Jul 19, 2023

या IPO ने गुंतवणूकदारांना केले मालामाल, पहिल्याच दिवशी 100 % नफा

काका इंडस्ट्रीज लिमिटेड शेअरची मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री झाली आहे. कंपनीचे शेअर बीएससी वर 100% प्रीमियम सह 115.71 रुपयांवर लिस्ट झाले आहेत.

IPO प्राईस पेक्षा काका इंडस्ट्रीज लिमिटेड चे शेअर 57.71 रुपये जास्त आहे. या शेअरची IPO प्राईस 55 रुपये ते 58 रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित करण्यात आली होती, तसेच हा एक एसएमई IPO आहे.

काका इंडस्ट्रीजचा IPO 7 जुलै रोजी सबस्क्रिप्शनसाठी ओपन झाला होता तसेच 11 जुलै रोजी बंद झाला.

काका इंडस्ट्रीज प्रामुख्याने पॉलिमर बेस्ड प्रोफाइल निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करते ज्याचा उपयोग दरवाजे, खिडक्या, विभाजन, सिलिंग, वॉल पॅनेलिंग, किचन आणि इतर अंतर्गत कामांमध्ये वापरले जाते.

Disclaimer

आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Read More