उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेची झाली धमाकेदार लिस्टिंग, गुंतवणूकदार झाले मालामाल
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेची शुक्रवारी शेअर मार्केटमध्ये जोरदार लिस्टिंग झाली. या स्मॉल फायनान्स बँकेचा शेअर, इशू प्राईज च्या 60 टक्के प्रीमियम वर लिस्ट झाला आहे. हा शेअर 40 रुपये तर बीएससी वर उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा शेअर ची लिस्टिंग 39.95 रुपयांवर झाली आहे, तर या IPO ची इश्यू प्राइस 25 रुपये होती. लिस्टिंगच्या आधी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा शेअर अनलिस्टेड मार्केटमध्ये 15 रुपयांच्या प्रीमियम सह उपलब्ध होता.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक IPO ला मिळाला चांगला प्रतिसाद:
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या 500 कोटी रुपयांच्या IPO ला चांगला प्रतिसाद मिळाला. या इशूला 102 पट सबस्क्राईब केले गेले. क्वालिफाइड इंस्टीच्युशन बायर्स च्या रिजर्व कॅटेगरी मध्ये 124.8 पट सबस्क्राईब झाला त्याचबरोबर नॉन-इंस्टीच्युशनल इन्वेस्टरर्स च्या कॅटेगिरी मध्ये 81.6 पट हा आयपीओ सबस्क्राईब केला गेला. आईसीआईसीआई सिक्योरिटीज आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनीने इश्यूसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून काम केले.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक 2016 मध्ये सुरू झाली. या बँकेने 2017 मध्ये त्यांचे कामकाज सुरू केले. बँक सेविंग अकाउंट, सॅलरी अकाउंट, करंट अकाउंट, रेकरींग आणि फिक्स डिपॉझिट तसेच लॉकर सुविधा यांसारख्या अनेक सेवा ही बँक देते.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक IPO बद्दल
ज्या दिवशी शेअर मार्केटच्या सुरुवातीच्या सेशनमध्ये घसरण पाहायला मिळाली त्याच दिवशी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या आयपीओ ची लिस्ट धमाकेदार झाली. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने या IPO साठी प्रति शेअर 23-25 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला होता. हा IPO 12-14 जुलै दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी ओपन झाला होता. या IPO साठी कंपनीने 600 शेअर्सची लॉट साइज निश्चित केली होती.
Disclaimer: आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.