Jul 2, 2023

शेअर मार्केट उघडण्यापूर्वी आता SGX Nifty नाही तर GIFT Nifty पहा

उद्यापासून म्हणजेच 3 जुलैपासून भारतात जागतिक व्यापारात मोठा बदल होणार आहे. शेअर बाजारात लोकप्रिय असलेल्या SGX निफ्टीचे नाव बदलून GIFT निफ्टी असे करण्यात येणार आहे.

GIFT निफ्टी ची लिस्टिंग गुजरात मधील गांधीनगर जवळील गिफ्ट सिटी येथे होईल. याला एनएसई इंटरनेशनल एक्सचेंज (NSE IX) म्हणून ओळखले जाईल.

वेळ: SGX निफ्टी मधे सकाळी 06:30 पासून ते रात्री 10:30 पर्यंत म्हणजे 16 तासांचे ट्रेडिंग होत होते. परंतु GIFT Nifty मध्ये आता सकाळी 4 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी 2 वाजेपर्यंत म्हणजे 21 तासांचे ट्रेडिंग होईल.

टाईम झोन: हे ट्रेडिंग 21 तासांचे असेल, जे आशिया, युरोप, यूएसच्या ट्रेडिंग तासांशी ओव्हरलॅप होतील. 7.5 अरब डॉलर किमतीचे डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट सिंगापूरहून भारतात स्थलांतरित होईल.

गिफ्ट निफ्टी मध्ये गिफ्ट निफ्टी 50, गिफ्ट निफ्टी बँक, गिफ्ट निफ्टी फाइनेंशियल सर्विसेस आणि गिफ्ट निफ्टी आईटी डेरिवेटिव चा समावेश असेल.

Read More