Jul 9, 2023

Upcoming IPO: पुढील आठवड्यात येत आहे या 4 कंपन्यांचे IPO

मागील काही दिवसांमध्ये अनेक कंपन्यांचे IPO आले होते आणि त्यातून गुंतवणूकदारांना भरघोस परतावा ही मिळाला, पुढील आठवड्यात 4 कंपन्या त्यांचे IPO मार्केटमध्ये घेऊन येत आहेत.

Bizotic Commercial

अर्बन युनायटेड या नावाने बिजोटिक कमर्शिअल कंपनी ही रेडिमेड कपड्यांचे उत्पादन आणि त्यांच्या विक्रीचा व्यवसाय करते. कंपनीचा इश्यू 12 जून रोजी सबस्क्रिप्शनसाठी ओपन होईल आणि 15 जून रोजी बंद होईल. यासाठी कंपनीने शेअरची किंमत 175 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. कंपनी IPO मधून 42.21 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे.

Urban Enviro Waste Management Ltd

अर्बन एनवायरो वेस्ट मैनेजमेंट लिमिटेड, वेस्ट मैनेजमेंट सॉल्यूशंस प्रदान करते. कंपनीचा इश्यू सोमवार, 12 जून रोजी ओपन होईल. कंपनीने IPO साठी शेअर्सची किंमत 100 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. IPO च्या माध्यमातून 11.42 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे.

Cell Point Ltd

Cell Point हा मल्टीब्रँड रिटेल सेलिंग पॉइंट आहे, जो विविध कंपन्यांचे स्मार्टफोन आणि त्यांचे ॲक्सेसरीज विकतात. कंपनीचा इश्यू 15 जूनला उघडेल आणि 20 जूनला बंद होईल. IPO साठी, कंपनीने शेअरची किंमत 100 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे.

Cosmic CRF Ltd

Cosmic CRF Ltd विविध मैन्युफैक्चरिंग कंपन्यांना कोल्ड रोल्ड स्टेनलेस सेक्शन पुरवण्याच्या व्यवसाय करते. कंपनीचा IPO 14 जूनला ओपन होईल 16 जूनला बंद होईल. कंपनीने या इश्यूसाठी 314 ते 330 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे.

Disclaimer

आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Read More