

सोन्याचा आजचा भाव 24 कॅरट आणि 22 कॅरट

ग्राम 24 कॅरट सोन्याचा आजचा भाव 22 कॅरट सोन्याचा आजचा भाव
1 ग्राम 5,922 5,430
8 ग्राम 47,376 43,440
10 ग्राम 59,220 54,300
100 ग्राम 5,92,200 5,43,000

भारतातील इतर शहरातील सोन्याचा आजचा भाव

शहर  

24 कॅरट सोन्याचा भाव 22 कॅरट सोन्याचा भाव
मुंबई 59,070 54,150
नवी मुंबई 59,220 54,300
पुणे 59,070 54,150
नागपूर 59,070 54,150
नाशिक 59,100 54,180
कोल्हापूर 59,070 54,150
अमरावती 59,070 54,150
औरंगाबाद 59,070 54,150
ठाणे 59,070 54,150
वसई- विरार 59,100 54,180
सोलापूर 59,070 54,150
भिवंडी 59,100 54,180
लातूर 59,100 54,180
अमरावती 59,070 54,150
विशाखापट्टणम 59,070 54,150
आग्रा 59,220 54,300
कोलकत्ता 59,070 54,150
उटी 59,560 54,570
भोपाळ 59,120 54,200
लखनऊ 59,220 54,300
चंदिगढ 59,220 54,300
मोहाली 59,220 54,300
बडोदा 59,120 54,200
इंदौर 59,120 54,200
वाराणसी 59,220 54,300
नोएडा 59,220 54,300
गोवा 59,070 54,150
मैसूर 59,070 54,150
चेन्नई 59,560 54,570
राजकोट 59,120 54,200
पटना 59,120 54,200
सुरत 59,120 54,200
केरळ 59,070 54,150
बंगलौर 59,070 54,150
शिवगंगा 59,560 54,570
लुधियाना 59,220 54,300
रामेश्वरम 59,560 54,570
हैदराबाद 59,070 54,150
गुंटूर 59,070 54,150
जयपूर 59,220 54,300

मागील 10 दिवसांचा सोन्याचा भाव (10 ग्राम)

दिनांक  24 कॅरट सोन्याचा भाव 22 कॅरट सोन्याचा भाव 
7 जुलै 2023 59,220 54,300
6 जुलै 2023 59,320 54,400
5 जुलै 2023 59,220  54,300
4 जुलै 2023 59,220 54,300
3 जुलै 2023 59,120  54,200
2 जुलै 2023 59,220  54,300
1 जुलै 2023 59,220 54,300 
30 जून 2023 59,000  54,100
29 जून 2023 58,900 54,000
28 जून 2023 59,110 54,200

सोन हा एक मौल्यवान धातू आहे जो प्रत्येक स्त्रीची विशेष आवड आहे. वाढत्या महागाई मुळे गुंतवणूक म्हणून सोने हे गुंतवणूकदारांसाठी प्रथम प्राधान्य आहे. दागिन्यां व्यतिरिक्त, सोन्याचे अनेक औद्योगिक उपयोग आहेत.

सोन हे अत्यंत प्रवाहकीय आणि गंज प्रतिरोधक आहे, त्यामुळे ते इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये इलेक्ट्रिकल कनेक्टर, स्विच आणि वायरिंगसाठी वापरले जाते. सोन्याचा वापर वैद्यकीय उपकरणे, दंतचिकित्सा आणि काही उच्च दर्जाच्या काचेच्या उत्पादनात देखील केला जातो.

वाढत्या महागाई मुळे गुंतवणूक म्हणून सोने हे गुंतवणूकदारांसाठी विशेष आकर्षण आहे. कमोडिटी एक्स्चेंजवर जागतिक स्तरावर याची खरेदी केली जाते, आणि त्याची किंमत, पुरवठा आणि मागणीची गतिशीलता, जागतिक आर्थिक परिस्थिती आणि व्याजदर यासारख्या घटकांवर अवलंबून असते. अनेक गुंतवणूकदार बार, नाणी किंवा एक्स्चेंज-ट्रेडेड फंड च्या स्वरूपात सोन्याची गुंतवणूक करतात.

सोन्याची शुद्धता कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. शुद्ध सोने हे 24 कॅरेट मानले जाते, परंतु ते खूप मऊ आहे त्यामुळे सोन्याची ताकद वाढवण्यासाठी तांबे किंवा झिंक सारखे इतर धातू सोन्यामध्ये मिश्रित केले जातात.

सामान्यतः वापरल्या जाणार्‍या सोन्याच्या मिश्र धातुंमध्ये 18K (75% सोने), 14K (58.3% सोने) आणि 12K (50% सोने) यांचा उपयोग केला जातो. सोने उत्पादक देशांमध्ये चीन, रशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश होतो.

22 कॅरेट सोने

22 कॅरेट सोन्यामध्ये 22 भाग शुद्ध सोने आणि 2 भाग इतर धातू, ज्यामध्ये सामान्यतः तांबे किंवा झिंक चा समावेश केला जातो, त्यामुळे सोन्याचा टिकाऊपणा आणि ताकद वाढते. शुद्ध सोने 24K आहे म्हणजेच त्यात त्यात 99.9% सोने आहे, तर 22 carat सोन्यात 91.67% सोने आणि 8.33% इतर धातूंचा समावेश केला गेला आहे.

हे धातू सोन्यामध्ये मिश्रित केल्यामुळे सोन्याचा कडकपणा आणि टिकाऊपणा वाढतो, 22 k सोन्याचा वापर सामान्यतः दागिने बनवण्यासाठी केला जातो. 22 कॅरेट सोन्यापासून बनवलेल्या दागिन्यांवर सहसा ‘22K’ किंवा ‘916’ असे हॉलमार्क केले जाते, जे त्याची शुद्धता दर्शवते. हे ग्राहकांना तसेच ज्वेलर्सना सोन्याची गुणवत्ता आणि शुद्धता ओळखण्यास मदत करते.

22 कॅरेट सोने देखील गुंतवणूकीमध्ये वापरले जाते. गुंतवणुकीच्या उद्देशाने 22 कॅरेट सोन्याची नाणी किंवा बारच्या स्वरूपात खरेदी केली जाते. 22K सोने हे 24K सोन्यापेक्षा कमी शुद्ध असले तरी दागिन्यांच्या टिकाऊपणासाठी त्यामध्ये तांबे किंवा झिंक सारखे मिश्र धातु जोडल्याने त्याची ताकद आणि टिकाऊपणा वाढतो.

22 कॅरेट सोने कठिण असते आणि ते सहजपणे मोल्ड करता येत नाही. 22 कॅरेट सोन्याची किंमत ही जागतिक मागणी, सोन्याचा पुरवठा, बाजारातील परिस्थिती आणि चलनातील चढउतार यांसारख्या घटकांवर अवलंबून असते. 22K सोन्यामध्ये इतर धातूंच्या वापरामुळे, 22K सोन्याची किंमत साधारणपणे 24K सोन्यापेक्षा कमी असेल.

24 कॅरेट सोने

24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध स्वरूपाचे सोने मानले जाते, ज्यामध्ये सोन्याचे प्रमाण 99.9% आहे. 24 carat सोने हे शुद्ध सोने मानले जाते, याचा अर्थ ते इतर कोणत्याही धातूमध्ये मिसळलेले नाही. हयामध्ये 24 पैकी 24 भाग सोने आहे, किंवा व्हॉल्यूमनुसार 99.9% सोने आहे.

सोन्याच्या शुद्धतेची ही सर्वोच्च पातळी आहे. शुद्ध सोन्याच्या दागिन्यांवर सामान्यत: त्याची शुद्धता दर्शविण्यासाठी ‘24K’ किंवा ‘999’ असे हॉलमार्क केले जातात. या खुणा दर्शवतात की हे सोने 99.9% प्युअर सोने आहे.

अनेक मंदिरांमध्ये आणि काही ठिकाणी सोन्याचा वापर सजावट म्हणून देखील केला जातो, तर 24 कॅरेट सोने इतके मऊ आहे की त्यापासून दागिने बनवणे अवघड आहे. शुद्ध सोन्यांमध्ये लवचिकता असल्यामुळे त्यापासून बनवलेले दागिने वाकतात आणि त्यामुळे दागिन्यांचा आकार बिघडतो आणि ते दागिने पुन्हा घालण्या योग्य राहत नाहीत.

24 कॅरेट सोन्याचा वापर कंप्युटर, मोबाईल फोनसह वैद्यकीय आणि इलेक्ट्रिकल उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. 24 कॅरेट सोने हे सर्वात महाग सोने आहे.

भारतात सोन्याची किंमत कशी ठरवली जाते?

भारत देशातसोन्याचे दर आंतरराष्ट्रीय दरांवर अवलंबून असतात, त्यामुळे जेव्हा सोन्याची आंतरराष्ट्रीय किंमत वाढते तेव्हा भारतातील अनेक शहरांमध्ये सोने महाग होते. भारतातील सोन्याचे दर बघितले तर तुम्हाला असे लक्षात येईल की, देशातील प्रत्येक शहरात सोन्याचे दर वेगवेगळे आहेत. काही शहरांमध्ये सोने महाग आहे आणि तर काही शहरांमध्ये स्वस्त आहे.

आपल्याकडे सोन्याच्या खाणी नाहीत त्यामुळेआवश्यक असलेले सोने दुसऱ्या देशांकडूनआयात करावे लागते. भारतातील सरकारी आणि खाजगी बँका सोने आयात करतात, तसेच काही एजन्सी ही आहेत ज्या परदेशातून सोने खरेदी करतात आणि डीलर्सना पाठवतात.

सोन्याचे दर लंडन बुलियन असोसिएशन च्या द्वारे ठरवले जातात तसेच सोन्याची किंमत अमेरिकन डॉलर मध्ये पब्लिश केली जाते. सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किमतींना भारतात इंडियन बुलियन एंड ज्वैलर्स एसोसिएशन मान्यता देते.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.