Jul 17, 2023

पावसाळ्यात भेट द्यावी अशी लोणावळ्यातील खास पर्यटन स्थळे

Tiger's Leap (टायगर्स लीप )

येथील दरी आणि आजूबाजूचे चित्त थरारक डोंगराचे दृश्य एखाद्या उडी मारणाऱ्या वाघासारखे दिसते.

Bhushi Dam (भुशी डॅम )

भुशी डॅम हा शांत जलाशय आणि कोसळणारा धबधबा यांसाठी लोकप्रिय आहे त्यामुळे हा पॉईंट पिकनिक साठी आणि निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी अगदी योग्य ठिकाण आहे.

Rajmachi Fort (राजमाची फोर्ट)

सह्याद्रीच्या पर्वतरांगा तसेच हिरवाईने नटलेला डोंगर, हे ट्रेकिंग प्रेमींसाठी विशेष आकर्षण आहे.

Duke's Nose (ड्युक्स नोज)

नाकाच्या आकारासारखा दिसणारा उंच कडा त्यासोबतच दऱ्यांचे नयनरम्य दृश्य नेहमीच पर्यटकांना आकर्षित करते.

Kune Waterfalls (कुणे धबधबा)

महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक, तसेच हिरवाईने नटलेला परिसर निसर्गप्रेमींना भाराऊन टाकतो.

Lonavala Lake (लोणावळा तलाव)

डोंगराने वेढलेला एक शांत तलाव हिरवीगार जमीन आणि निसर्गाच्या सौंदर्याने परिपूर्ण अशी एक शांत आनंद देणारी जागा.

Lohagad Fort (लोहगड किल्ला)

लोणावळ्यापासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर असलेला लोहगड किल्ला महाराष्ट्र राज्यातील लोणावळा प्रदेशातील सह्याद्रीच्या पर्वतांवर वसलेला ऐतिहासिक किल्ला आहे. लोहगड किल्ला हा पुणे आणि मुंबई जवळील ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाणांपैकी एक आहे.

Pawna Lake (पावना तलाव)

लोणावळ्यातील प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांपैकी पावना तलाव पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. लोणावळा आणि लोहगड किल्ल्यापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे.

Read More