या मल्टीबॅगर स्टॉक मध्ये 14 वर्षात, 1 लाखाचे झाले 2.5 कोटी
मल्टीबॅगर स्टॉक: शेअर मार्केटमध्ये तेजी असताना दिग्गज एनबीएफसी चोलमंडलम इनवेस्टमेंट एंड फाइनेंस कंपनी (Cholamandalam Investment and Finance Company) चे शेअर्स घसरणीसह बंद झाले. तसेच हा शेअर त्याच्या विक्रम उच्चांकावरून 6 टक्क्यांनी घसरला आहे. परंतु लॉन्ग टर्म मध्ये या शेअरने एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीत 14 वर्षात गुंतवणूकदारांना 2.5 कोटीचा परतावा दिला आहे. बीएससी मध्ये (Cholamandalam Share Price) कंपनीचे शेअर 1.56 टक्क्यांच्या घसरणीसह 1146.30 रुपयांवर बंद झाले.
चोलमंडलम इनवेस्टमेंट एंड फाइनेंस कंपनीचे शेअर्स 27 फेब्रुवारी 2009 रोजी फक्त 4.56 रुपयांवर होते, परंतु आता हा शेअर 1146.30 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच 14 वर्षांपूर्वीची एक लाख रुपयांची गुंतवणुक 2.5 कोटी झाली.
या कंपनीच्या शेअर्सने शॉर्टटर्म मध्ये देखील चांगला परतावा दिला आहे. मागील वर्षी 2022 मध्ये हा शेअर 635 रुपयांच्या नीचांकी पातळीवर होता, त्यानंतर एका वर्षातच हा स्टॉक 91% च्या वाढीसह 1214.60 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला.
मुरुगप्पा ग्रुपने 1978 मध्ये चोलमंडलम इनवेस्टमेंट एंड फाइनेंस कंपनीची स्थापना केली. यांचा व्यवसाय इक्विपमेंट फाइनेंसिंग कंपनी म्हणून सुरू झाला होता. कंपनीच्या देशभरात 1191 शाखा आहेत आणि 112,782 कोटी रुपयांची असेट मॅनेज करते, असे कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून समजते.
Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युचुअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.