LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये या दिवशी होणार बँक खात्यात जमा

Published By LifelineMarathi.com
On

शेती हा आपल्या देशाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान तसेच त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार अनेक योजना राबवीत आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे केंद्र सरकारची पीएम किसान योजना. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये पाठविले जातात, परंतु आता काही शेतकऱ्यांना 12000 रुपये या योजनेअंतर्गत मिळू शकतात.

महाराष्ट्र सरकारने नमो किसान महासन्मान निधी ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये अतिरिक्त देण्यात येणार आहे. हे रुपये प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये प्रमाणे दिले जातील, म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजना मधून 6000 रुपये तसेच महाराष्ट्र सरकारकडून 6000 रुपये मिळतील, म्हणजेच एकूण 12000 रुपये वार्षिक शेतकऱ्यांना मिळणार आहेत. तसेच इतर राज्यातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

अर्थसंकल्पादरम्यान महाराष्ट्र सरकारने याची घोषणा केली होती. आता त्याला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या योजनेचा फायदा दीड कोटी शेतकऱ्यांना मिळणार असून महाराष्ट्र सरकारने त्यासाठी 6900 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने कृषी विभागात नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच या योजनेसाठी शेतकऱ्यांकडे शेतजमीन तसेच आवश्यक ती कागदपत्रे जसे, बँका खात्याला आधार कार्ड लिंक असणे, बँक खात्याचा तपशील आणि आधार कार्ड अशी कागदपत्रे आवश्यक आहेत.

यासाठी एक नवीन शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार पुढील दिलेल्या तारखेच्या दरम्यान पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात नमो शेतकरी महासन्माननिधीचा हप्ता तीन हप्त्यांमध्ये मिळणार आहे पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर तर तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च यादरम्यान मिळू शकतो.