तीन वर्षात 600 टक्के रिटर्न्स, कंपनी देत आहे बोनस आणि डिव्हीडंट
जीएनए एक्सेल्स (GNA Axles) कंपनी गाड्यांमधील ट्रान्समिशन कंम्पोनंट बनवणारी जगातील आघाडीच्या कंपन्यांमधील एक आहे. या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.
GNA Axles कंपनी शेअर धारकांना बोनस शेअरचे चे वाटप करणार आहे. त्याबरोबरच कंपनी देणार आहे बोनस शेअर्स आणि डिव्हिडंट, यासाठी रेकॉर्ड डेट ही निश्चित करण्यात आली आहे. कंपनीच्या शेअर्स बद्दल बोलायचे झाले तर या कंपनीच्या शेअर्सने मागील तीन वर्षात गुंतवणूकदारांचा पैसा 7 पटीने वाढवला आहे.
शुक्रवार 21 जुलै रोजी बीएससी वर GNA Axles शेअरच्या किंमतीत 2.19 टक्क्यांच्या वाढीसह 939.65 रुपयांवर वर बंद झाला.
जीएनए एक्सेल्स ने शुक्रवारी डिव्हिडंट आणि बोनस साठी रिकॉर्ड डेट निश्चित केली. प्री बोनस कॅपिटलवर कंपनी प्रति शेअर 6 रुपये डिव्हीडंट देणार आहे. यासाठी 11 ऑगस्ट ही रिकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. त्याच वेळी, कंपनी 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स चे वाटप करणार आहे, म्हणजेच शेअरहोल्डर्स ना एका शेअरच्या बदल्यात एक शेअर मिळणार आहे, त्यासाठी 11 ऑगस्ट 2023 ही रिकॉर्ड डेट कंपनीकडून निश्चित करण्यात आली आहे.
जीएनए एक्सेल्स च्या शेअर्सने गुंतवणूकदारांना चांगलाच परतावा दिला आहे. 3 एप्रिल 2022 रोजी हा शेअर 130 रुपयांवर होता तर आज 935.65 रुपयांवर म्हणजेच तीन वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 600 टक्के परतावा दिला आहे. तसेच एका वर्षापूर्वी 4 ऑगस्ट 2022 मध्ये या शेअरची किंमत 554.75 रुपयांच्या नीचांकी पातळीवर होती, तसेच सहा महिन्यात या शेअरने 76 टक्क्यांहून अधिक परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे.
Disclaimer: आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.