LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

JioBook laptop: 31 जुलैला लाँच होणार Jio चा स्वस्त लॅपटॉप?

Published By LifelineMarathi.com
On

Reliance Jio भारतात नवीन JioBook लॅपटॉप लॉन्च करणार आहे. ॲमेझॉन वेबसाइटवर एक टीझर प्रदर्शित झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा लॅपटॉप 31 जुलै रोजी लॉन्च केला जाऊ शकतो. यासोबतच यात अनेक चांगले फीचर्स आणि कॉम्पॅक्ट डिझाईन पाहायला मिळत आहेत. यामध्ये 2MP चा कॅमेरा मिळू शकतो. चला जाणून घेऊया या लॅपटॉपबद्दल.

Reliance Jio भारतात नवीन JioBook लॅपटॉप लॉन्च करणार आहे. Amazon वेबसाइटवर एक टीझर आला आहे, ज्यामध्ये कंपनी लवकरच लॅपटॉप लॉन्च करणार असल्याचे समोर आले आहे. Amazon ने आपल्या टीझरमध्ये सांगितले आहे की ऑल न्यू JioBook या महिन्याच्या अखेरीस येईल. यासोबतच काही स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत हा लॅपटॉप 31 जुलै रोजी लॉन्च होऊ शकतो.

Amazon टीझरमध्ये JioBook लॅपटॉपची डिझाईन देखील दाखवण्यात आली आहे, जी मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च केलेल्या लॅपटॉपसारखीच आहे. कॉम्पॅक्ट आकारात येत असलेला हा लॅपटॉप निळ्या रंगाचा आहे. टीझरनुसार, हा लॅपटॉप प्रोडक्टीव्हीटी मनोरंजन आणि गेमिंगसाठी तयार करण्यात आला आहे.

लॅपटॉप मध्ये मिळेल 4G कनेक्टिव्हिटी

वापरकर्त्यांना जिओच्या आगामी लॅपटॉपमध्ये 4G कनेक्टिव्हिटी पाहायला मिळेल. यासोबतच ऑक्टाकोर प्रोसेसरही वापरण्यात येणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, आगामी लॅपटॉपमध्ये एचडी व्हिडिओ वापरता येणार आहे. यामध्ये तुम्ही वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरू शकता.

जिओ लॅपटॉपमध्ये लाइटवेट डिझाइन उपलब्ध असेल, ज्याचे वजन 990 ग्रॅम असू शकते. हा लॅपटॉप पूर्ण दिवस बॅटरी बॅकअप देऊ शकतो. हे तपशील Amazon वरून मिळाले आहेत.

लॅपटॉप ऑक्टोबर 2022 मध्ये झाला होता लॉन्च

रिलायन्स जिओने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये JioBook लाँच केला होता. हा एक बजेट मध्ये बसणारा लॅपटॉप आहे, जो ब्राउझिंग आणि ऑनलाइन क्लासेस इत्यादीसाठी वापरला जाऊ शकतो. ऑक्टोबरमध्ये लॉन्च झालेल्या लॅपटॉपमध्ये 11.6-इंचाचा HD डिस्प्ले आहे. यात फ्रंटला 2 MP कॅमेरा आहे.

JioBook लॅपटॉप ची वैशिष्ट्ये

ऑक्टोबरमध्ये लॉन्च झालेल्या लॅपटॉपमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर, ॲड्रेनो 610 GPU आहे. यात 2GB रॅम आणि 32GB eMMC स्टोरेज आहे. यामध्ये तुम्ही 128GB पर्यंत SD कार्ड टाकू शकता. हा लॅपटॉप JioOS वर काम करतो.