कोरोना वायरस झालेल्या रुग्णांना अहोरात्र प्रयत्न करून वाचवणाऱ्या डॉक्टरांना आपला सलामच आहे. परंतु कोरूना वायरस झालेल्या रुग्णांवर उपचार करताना इरानियन डॉक्टर शिरिन रुहानी यांनी आपले प्राण गमावले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत रुग्णांच्या सेवेत व्यस्त होत.
 इतक्या मोठ्या संख्येने रुग्णांची मदत करण्यासाठी इराणमध्ये डॉक्टरांची आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे त्यांनी त्यांची जबाबदारी ओळखून शेवटपर्यंत रुग्णांवर उपचार करण्याचे ठरविले. याच काळात त्यांना कोरणा व्हायरसची लागन देखील झाली. 

परंतु डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे त्या त्यांची जबाबदारी पार पाडत राहिल्या. 

तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता की त्या स्वतः सलाईन लावून काम करीत आहेत.

डॉक्टर शिरीन रूहानी या इराणच्या शोहादा हॉस्पिटलमध्ये फिजीशियन आणि सामान्य चिकित्सक होत्या. त्यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात देखील आले परंतु तरीदेखील त्या या कोरोनाच्या विळख्यातून वाचू शकल्या नाहीत. डॉक्टरांच्या पेशाला शोभेल असेच त्यांनी त्यांचे काम चोखपणे बजावले आहे.

खरंच अशा सर्व डॉक्टरांना आपला सलाम आहे जे अहोरात्र मेहनत करून या कोरुना बाधित रुग्णांवर उपचार करत आहेत तेही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. 

कोरोना व्हायरस वर लॉक डाऊन हे किती प्रभावी साधन ठरू शकते?

सध्याची परिस्थिती पाहता कोरोना व्हायरस वर मात करण्यासाठी लॉक डाऊन करणे हाच एक पर्याय उपलब्ध आहे. कोरोना व्हायरस पासून मरण्याचा दर म्हणजेच Mortality Rate हा जरी कमी असला तरी हा व्हायरस घातक ठरू शकतो, कारण हा व्हायरस हा इतक्या वेगाने पसरतो की त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. जर हाच प्रवेश करणे रोखायचे असेल तर ज्यांना हा व्हायरस झालेला आहे किंवा ज्यांना हा व्हायरस होण्याची शक्यता आहे अशा लोकांना निरोगी लोकांपासून वेगळे ठेवणे हाच पर्याय सरकार समोर उद्भवतो. 

असे केल्यामुळे ज्या लोकांना कोरुना वायरस झालेला आहे अशी लोक निरोगी लोकांच्या संपर्कात येत नाही यामुळे हा कोरोना व्हायरस जिथल्या तिथेच संपवण्यासाठी मदत होते. याच कारणास्तव कोरोनाचा प्रसार आपण रोखू शकतो. सध्याच्या घडीला पाहता कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी लॉक डाऊन करणे हेच प्रभावी साधन आहे. 

लॉक डाऊन वर लोकांची प्रतिक्रिया कशी असली पाहिजे?

आपल्या देशाचे खंबीर असणारे व कोरोनावर अहोरात्र प्रयत्न करून मात करण्यासाठी तयार असणारे आपले डॉक्टर आपल्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत. त्याचबरोबर हा कोरोना व्हायरस इतर लोकांमध्ये पसरू नये यासाठी लोकांना एकत्रित जमु न देण्याचे काम पोलीस देखील अगदी चोखपणे पार पाडत आहेत तेही त्यांच्या जीवाची परवा न करता. 

आपण यांना एकाच प्रकारे सहकार्य करू शकतो ते म्हणजे घरी बसून. तर आपण आपल्या पोलिसांना व डॉक्टरांना सहकार्य करूया. कारण जर आपण आता घराबाहेर पडलो तर येणारे एकवीस दिवस तर सोडाच आपल्याला तीन-चार महिने घरातच बसावे लागेल. तर पर्याय कोणता निवडायचा हे आपल्या हातात आहे एकवीस दिवस घरात बसणे का तीन-चार महिने अजून घरात बसणे. 

त्यामुळे या संकटावर मात करण्यासाठी आपण तयार तर आहोतच. या कोरोना व्हायरस ला हरवू . 

लक्षात ठेवा चीनची कोणतीही गोष्ट जास्त वेळ टिकत नाही. हीच खरी वेळ आहे हे सिद्ध करून दाखवायची. alert-success

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने